सिंधुदुर्ग today
उद्याचा एक रविवार संधी दिली जाईल मात्र त्यापुढील रविवारी कडक कारवाई होणारच ; आरटीओ अधिकारी यांची कडक सुचना.
नांदगाव तिठा ब्रिज खाली पार्किंगवर तसेच बाजारपेठत अर्ध्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनचालकांवर आरटीओ कारवाई होणार.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ब्रिज खाली तसेच बाजारादिवशी वाहतूक कोंडीची समस्या जास्त निर्माण झाल्याने ग्रामस्थ यांनी नांदगाव ग्रामपंचायत ला लेखी तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने नांदगाव ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सदर नियोजन साठी सिंधुदुर्ग आरटीओ अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावे असे ठरविण्यात आल्याने याच पत्राच्या अनुषंगाने आज आरटीओ अधिकारी ओरोस सचिन पोलादे यांनी प्रत्यक्ष नांदगाव येथे भेट देत पाहणी केली व नांदगाव तिठा ब्रिज खाली पार्किंगवर तसेच बाजारपेठत अर्ध्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील नांदगाव गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत नांदगाव मध्ये रविवार आठवडा बाजार दिवशी होणाऱ्या ट्रॅफिक समस्येबाबत चर्चा करण्यात आली.आणि त्या अनुषंगाने आरटीओ कार्यालय ओरोस येथे सरपंच ग्रामपंचायत नांदगाव यांचे कडून याबाबत पत्र पाठवून तीन आसनी रिक्षा तसेच सहा आसनी रिक्षा यांना अधिकृत स्टॅन्ड देणे बाबत कळविण्यात आले. तसेच नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली बऱ्याच गाड्या पार्किंग करून ठेवलेले असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा गंभीर प्रकारचे अपघात झालेले आहेत त्याबाबतही कळविण्यात आले होते. या ग्रामपंचायत नांदगावच्या पत्राच्या अनुषंगाने आरटीओ अधिकारी ओरोस सचिन पोलादे यांनी नांदगाव तिठा येथे भेट देऊन सरपंच रविराज मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर तसेच तीन आसनी रिक्षा सहा आसनी चालक मालवाहू टेम्पो यांच्या चालक मालकांशी चर्चा केली त्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सर्वांना सवलत देण्यात येईल तुम्ही सर्वांनी आपापसात चर्चा करून कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिकची अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आरटीओ अधिकारी यांनी सांगितले त्यानंतरच्या पुढच्या रविवारी आम्ही कुठल्याही प्रकारची सवलत देणार नाही असे सांगितले व जो ट्राफिक ला अडथळा करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच दंड आकारण्यात येईल असे आरटीओ अधिकारी यांनी सांगितले.तीन आसनी रिक्षा सहा आसनी रिक्षा स्टॅण्डसाठी जागा स्थानिक स्वराज्य संस्थेनी द्यायची आहे असे आरटीओ अधिकारी यांनी सांगितले. यावेळी आरटीओ अधिकारी ओरस सचिन पोलादे तसेच प्रीतम जाधव आणि वाहन चालक कांदे , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा