सिंधुदुर्ग today



नांदगाव बौद्ध विकास मंडळाच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा ; विविध कार्यक्रम संपन्न.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव बौद्ध विकास मंडळाच्या वतीने सयुंक्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

      यामध्ये सकाळी ९.३० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले.सकाळी पंचशील ध्वजारोहण, त्रिशरन पंचशील व बुध्द पुजा पाठ ,धम्म प्रवचन, जाहीर सभा व पुरस्कार सोहळा,  स्नेहभोजन , महिला स्नेहसंमेलन , या वेळेत भिमज्योती रॅली तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य तसेच कराओके कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग समाजकल्याण सभापती सौ रुहिता तांबे यांची , माजी समाजकल्याण सभापती अंकुश कदम तसेच विधी उपासक बापू तांबे, भंते महाथेरो धम्मानंद, नांदगाव विभाग अध्यक्ष राजेश तांबे, प्रमुख वक्त्या प्रज्ञा तांबे, तसेच मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष रत्नदीप तांबे, उपाध्यक्ष पराग तांबे, चिटणीस अक्षय तांबे, कोषाध्यक्ष अतुल तांबे, सहचिटणीस उदय तांबे, हिशोब तपासणी अमोल तांबे, गाव शाखा अध्यक्ष अनिल तांबे, उपाध्यक्ष प्रणय तांबे, कोषाध्यक्ष राजेंद्र तांबे, चिटणीस संदेश तांबे, सहचिटणीस अनिकेत तांबे, सदस्य जीतेन्द्र तांबे आदी उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today