सिंधुदुर्ग today


कवी सफरअली इसफ यांना मातृशोक

वैभववाडी/प्रतिनिधी

     तिथवली - वैभववाडी येथील ज्येष्ठ नागरिक असलेल्या अमीनाबी महामूद इसफ (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने तिथवली काझीवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. कवी सफरअली इसफ यांच्या त्या मातोश्री तर माजी जि. प. उपाध्यक्ष आणि वैभववाडी तालुक्याचे माजी पं.स. सभापती नासीर काझी यांच्या त्या सासू तसेच मुंबई येथे सी. ए. म्हणून कार्यरत असलेले दिलावर इसफ यांच्या त्या आजी होत. 

        गेली ३० वर्षे त्या विविध आजाराशी झगडत होत्या.त्यांच्या पश्चात चार मुलगे,एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंतिम दफनविधी कोळपे (भुसारवाडी) येथील कब्रस्तानात पार पडला. यावेळी समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today