सिंधुदुर्ग today



नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नांदगाव येथील नरेंद्र महाराज रुग्णवाहिका चालक अमोल  तेली यांचा सत्कार.

 प्रतिनिधी कणकवली

नाणीज येथील जय श्री राम नरेंद्र महाराज नांदगाव तालुका कणकवली येथील रुग्णवाहिकेचे चालक अमोल धोंडू तेली ऊर्फ पांडू तेली यांचा आज नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पांडू तेली हे नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून आज पर्यंत बऱ्याच अपघाती रुग्णांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही चांगल्या प्रकारे होत असलेली सेवा यामुळे आज नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार सोहळ्या वेळी अमोल तेली यांचाही सत्कार प्रमोद जठार यांनी करुन ते करत असलेल्या कार्याला धन्यवाद देत बोला नरेंद्र महाराज की, जय अशा घोषणा दिल्या.

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, शिंदे सेनेचे विभाग प्रमुख निरज मोरये, रज्जाक  बटवाले, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, प्राची मोरये,दाजी मोरये, असलदे उपसरपंच सचिन परब, रघुनाथ लोके, राजेंद्र मोरजकर, शामसुंदर मोरजकर, कमलाकर पाटील, नितेश म्हसकर, पांडू तेली आदी बहुसंख्येने नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today