पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  आजीला लुटल्याप्रकरणी नातवासह दोघांना जामीन मंजूर अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम  कणकवली : प्रतिनिधी  ओटव, ओटववाडी येथे स्वतःच्या आजीच्या घरात घुसून दरोडा टाकणारा नातू साहिल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. लटुरिया यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीतर्फे अॅङ उमेश सावंत, अॅङ नेहा ताम्हणकर व अॅङ जुई उबाळे यांनी काम पाहिले. दि. २२ एप्रिल २०२४ रोजी आरोपीनी संगनमाने ओटव येथील आजी सुवर्णा रावले हीच्या घरात चेहऱ्याला मास्क लावून घुसून तीच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व साडेनऊ ग्रामची दुसरी चेन असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषनने कारवाई करत दोघांना मीरा-भाईंदर येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली होती. ती फेटाळत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर आरोपींच्यावतीने दाखल जामिन अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने तपास...

सिंधुदुर्ग today

इमेज
विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा  उमेदवारी अर्ज दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज. कणकवली प्रतिनिधी  महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र  चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल  श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री  श्री. जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले शुभाशीर्वाद. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  भारतीय जनता पार्टीचे विधान  परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले.   उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

सिंधुदुर्ग today

इमेज
उद्या ३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’ ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन; मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी. जाणवली नदी वरून होणार निषेध पदयात्रेला सुरवात.  कणकवली : प्रतिनिधी  केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा  जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सिंधुदुर्ग  च्या वतीने गुरुवारी ३० एप्रिल रोजी कणकवली शहरात भव्य 'आक्रोश निषेध पदयात्रे' चे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी करणार आहेत. ही आक्रोश पदयात्रा गुरुवारी ३० रोजी  सायंकाळी ठीक ४:०० वाजता कणकवली - जानवली नदीजवळील मनोहर शिल्प मॉल येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत होणार आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत महिलांना आरक्षणाचा हक्क देणारा नारीशक्ती वंदन कायदा मंजूर केला आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवल्याने म...

सिंधुदुर्ग today

इमेज
अंमली पदार्थ नियंत्रण जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न. अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) :   आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. अंमली पदार्थ अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को ऑर्डनेशन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे प्रत्यक्ष तर सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन एस.पी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सई धुरी, तसेच शिक्षण विभाग, उत्पादन शुल्क विभाग, बंदर विकास विभाग, समा...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी  पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार.   जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार  - पालकमंत्री नितेश राणे. जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)       सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या उभारणार असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी पदाधिकाