पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना कणकवली /प्रतिनिधी  गेल्या २० वर्षांपासून दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. उत्तम गुणवत्ता आणि शिक्षणाची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने दिशा परिवार समाजातील दानशूर व्यक्ती आणि अशा विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे. शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी ( शासकीय महाविद्यालय) आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यां...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील विजय ज्ञानदेव मोरये यांचे निधन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव सिसयेवाडी महापुरुष मंडळाचे सभासद उद्योजक विजय ज्ञानदेव मोरये यांचे नुकतेच अल्पशा आजाराने  मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले आहे ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने नांदगाव गावातून हळहळ व्यक्त होत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांनची पोलिस चौकशी ; जम्मू- कश्मिर ला पाठवले परत.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड  जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड.  पोलिसांनी आरधर कार्डावरील पत्त्याची शहानिशा करून फिरविले माघारी. सावंतवाडी : प्रतिनिधी  शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदुत्ववादी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केले असता ते जम्मू- कश्मिर येथील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा शेखपुरा येथील असल्याचे उघड झाले.दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क झाली आणि संशयितांची केली ओळख परेड करून त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा येथे पाठवण्याची कार्यवाही पोलिसांनी केली आहे.     ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नाम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व दीपोत्सव. कणकवली दि.२४ जून (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विकासासाठी तसेच मत्स्योद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विरोधी पक्षांकडूनही घेतली जात असल्याने त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत असल्याचे गजानन उपरकर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळांच्या वतीने परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे  विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून मंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून राज्याच्या विकासासाठी अधिकाधिक जनहिताची कामे घडावीत, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर...

सिंधुदुर्ग today

इमेज
मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा. पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार. मराठी भाषेचा मालवणी भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार.  कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ. मुंबई: प्रतिनिधी  मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.तर यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. मालवणी भवन उभारण्याबाबत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेची भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो, असे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले. मालवणी भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असून कोकणातील मालवणी भाषिकांसाठी ही घोषणा दिलासादायक मानली जात आहे. मालवणी भाषा ही मराठी भाषेचाच एक अविभाज्य भाग ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद. असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केले आयोजन.  कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी - आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात आली. या सेवेबद्दल दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांनी आभार मानले. तसेच दिवीजा वृध्दाश्रमातील आजी -आजोबांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राची विकासात्मक सेवा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आशिर्वाद देण्यात आले. तसेच यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी , पुढील वाटचालीत यश समृध्दी लाभण्यासाठी ईश्वर चरणी असलदे ग्रामस्थांनी प्रार्थना केली. यावेळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , सोसायटी चेअरमन भगवान लोके , भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,उपसरपंच सचिन परब ,...

सिंधुदुर्ग today

इमेज
नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे वृक्षारोपण   नांदगाव /प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कणकवली चे प्रमुख कार्यकर्ता रज्जाक बटवाले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा नांदगाव येथे वॄक्षारोपण केले व शाळेच्या सर्व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.        यावेळी अकबर बटवाले जाहीर बटवाले शाळेचे शिक्षक तारीख अन्वर खान ऐनोदिन शेख आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व शाळांना वह्या वाटप तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.       यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू तांबे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संतोष जाधव , ग्रामपंचायत सदस्य शंकर मोरये, संतोष बिडये, अक्षता खोत, कमलाकर पाटील,राजू खोत,मारुती मोरये  आदी पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट;ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन. टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण  जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास  जनतेच्या भावनांचा केला आदर,मागणी पूर्णत्वास ; व्यावसायिक वाहनांना ही ५० टक्के टोल माफी. सिंधुदुर्ग : (ऋषिकेश मोरजकर ) महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना  लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत दिली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.     आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणे कु...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे उद्या पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त दशावतार नाट्य पुष्प. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कासार्डे जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी कार्येकर्ते यांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार नाट्य पुष्प "यज्ञहंता संग्राम" हा नाट्य प्रयोग नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या सभागृहात (नांदगाव ग्रामपंचायत शेजारील) आयोजित करण्यात आला आहे. पावसाचे दिवस असले तरी हा प्रयोग सभागृहात होणार असल्याने वेळेतच सुरू होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी: खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'तंर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर! सिंधुदुर्ग: (ऋषिकेश मोरजकर)   सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३' (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२ मोठ्या पुलांच्या (LSB) कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क सुलभ होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या कायमच्या मिटणार आहेत. तालुकानिहाय मंजूर पुलांची यादी आणि खर्च (लाखांत): १. देवगड तालुका: फणसगाव महाळुंगे रस्ता (कि.मी. ६/२४०): २४ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७१.५८ लाख रुपये मंजूर. २. दोडामार्ग तालुका: पाडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्ता (साखळी २/५५०): २२ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये मंजूर. भेडेशी खान्याळे शिरंगे पुनर्वसन रस्ता (सापुलासाठी ३...

