पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
नारायण सुर्वे स्मृती कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता तांबे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांचाही सहभाग. अक्षरवैभव संस्थेतर्फे वैभववाडी येथे 6 रोजी संमेलनाचे आयोजन. वैभववाडी (प्रतिनिधी):             वैभववाडी तालुक्यात सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची गेल्या वर्षीच स्थापना करण्यात आली. या चळवळीतर्फे आता वैभववाडीचे सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रावणसरी हा कविसंमेलनाचा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी स.10 वा. आयोजित करण्यात आला आहे.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता तांबे यांची निवड करण्यात आली आहे.       या काव्यसंमेलनाचे उद्धघाटन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडीचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कविवर्य नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग सुपुत...