सिंधुदुर्ग today



सरस्वती हायस्कुल नांदगाव दहावीचा निकाल १०० टक्के.

यशाची परंपरा कायम ;यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन नागेश मोरये यांनी केले अभिनंदन.

कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)

सरस्वती हायस्कुल नांदगाव दहावीचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. गेली ७ वर्षे सातत्याने नांदगाव हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. विद्यार्थी , पालक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश संपादन करता येत आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन नागेश मोरये यांनी दिले. 

सरस्वती हायस्कुल नांदगाव या हायस्कुल इयत्ता दहावी मध्ये आदिती अजय चाळके - 90.20टक्के प्रथम , मृणाली कुरुती मोरये - 88 टक्के द्वितीय ,आदिती अवधुत वाळके - 87 20टक्के तृतीय असे अनुक्रमे आले आहेत. नांदगाव हायस्कुल दहावीची एकुण 70 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यामध्ये प्रथम श्रेणी 52 विद्यार्थ्यांना मिळाली. तर द्वितीय श्रेणी - 18 विद्यार्थ्यांना मिळाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today