सिंधुदुर्ग today

इमेज
खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे - अजय कांडर. श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप' विषयावर व्याख्यान. कणकवली/प्रतिनिधी       अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे. गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणे असते. कवीने खोटेपणाच्या काळात त्याच्या लेखनातून सत्य सांगणे हीच क्रांती असते.जे मुके आहेत, ज्यांना दिसत नाही, ज्याना ऐकू येत नाही त्यांचा आवाज होणे हाच कवीचा वर्तमान हस्तक्षेप असतो असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप ' या व्याख्यानात केले.            स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे कवी अजय कांडर यांचे सदर विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी समाजात कवीचा हस्तक्षेप म्हणजे लेखकाने सामाजिक प्रश्नांवर कशी भूमिका घ्यावी, एवढ्या पुरताच तो महत्त्वाचा नसतो तर कवीच लेखन आणि स्वतःच वर्तन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात असेही आग्रहाने सांगितले.यावेळी कार्यक्रमाच...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा. नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी ; विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष. कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी नांदगाव व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने वाहतूक अधिकारी गौतमी कुबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , विजय आचरेकर , रामचंद्र मोरये , श्रीपाद म्हापसेकर , इम्रान बटवाले , प्रशांत कदम, वसिम साटविलकर, रुबीना नावलेकर, आसिफा लांजेकर यांच्यासह पालक उपस्थित होते. नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नांदगाव तिठा तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे. राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात. धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात तुष्टीकरणाच्या राजका...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची राजेंद्र पेडणेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट. कणकवली ( प्रतिनिधी ) अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी समस्त व्यापारी बांधवांन सोबत दोन तास चर्चा केली, या चर्चेत अनिल मेस्त्री, राजु म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिल भाई कुरेशी, प्रभाकर कदम, यांनी विषेशतः सहभाग घेतला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सर्वांना नव्याने व्यापारी संकुलण उभारणी करताना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले, तसेच सर्वांना आश्वासन दिले की नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलणा मध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा आपण पर्यंत करू असे म्हटले. उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन दिले, या निवेदनात असे म्हटले आहे की कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, प...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुरत्न समृद्ध योजने'च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री नितेश राणे.   सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (ऋषिकेश मोरजकर) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व कामे संबंधित यंत्रणेने निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.   १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्ष...

सिंधुदुर्ग today

इमेज
राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे मस्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री जन मन आवास योजना योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावामध्ये 4 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुले पूर्ण झाली आहेत. सदर योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके,  विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब व श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी घरकुल बांधकामासाठी एकुण ४ आर क्षेत्र बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिले आहे. लाभार्थ्यांना सदर जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावाने अवैध दारु विक्री विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं कौतुक. अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल ; असलदे - नांदगाव ग्रामस्थांनी अवैध दारु विरोधात अशीच एकजूट ठेवावी. कणकवली : असलदे गावात अवैध दारु विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आहे. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि तरुण पिढीच्या हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला. असलदे - नांदगाव गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,सोसायटी चेअरमन भगवान लोके,कमलेश पाटील,राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. असलदे गावामध्ये गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. ग्रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला पल्‍स पोलिओ लसीकरण आणि अतिसार नियंत्रण मोहिमेचा आढावा २८ जूनपासून पल्स पोलिओ लसीकरणाला सुरूवात शाळा प्रवेशोत्सवा'त पालकांना लसीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना अतिसार प्रतिबंध मोहीम १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत           सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी ): जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ही मोहीम २८ जूनपासून सुरू होणार आहे. तसेच १ जून ते ३१ जुलै २०२६ दरम्यान 'Stop Diarrhoea Campaign' (अतिसार नियंत्रण मोहिम) राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागांचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आवश्यक सूचना दिल्या. विशेषतः १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व तसेच अतिसार नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी आवश्यक माहिती पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.           जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाल...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे १०० % बंदची सिंधुदुर्ग टुडे ने बातमी प्रसिद्ध करताच पथदिवे सुरू. बातमी प्रसिद्ध होताच हायवे प्राधिकरणला आली जाग.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला नांदगाव - ओटव फाटा आरोग्य केंद्र जवळील ब्रिज वर १०० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे . यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल ची बातमी प्रसिद्ध होताच पुन्हा हायवे प्राधिकरण ला जाग येवून दुरुस्ती करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला. गुन्ह्यात वापरलेली थार कारही परत करण्याचे आदेश ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद. प्रतिनिधी / कणकवली  बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज दुसऱ्यांदा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी  यांनी फेटाळला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली थार कारही 20 लाख रुपयांच्या बंद पत्रावर परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. बेंगलोरचे डॉ. श्रीनिवास रेड्डी यांना गोव्यातील हॉटेलमधून मुंबईला नेण्याच्या बहाण्याने आरोपी मधुसूदन टोकला, व्यंकटेश बाबू व इतरांनी स्विफ्ट गाडीतून नेले होते. प्रवासादरम्यान साळीस्ते येथे गाडीतच त्यांची हत्या करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्यात मधुसूदन टोकला, नरसिंह मूर्ति, वर्धन के. एन., सुभाष सुब्बारायापा एस. या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी व...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा   नांदगाव, असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या ; पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय , सुशोभीकरण करा  कणकवली : प्रतिनिधी  मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नांदगाव तिठ्यावर देवगड – निपाणी रस्त्याचा रहदारीचा नाका असताना गेले काही महिने काळोख कशाला ? याठिकाणी काळोखाचा फायदा घेवून काही चुकीची घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न पत्रकार भगवान लोके यांनी विचारला. तसेच उड्डाणपुलाखालील पर्यटक  व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय, अतिक्रमण, वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तसेच परिसर सुशोभीकरणाबाबत नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्यासह ग्रामस्थांनी लक्ष वेधले. नांदगाव तिठा येथे असलदे व नांदगाव गावातील महामार्गावरील समस्यांबाबत उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. यावेळी असलदे माजी सरप...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ;घेणार जनतेच्या गाठी भेटी कणकवली /प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेणार आहेत. नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे पुन्हा १०० % बंद. सुरळीत केल्यानंतर पावसाच्या सरी आल्यावर पुन्हा बंद. केसीसी कंपनीकडून कायम स्वरुपी उपाय का होईनात ? ग्रामस्थ संतप्त; दोन दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलनचा दिला इशारा. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला नांदगाव - ओटव फाटा आरोग्य केंद्र जवळील ब्रिज वर  १०० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे.यामुळे पथ दिवे असले तर शो साठी आहेत का ? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. कंपनी फक्त  तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून पुन्हा येरे माझ्या मागल्या साध्या पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी सदर पूर्ण लाईट बंद पडते. यामुळे अंधाराचा फायदा घेऊन या ब्रिजच्या खाली तसेच सर्विस रस्त्यालगत रात्री उशिरापर्यंत दारू पिण्यासाठी बसतात . आणि याचा त्रास रात्र जेवण आटपल्यानंतर शतपावली करणाऱ्या ग्रामस्थ तसेच महिलांना होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून  येत्या २ दिवसांत पथदिवे वारंवार का बंद पडतात यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तिव्र आंदोलन करणार असल...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांचे कवीचा वर्तमान हस्तक्षेप विषयावर व्याख्यान श्रीरामपूर सहजानंद भारती कॉलेजतर्फे १६ रोजी आयोजन   कणकवली/प्रतिनिधी      स्वामी सहजानंद भारती कॉलेज अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे 16 जून रोजी रात्री 9 वा. कवी अजय कांडर यांचे ' कवीचा वर्तमान हस्तक्षेप' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.      श्रीरामपूर सहजानंद भारती कॉलेजतर्फे विविध व्याख्याने सातत्याने आयोजित केली जातात. समाजाची वैचारिक बैठक पक्की व्हावी आणि नवी पिढी वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हावी या विचाराने वेगवेगळे विषय व्याख्यानासाठी निवडले जातात आणि त्या विषयाचे तज्ञ व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले जातात. आजवरच्या व्याख्यानात साहित्य,संगीत, कला, समाज जीवन,सांस्कृतिक जीवन या विषयातील तज्ञ अभ्यासकांना निमंत्रित करून व्याक्याने आयोजित केली गेली. यावेळी कवी- लेखकाची जबाबदारी काय असते ? समाजात त्याचा हस्तक्षेप काय असतो? हा हस्तक्षेप करताना कवी आपली सामाजिक बांधिलकी कोणती मानतो, त्याचबरोबर कवीने लेखन करणे म्हणजे कोणत्या प्रकारची जोखीम पथककरणे आदी मुद्द्याच्या अनुषंगाने मां...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव अवैध दारू धंद्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त कारवाईचे आदेश. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर झाली त्वरित कडक कारवाई सरपंच रविराज मोरजकर यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार. नांदगाव / प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली  राजरोस पणे अवैध गोवा बनावट दारूची विक्री होत होती . याबाबत वारंवार पोलीस खात्याकडे तक्रार करून सुद्धा ठोस कारवाई होत नव्हती , याबाबत पालकमंत्री नितेश राणे  यांच्याकडे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ओरोस यांच्या जवळ याबाबत नाराजी व्यक्त करून सरपंच गावाच्या वतीने ग्रामसभेच्या ठरावांची प्रत देऊन तुमच्याकडे या अवैध दारू धंद्याबाबत कारवाई करण्याची मागणी करत असताना कडक कारवाई का होत नाही ? अशी विचारणा केली आणि त्वरित हे अवैध दारू धंदे बंद झालेच पाहिजेत असा सक्त आदेश दिला होता. पालकमंत्र्यांची नाराजी,तसेच ठोस कारवाईचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कणकवली व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच रात्री साडेबारा वाजता...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आ. निलेश राणे यांच्याकडून कौतुक अवैध दारू विक्रेत्याच्या माफीनाम्याचा  व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर ; जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत कणकवली : प्रतिनिधी   असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कुडाळ-मालवणचे शिवसेना आ. निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्यानंतर त्या दारु विक्रेत्याने पुन्हा अवैध धंदा न करण्याची कबुली दिली. त्याबाबतचा व्हिडीओ आ. निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असलदे ग्रामस्थांच्या जागरूकतेचे अभिनंदन केले. आमदार राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गावात दारूबंदी असताना दारू विक्रेत्याला जाब विचारत त्याला ताब्यात घेतले आणि समज दिली. असे जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात असले पाहिजेत. असलदे गावातील ग्रामस्थांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. तुम्ही सिंधुदुर्गाला एक नवीन सुरुवात ...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावात गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका.. गावात दारुबंदी असताना दारु विक्रीची हिम्मत कशी करता? ; पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दारु विक्रेत्यांना जाब विचारत दिली समज.. कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.यावेळी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली. यापुढे गावात दारु विक्री करणारे नसल्याचे माफी मागत जाहीरपणे सांगितले आहे. असलदे शिवाजीनगर येथे आरोपी अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊन कणकवली पोलिसांनी ७ जून रोजी रात्री १२.३० धाड टाकली. यानंतर गावात ग्रामसभेमध्ये दारूबंदी चा ठराव असताना देखील अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी रात्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली. भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ;  ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय. कणकवली : प्रतिनिधी  असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील जमिनी परप्रांतीयांना विक्री बंदी सोबतच पुढील काळात जमिनीचे विक्री संदर्भात गावक-यांनी स्वत:हून पुढाकार एक आदर्श नियमावली तयार करत गावातील भूमिुपुत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय ग्रामविकास समितीच्या बैठकीत घेतला आहे. असलदे श्री देव रामेश्वर पावणादेवी चव्हाटा येथे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष उदय परब यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा पार पडली. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब , उद्योजक सुरेश डामरे , अजय परब , छत्रुघ्न डामरे ,पत्रकार नरेंद्र हडकर,  तुषार घाडी , सचिव प्रदीप हरमलकर , दिलीप डामरे , संदेश आचरेकर , प्रकाश आचरेक...

