पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
भ्रष्टाचार मुक्त,गांजा - ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत त्यांच्या  कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये. पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती  मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही ; कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी कणकवली; प्रतिनिधी   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याच गुन्हेगाराला कधीही साथ दिलेली नाही. कोणाला पाठीशी घातले नाही.आज जो काही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज आणि गांजा मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस रात्र एक करत आहेत. त्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये. असा सज्जड इशारा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राण...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  नितेश राणे  यांची राजेंद्र पेडणेकर यांनी  घेतली  भेट . कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  नितेश राणे यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी ओम गणेश निवासस्थानी  जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या उपस्थितीत भेट घेतली, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ ( भाजी मार्केट) नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुलन उभारणी बाबत सविस्तर चर्चा केली, यावेळी पालकमंत्री  श्री नितेश राणे यांनी नवीन व्यापारी संकुलन उभारणी करण्याचा शब्द दिला, राजेंद्र  पेडणेकर यांनी पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

सिंधुदुर्ग today

इमेज
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना जीवे ठार  मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली / प्रतिनिधी बँक ऑफ इंडियाच्या असेट रिकव्हरी ब्रँच कोल्हापूरचे व्यावस्थापक व शिरगांव शाखेच्या कर्मचाऱ्यांना वसूलीला अटकाव केला. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत गाडी फोडली व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुजितकुमार सुधाकर तावडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी १५ हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. १० मार्च २०२६ रोजी बँक ऑफ इंडियाचे असेट रिकव्हरी शाखा कोल्हापूरचे मॅनेजर रवी श्रीखंडे व शिरगांव शाखेचे अधिकारी व शिपाई शासकीय वाहनातून कर्ज वसूलीसाठी कळसुली येथे गेले होते. कर्जदार सुजितकुमार तावडे याला त्याचा राग आल्याने त्याने भारत सरकारच्या शासकीय वाहनाच्या पुढील मागील काचा लोखंडी रॉडने फोडल्या. तसेच अधिकाऱ्यांच्या अंगावर लोखंडी रॉड घेऊन जीवे ठार मारण्यासाठी धावला. तसेच पुन्हा वसूलीसाठी याल तर ठार मारेन अशी धमकी दिल्याप्रकरणी रवी श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन केले पूर्ण. नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील होते अपूर्ण स्ट्रीट लाईट.  कणकवली /प्रतिनिधी   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान  ग्रामपंचायत सदस्य जैबा नावलेकर यांनी संतोष पारकर यांना वाडीतील स्ट्रीट लाईट अपूर्ण असलेल्या कामाबाबत निदर्शनाला आणून दिले होते. त्यांनी निवडणुक वेळी आश्वासन दिले होते की ,स्वखर्चाने काम करून दिले जाईल. दिलेला शब्द पाळत  जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण करून दिले व मुस्लिम बांधवांची ईद गोड केली. आज ईद निमित्त त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने मुस्लिम बांधवांकडून जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांचा  सत्कार करण्यात आला.  यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, यासिर मास्के,तोसिम नावलेकर ,समीर नावलेकर, कासम पाटणकर, आमिर नावलेकर, मैनुद्दीन नावलेकर ,नझरूद्दिन पाटणकर नियाज पाटणकर आदी...

सिंधुदुर्ग today

इमेज
महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या कणकवली येथे “गरमागरम चाय पे चर्चा” कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महावितरण कार्यकारी अभियंता, कणकवली यांच्या केबिनमध्ये “गरमागरम चाय पे चर्चा” हा अभिनव पण तितकाच आक्रमक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालवण, देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील तब्बल १ लाख ७५ हजारांहून अधिक अन्यायग्रस्त वीज ग्राहकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, आगामी पावसाळ्यात दर्जेदार, सुरळीत आणि २४ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत. महावितरण कंपनीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य वीज ग्राहकांची सातत्याने आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटना...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा. विजेत्या कवीला १० हजारांचे पारितोषिक. समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम. कणकवली/प्रतिनिधी कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार आहे.         नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत या गावचे सुपुत्र. मुंबईच्या गिरणगावात हमाली करणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहिरनामा’ यांसारख्या संग्रहांतून त्यांनी शोषितांच्या वेदनेला क्रांतीची धार दिली. श्रमिकांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, भुकेलेले जग आणि व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतिकारी कवी’ म्हणून ओळखले जाते...

