सिंधुदुर्ग today



कोळोशी गावठण येथे पाणी टंचाई ; ग्रामस्थांनी घागर घेऊन ग्रा.पं. ला दिले निवेदन.

काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ; घोषणांनी परिसर गेला दुमदुमून.

कणकवली प्रतिनिधी 

       पाणी पुरवठा सुरळीत करा...नाहितर खुर्ची खाली करा..काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ... पाण्याविना जनता त्रस्त. घोषणांनी कोळोशी परिसर दुमदुमून गेला.

     कोळोशी गावठण येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कोळोशीच्या कार्यालयात घागर मोर्चा काढत सरपंचांना जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज पासून पंधरा दिवसांच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

      गेल्या काही दिवसांपासून कोळोशी गावठण येथील नळधारकांना  नळयोजनचा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायत कोळोशी येथे घागर मोर्चा नेऊन सरपंच गुरुनाथ आचरेकर यांना निवेदन देऊन जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आपण यासाठी पंधरा दिवसांच्या आत कटाक्षाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नक्की प्रयत्न करून ही समस्या सोडविण्यासाठी पुर्ण लक्ष देण्यात येईल असे आश्वासन दिले.

   यावेळी बोलताना गावठण येथील नागरिक असे म्हणाले की,सध्या गावात मुंबईकर चाकरमानी आले असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने हाल होत आहेत.कपडे धुण्यासाठी नदीवर जाण्याची वेळ महिलांवर येत आहे.आम्ही सुट्टीच्या दिवसात मुला बाळांना घेऊन गावी येत असतो अशा वेळी जर हि परिस्थिती असेल तर हि गोष्ट चांगली नसून सरपंचांनी यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.यापुढे तरी पाण्याचे योग्य नियोजन करावे असे सांगण्यात आले.

      यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, सदस्य सुशील इंदप यांनी नागरिकांशी चर्चा केली.यावेळी दिपक इंदप,विजय इंदप,आबा इंदप, चंद्रकांत इंदप, श्रीधर साळकर, अनंत साळकर, मारुती कदम,गणपत इंदप, शैलेंद्र इंदप, श्रीराम कदम,तातू कदम,नंदू कदम, चंद्रकांत कदम,प्रमोद कदम, बबन इंदप,पंकज इंदप,प्रणाली इंदप,शारदा इंदप, सुप्रिया इंदप, पुजा साळकर ,वैशाल कदम,वासंती कदम,समीक्षा कदम आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today