सिंधुदुर्ग today

इमेज
  स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल. अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात. सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन. कणकवली/प्रतिनिधी      ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल मांडणारी आहे,’ असे मत सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित 'निखळत्या चौकटीत' कादंबरीवरील परिसंवादन मान्यवरांनी व्यक्त केले.      सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील गुणवान लेखकांना पुढे घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानतर्फे अंजली ढमाळ यांच्या ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर पुणे एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात ज्येष्ठ समीक्षक डॉ.रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. समीक्षक डॉ.दत्ता घोलप स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ.गीताली वि.म. प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या या मंचावर लेखिका अंजली ढमाळ समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय का...

सिंधुदुर्ग today

इमेज
ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश. सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर):-  सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी ऑनलाईन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस दलाच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कामकाजाचा मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. ऑनलाइन गेमिंग, मटका, जुगार तसेच इतर अवैध सायबर स्वरूपाच्या कृत्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा साक्षरतेच्या दृष्टीने राज्यातील अग्रगण्य जिल्ह्यांपैकी एक असून नागरिकांमध्ये सायबर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणे, य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा फोंडा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दोन दुचाकीस्वारांचा अपघात.  नांदगाव फोंडा रोड वरील रस्ता कारणांमुळे पसरले चिखलाचे साम्राज्य.  माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांचा आंदोलनाचा इशारा. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव फोंडा रस्त्याचे काम गेल्या दीड ते दोन वर्षापासून सुरू आहे आता नांदगाव तिठा सुरू होतो या जवळच काम येऊन थांबल्याने त्या ठिकाणी पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसाने एवढी दलदल झालेली आहे की, येणार जाणाऱ्या वाहनांने, दुचाकीस्वार घसरुन पडून जखमी होत आहेत. तर येथून त्या दलदलीमुळे चालणेही मुश्किलीचे झाले आहे. तरी सदर दलदलीवर त्वरित खडी टाकून दलदल दूर करावी अन्यथा येथे आठ दिवस सात आंदोलन छेडले जाईल असा इशारा नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी दिला आहे.     दलदल मुळे अपघातग्रस्तांना मदत करताना अडथळे   काल सायंकाळी उशिरा आफ्रोजा नावलेकर या कोल्हापूर हून येत असताना त्यांना रस्त्यावर दोन दुचाकीस्वार पडलेले दिसले त्यांना स्थानिक ग्रामस्थ यांनी मदत करत उपचारासाठी दाखल केले . पण त्यांना मदत करताना ही सदर चिखलामुळे पाय घ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम. प्लास्टिकचा भस्मासुर टाळा - सभापती - सौ हर्षदा वाळके.  स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे सरपंच भाई मोरजकर यांचे आवाहन. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर ) नांदगाव ग्रामपंचायत व सदगुरू निरंकारी महाराज संप्रदायाचे सहकारी यांच्या वतीने  नांदगाव तिठा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.        यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, आज कचरा गोळा करताना प्लास्टिक कचरा भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक भस्मासुर टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.     तर नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी आपण जवळपास तिनं महिन्यात तीनदा स्वच्छता अभियान राबविले असून हे अभियान राबविण्याची गरजच भासणार नाही यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. व कचरा टाकताना इतरत्र कुठेही कचरा न टाकता ग्रामपंचायत मार्फत ठेवलेल्या कचरा कुंडीतच कचरा टाकेन असा निश्चय करून आपापल्या परिसरात स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.   ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सामान्य नागरिक गॅस वर ; सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र  पेडणेकर यांनी मांडली वस्तूस्थिती. कणकवली प्रतिनिधी  सामान्य नागरिक आज गॅस वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून, बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती नाही, घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस कार्यालयात तासनतास लाइन मध्ये ऊभे राहून सिलिंडर वाहनासाठी जादा पैसे खर्च करून घरी आणावा लागतोय, आधीच सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेला असल्याने सामान्य माणूस गॅस वर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी बोलताना सांगितले आहे. पर्वी प्रत्येक गॅस धारकांना वर्षा ला 15 सिलिंडर घरपोच पोच मिळत होते, आज नव्या नियमानुसार 25 दिवसानंतर नविन बुकिंग करता येते, पण हिशोबने ट्याग नंबर येई पर्यंत 30 दिवस होतात, त्यानंतर आठवड्याने गाडी घरपोच पोच आली तर ठीक नाहीतर चलो गॅस एजन्सी, या हिशोब ने सामान्य नागरिकांना वर्षाला 9 सिलिंडर पण मिळणे अशक्य आहे,  खडे गावातील नागरिकांना 45 दिवसानंतर नवीन बुकिंग म्हणजे खेडे गावातील लोक जेवण करत नाहीत ? एक तर जंगलतोड लागू आहे, मग त्यांनी जगायच नाही,  आता म्हणाल गॅस तुटवडा आहे,...