सिंधुदुर्ग today

इमेज
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद.  समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन. कणकवली/प्रतिनिधी        स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या  ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित,रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या कादंबरीवर समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे शनिवार, 30 मे 2026  रोजी स.10.30 वा. पुणे. एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन, नवी पेठ येथे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समीक्षक रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून समीक्षक रणधीर शिंदे,स्त्री साहित्याच्या अभ्यासक गीताली वि.म. आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत सहभागी होणार असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर आणि मधुकर मातोंडकर यांनी दिली.        लेखिका अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेली ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. परंपरेच्या, नात्यांच्या आणि सामाज...

सिंधुदुर्ग today

इमेज
आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’ सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे यांच्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनी - एफ.एम.रेडिओवर प्रसारण कणकवली / प्रतिनिधी       सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबई नगरीचा इतिहास, तिच्या गल्ल्याबोळांतील न ऐकलेल्या कथा आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आता रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आकाशवाणी मुंबईने सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे लिखित 'अज्ञात मुंबई’  या ग्रंथाची विशेष श्रुतिका कार्यक्रम 10 मे 2026 पासून सुरू केला आहे. सकाळ प्रसन्न करणारा हा कार्यक्रम स.7:45 वाजता मुंबई आकाशवाणी एफएम रेडिओवर आणि  स. 9 वा. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर प्रसारित होत आहे.     या कार्यक्रमाची संकल्पना शैलेश माळोदे यांची असून वाचन अभिनेत्री नेहा कुलकर्णी आणि अभिनेता अक्षय शिंपी करत आहेत. निवेदनाची धुरा ज्योत्स्ना केतकर सांभाळत आहेत. मुंबईच्या ‘ज्ञात’ गर्दीत दडलेले ‘अज्ञात’ किस्से, वास्तूंच्या मागच्या कहाण्या आणि शहराच्या घडणीचे अनोखे टप्पे या कार्यक्रमातून उलगडत आहेत.       ...

सिंधुदुर्ग today

इमेज
'करवीर हायकर्स' च्या सातजणांची तिरंगा फडकवून, संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप' यशस्वी रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा सपत्निक समावेश रत्नागिरी, दि. २५ -  (ऋषिकेश मोरजकर) कोल्हापूरच्या 'करवीर हायकर्स' च्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डाॕ सुप्रिया यांचा यात समावेश आहे.      वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या 'अन्नपूर्णा' पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.      'एव्हरेस्ट बेस कँप'साठी भगवान गौतम बुध्दांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत १५ मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा मनसे विद्यार्थी सेनेचा समाजसेवेचा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अनिकेत अनंत तर्फे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये यांनी, “समाजसेवेची बांधिलकी जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे हीच खरी कार्यकर्त्यांची ओळख आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे मनसे तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये उपतालुकाध्यक्ष श्री अतुल दळवी, मनविसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री सम...

सिंधुदुर्ग today

इमेज
वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या ;मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा पालकमंत्री नितेश राणे नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा सिंधुदुर्गनगरी दि. २१ (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजेसंबंधित मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग मंडळ अंतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती व विविध अडचणी संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे तसेच सर्व शाखाधिकारी व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, नियोजित वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना ...

सिंधुदुर्ग today

इमेज
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तारकर्ली सरपंच निर्दोष. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ; अँड. उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली प्रतिनिधी  मालवण येथील सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणातून मालवण तालुक्यातील तारकर्ली-काळेथर सरपंच सौ. स्नेहा केरकर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. देवबाग तारकर्ली रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि अन्य मागण्यांसाठी २१ मार्च २०२२ रोजी आरोपी सरपंच स्नेहा केरकर या सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणच्या कार्यालयासमोर चौथ्यावेळी उपोषणास बसल्या होत्या. २२ मार्च २०२२ रोजी दुपारी त्यांची तब्येत बिघडली. मात्र, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही. सहाय्यक अभियंता अजित पाटील हे कार्यालयात आले नाहीत. तक्रारी रस्त्याने कनिष्ठ अभियंता नितीन दाणे हे त्यावेळी त्या रस्त्याचे ठेकेदार आशिष परब यांच्यासोबत बिल करत होते. त्याचवेळी आरोपी स्नेहा केरकर यांनी बिले कसली करता, माझी तब्येत बि...

सिंधुदुर्ग today

इमेज
उद्याचा एक रविवार संधी दिली जाईल मात्र त्यापुढील रविवारी कडक कारवाई होणारच ; आरटीओ अधिकारी यांची कडक सुचना. नांदगाव तिठा ब्रिज खाली पार्किंगवर तसेच बाजारपेठत अर्ध्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनचालकांवर आरटीओ कारवाई होणार.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ब्रिज खाली तसेच बाजारादिवशी वाहतूक कोंडीची समस्या जास्त निर्माण झाल्याने ग्रामस्थ यांनी नांदगाव ग्रामपंचायत ला लेखी तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने नांदगाव ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सदर नियोजन साठी सिंधुदुर्ग आरटीओ अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावे असे ठरविण्यात आल्याने याच पत्राच्या अनुषंगाने आज आरटीओ अधिकारी ओरोस सचिन पोलादे यांनी प्रत्यक्ष नांदगाव येथे भेट देत पाहणी केली व नांदगाव तिठा ब्रिज खाली पार्किंगवर तसेच बाजारपेठत अर्ध्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे सांगितले आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील नांदगाव गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत नांदगाव मध्ये रविवार आठवडा...

सिंधुदुर्ग today

इमेज
छेड काढल्याप्रकरणी "त्या" परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली : प्रतिनिधी  शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी 'पोक्सो'सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. संशयितांच्यावतीने ॲड.  उमेश सावंत यांनी काम पाहिले. शहरातील परी हेअर अँड ब्युटी सलूनमध्ये मूळ पंजाब राज्यामधील सदरचे दोन युबक कामाला होते. पीडित युवती आणि तिची बहीण रस्त्याने चालत जात असताना या दोन्ही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. एवढचावरच न थांबता संशयितांनी पीडित युवतीचा हात धरून ओढला आणि मनात लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील वर्तन केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करण्याचे अधिनियम (पोक्सो) कलम ८ आणि १...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी गावठण येथे पाणी टंचाई ; ग्रामस्थांनी घागर घेऊन ग्रा.पं. ला दिले निवेदन. काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ; घोषणांनी परिसर गेला दुमदुमून. कणकवली प्रतिनिधी         पाणी पुरवठा सुरळीत करा...नाहितर खुर्ची खाली करा..काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ... पाण्याविना जनता त्रस्त. घोषणांनी कोळोशी परिसर दुमदुमून गेला.      कोळोशी गावठण येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कोळोशीच्या कार्यालयात घागर मोर्चा काढत सरपंचांना जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज पासून पंधरा दिवसांच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.       गेल्या काही दिवसांपासून कोळोशी गावठण येथील नळधारकांना  नळयोजनचा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायत कोळोशी येथे घागर मोर्चा नेऊन सरपंच गुरुनाथ आचरेकर यांना निवेदन देऊन जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आपण यासाठी पंधरा दिवसांच्या आत कटाक्षाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याची घेतली शपथ. गावच्या विकासासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी मानकरी उदय परब यांची निवड. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये परप्रांतीयांना जमीन विक्री होवू नये , या  पार्श्वभूमीवर गावाची संस्कृती, पर्यावरण, पारंपरिक शेती आणि सामाजिक एकात्मता अबाधित राखण्यासाठी जमीन विक्रीस बंदी करण्याचा निर्णय गावसभेने घेतला होता. त्यानुसार संभाव्य नियमावली तयार करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण हितासाठी , पर्यावरण रक्षणासाठी गावातील मानकरी मंडळी व प्रतिष्ठित नागरिकांनी  पुढाकार घेत पुन्हा घेतलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याचा एल्गार करत ग्रामदेवता श्री देव रामेश्वर पावणादेवीला समोर ठेवून शपथ घेतली. या बैठकीत असलदे गावच्या हितासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे मानकरी उदय परब यांची निवड एकमताने करण्यात आली.  असलदे श्री देव रामेश्वर पावणादेवी चव्हाटा येथे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील ; इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन. सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर)  पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने ‘हरित प्रशासन’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष. सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना ! सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर)  सिंधु - रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष पण हे मुख्यमंत्री नियुक्त असेल. या समितीच्या सदस्य पदी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असेल.        सिंधु रत्न योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकास कामाला गती देण्यासाठी ही योजना दिली आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे. पर्यटन ठिकाणी सुविधा विषयक कामे, जल पर्यटन, सागरी पर्यटन,रोजगार निर्म...

सिंधुदुर्ग today

इमेज
ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.  राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत  शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल. शिक्षण मंत्री दादा भुसे,यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना आले यश. सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व कोकणातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर अखेर या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग कोकण सह दुर्गम भागातील शाळांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.            ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सन २०२५-२६ च्या सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
हिंदु म्हणून जिहादी मनोवृत्तीला ठोकुन काढले पाहीजे- अभय जगताप.  नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात : हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. कणकवली : प्रतिनिधी  हिंदू धर्माला अनेक वर्षाची परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मात्र एकप्रकारे आपल्यातील काही लोक सोबत घेवुन आपली संस्कृती संपविण्याचा प्रयत्न विघातक शक्ती करत आहे. ज्यापद्धतीने लव जिहादच्या माध्यमातुन धर्मांतराचे प्रयत्न वाढलेले आहेत. तसेच लॅण्ड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यापलिकडे जावुन वोट जिहाद हा प्रकार नव्याने सुरु झालेला आहे. सरकारच्या धोरणानुसार हम दो..हमारे दो.. जसे हिंदूना लागु आहे. त्याप्रमाणे अन्य धर्मियांना देखील हा कायदा लागु करण्यासाठी आपण लढा उभारला पाहीजे.  हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. जिहादी मनोवृत्तीला सर्वांनी एकत्र येवुन ठोकुन काढले पाहीजे, असे आवाहन  शिवशंभु विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी केले. सकल हिंदू समाजाच्यावतीने नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन वाघाचीवाडी येथे सभागृहात करण्यात आले ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव बौद्ध विकास मंडळाच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा ; विविध कार्यक्रम संपन्न. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव बौद्ध विकास मंडळाच्या वतीने सयुंक्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.       यामध्ये सकाळी ९.३० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले.सकाळी पंचशील ध्वजारोहण, त्रिशरन पंचशील व बुध्द पुजा पाठ ,धम्म प्रवचन, जाहीर सभा व पुरस्कार सोहळा,  स्नेहभोजन , महिला स्नेहसंमेलन , या वेळेत भिमज्योती रॅली तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य तसेच कराओके कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.          या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग समाजकल्याण सभापती सौ रुहिता तांबे यांची , माजी समाजकल्याण सभापती अंकुश कदम तसेच विधी उपासक बापू तांबे, भंते महाथेरो धम्मानंद, नांदगाव विभाग अध्यक्ष राजेश तांबे, प्रमुख वक्त्या प्रज्ञा तांबे, तसेच मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष रत्नदीप तांबे, उपाध्यक्ष पराग तांबे, चिटणीस अक्षय तांबे, कोषाध्यक्ष अतुल तांबे, सहचिटणीस उदय तांबे, हिशोब तपा...

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगडमध्ये साकार होणार भव्य पर्यटन केंद्र! जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता. सिंधुदुर्गनगरी, दि. ४ मे : (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला असून देवगड शहरात भव्य पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासात्मक संकल्पनेनुसार देवगड पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.  सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर आणखी एक आकर्षक केंद्र उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत “पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा” या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या कामाची प्रशासकीय मान्यता जारी केली आहे. देवगड तालुक्यातील देवगड शहरातील शासकीय जागेवर आधुनिक पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बा...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी संशयित आरोपीला  सशर्थ जामिन. ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद. कणकवली प्रतिनिधी        कणकवली- कुडाळ पोलीस स्टेशन गु.र.नं ५३/२०२६ चे कामी पराग सुहास वळंजू, राहा-देवगड, जिल्हा-सिंधुदुर्ग यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) अंतर्गत कलम १३७ (२), ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ६५ (१) व ७५ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) अंतर्गत कलम ४, ६ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी यास रु.५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी दिले. आरोपीच्यावतीने वकील कु.प्राजक्ता म.शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांनी काम पाहिले. याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १५/०२/२०२६ रोजी सकाळी ११.३० वा. चे मानाने फिर्यादी यांचे पतीने पिडीत अल्पवयीन मूलगी हिला तिच्या कुडाळ येथील मैत्रीणीच्या घरी अभ्यासाकरीता नेऊन सोडलेले होते. परंतु ती परत घरी न आल्याने पिडीत अल्पवयीन मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित अस...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी सफरअली इसफ यांना मातृशोक वैभववाडी/प्रतिनिधी      तिथवली - वैभववाडी येथील ज्येष्ठ नागरिक असलेल्या अमीनाबी महामूद इसफ (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने तिथवली काझीवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. कवी सफरअली इसफ यांच्या त्या मातोश्री तर माजी जि. प. उपाध्यक्ष आणि वैभववाडी तालुक्याचे माजी पं.स. सभापती नासीर काझी यांच्या त्या सासू तसेच मुंबई येथे सी. ए. म्हणून कार्यरत असलेले दिलावर इसफ यांच्या त्या आजी होत.          गेली ३० वर्षे त्या विविध आजाराशी झगडत होत्या.त्यांच्या पश्चात चार मुलगे,एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंतिम दफनविधी कोळपे (भुसारवाडी) येथील कब्रस्तानात पार पडला. यावेळी समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नांदगाव येथील नरेंद्र महाराज रुग्णवाहिका चालक अमोल  तेली यांचा सत्कार.   प्रतिनिधी कणकवली नाणीज येथील जय श्री राम नरेंद्र महाराज नांदगाव तालुका कणकवली येथील रुग्णवाहिकेचे चालक अमोल धोंडू तेली ऊर्फ पांडू तेली यांचा आज नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पांडू तेली हे नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून आज पर्यंत बऱ्याच अपघाती रुग्णांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही चांगल्या प्रकारे होत असलेली सेवा यामुळे आज नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार सोहळ्या वेळी अमोल तेली यांचाही सत्कार प्रमोद जठार यांनी करुन ते करत असलेल्या कार्याला धन्यवाद देत बोला नरेंद्र महाराज की, जय अशा घोषणा दिल्या.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, शिंदे सेनेचे विभाग प्रमुख निरज मोरये, रज्जा...

सिंधुदुर्ग today

इमेज
सरस्वती हायस्कुल नांदगाव दहावीचा निकाल १०० टक्के. यशाची परंपरा कायम ;यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन नागेश मोरये यांनी केले अभिनंदन. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) सरस्वती हायस्कुल नांदगाव दहावीचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. गेली ७ वर्षे सातत्याने नांदगाव हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. विद्यार्थी , पालक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश संपादन करता येत आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन नागेश मोरये यांनी दिले.  सरस्वती हायस्कुल नांदगाव या हायस्कुल इयत्ता दहावी मध्ये आदिती अजय चाळके - 90.20टक्के प्रथम , मृणाली मारुती मोरये - 88 टक्के द्वितीय ,आदिती अवधुत वाळके - 87 20टक्के तृतीय असे अनुक्रमे आले आहेत. नांदगाव हायस्कुल दहावीची एकुण 70 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यामध्ये प्रथम श्रेणी 52 विद्यार्थ्यांना मिळाली. तर द्वितीय श्रेणी - 18 विद्यार्थ्यांना मिळाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे झाले जंगी स्वागत. प्रमोद जठार यांनी मानले सर्वांचे आभार. कणकवली प्रतिनिधी  नवनिर्वाचित आमदार श्री प्रमोद जठार यांची नुकतीच आमदार (विधानपरिषद सदस्य) म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या सिंधुभूमीत आल्याने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात भव्य स्वागत होत आहे. याचाच एक भाग म्हणून  आज नांदगाव तिठा येथे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, शिंदे सेनेचे विभाग प्रमुख निरज मोरये, रज्जाक  बटवाले, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, प्राची मोरये,दाजी मोरये, असलदे उपसरपंच सचिन परब, रघुनाथ लोके, राजेंद्र मोरजकर, शामसुंदर मोरजकर, कमलाकर पाटील, नितेश म्हसकर, पांडू तेली आदी बहुसंख्येने नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे येथे वादळामुळे विद्युत लाईन वर झाडाची फांदी पडून तिनं तास विज पुरवठा खंडित.  कर्मचाऱ्यांनी क्रेन च्या सहाय्याने फांद्यी केली बाजूला. नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर असलदे शिवाजी नगर येथे आज सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या वादळामुळे विद्युत लाईन वर झाडाची भली मोठी फांदी पडून विज पुरवठा तिनं तास खंडित झाला होता.       विद्युत कर्मचारी यांनी संबंधित क्रेन च्या सहाय्याने सदर झाडाची फांदी बाजूला करण्यात आली आहे. अजून ही काही ठिकाणी काम सुरू आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे होणार आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत. उद्या सकाळी ९ वा. होणार स्वागत.  कणकवली प्रतिनिधी  श्री प्रमोद जठार  यांची नुकतीच आमदार (विधानपरिषद सदस्य) म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या सिंधुभूमीत येत आहेत. त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात भव्य स्वागत होत आहे. याचाच एक भाग म्हणून  नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी नांदगाव तिठा ब्रिज खाली देवगड ला जाताना शुक्रवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ठिक ९.०० वा. स्वागत होणार आहे. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली : प्रतिनिधी  फिर्यादी युवराज तोडणकर व संशयित आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून तोडणकर यांच्या वडिलांना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी जयेंद्र शिरपूटे, गितांजली केळुस्कर व कु. हिना केळुस्कर यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युबराज व आरोपी सुजल यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर फिर्यादीचे वडील दांडी समुद्र किनारी असताना आरोपी सुजल, त्याचे वडील संतोष केळुस्कर, काका रोहित केळुस्कर यांनी बिअर बाटली, दांडा व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. त्याबाबत फिर्यादी विचारणा करण्यासाठी गेले असता, या आरोपींसह महादेव केळुस्कर, जयेंद्र शिरपूटे, गीतांजली केळुस्कर व हिना केळुस्कर यांनी शिवीगाळ करून मा...

सिंधुदुर्ग today

इमेज
गुटखा बाळगल्या प्रकरणी आरोपीची सत्र न्यायालयाने केली  निर्दोष मुक्तता. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली प्रतिनिधी. कासार्डे दक्षिण गावठाण येथील घरालगतच्या मांगरात बंदी असलेला व शारिराला घातक असलेला ४६ हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात बाळगल्याप्रकरणी आदिनाथ महावीर कऱ्हाडे याची तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. इस. इंदलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. १८ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हा अन्वषण शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक आर. बी. शेळके यांच्या पथकाने कासार्डे दक्षिण गावठाण येथे आरोपीच्या घरालगत असलेल्या खोपीमध्ये छापा टाकला. यावेळी विमल पानमसाला व तंबाखु यांचा ४६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल आढळला. याबाबत पंचासमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांच्या फिर्यादीनुसार आरोपीवर भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६तील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्ष...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मंडलचे ९ मे रोजी विशाल हिंदू संमेलन. बहुसंख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव सकल हिंदू समाज मंडल च्या वतीने शनिवार दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळेत नांदगाव वाघाची वाडी येथील गीता भवन सभागृह येथे विशाल हिंदू संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे.सर्व प्रथम सौ. आरती बापट यांचे समाजप्रबोधन पर किर्तन होणार आहे.      यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ मिलिंद कुलकर्णी, व शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक श्री अभय जगताप उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाज नांदगाव मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि 'महाप्रित' मध्ये सामंजस्य करार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश; महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम. सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश. सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) :  पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात हा करार पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शासकीय इमारती ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे सिंधुदु...

सिंधुदुर्ग today

इमेज
बांदा येथील पूरग्रस्त महाजन यांना नऊ लाख रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीने  देण्याबाबत ग्राहक आयोगाचे आदेश. अँड दीपक अंधारी यांनी पाहिले काम. कणकवली प्रतिनिधी      बांदा,तालुका सावंतवाडी येथे दिनांक सहा ते आठ ऑगस्ट २०१९ या कालावधीत शहरात अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक दुकानांचे घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. शहरातील मे. शनीश्वर कृपा या नावाने सौ उज्वला आनंद महाजन यांच्या सुरू असलेल्या खत विक्रीच्या दुकानात व गोदामात पुराचे पाणी शिरल्याने सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांच्या खताच्या मालाचे नुकसान झाले होते. त्या मालाचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे उतरण्यात आला होता.परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती.      त्यादरम्याने कोविड  चा काळ सुरू झाल्याने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या होत्या. तरीसुद्धा तक्रारदार महाजन यांनी एडवोकेट दीपक अंधारी यांचे मार्फत विमा कंपनीला नोटीस देऊन  ग्राहक मंच सिंधुदुर्ग येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा अर्ज दाखल केला होता.   सदर खटल्याची गुणदोषावर चौकशी होऊन जिल्हा ग्राहक तक्रार...

सिंधुदुर्ग today

इमेज
इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांशी सातत्याने संपर्क साधून पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे इंधनाची उपलब्धता स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांमुळे अनावश्यक भीती निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी वाढत असून, त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी घ...

सिंधुदुर्ग today

इमेज
बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे - पालकमंत्री नितेश राणे  कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा ;  दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी  विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवच कणकवली  : प्रतिनिधी  आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया - युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा समाजात काम करणारा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या दृष्टीने सर्वात जास्त विश्वासार्हता म्हणून पत्रकारिता ही वृत्तपत्रांची आहे. पत्रकारितेत आपले सिध्दांत बाजूला ठेवू नका. कणकवली तालुक्यातील पत्रकारसंघाचे कार्य उल्लेखनीय आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व त्यांची टीम विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित आहे. पत्रकार म्हणून ब-याच पत्रकारांचा नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वृत्तपत्रात सर्वात जास्त विश्वासार्हता असलेली पत्रकारिता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी  दर तीन महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओऱोस येथे दर्पण गृहनिर्माण संस...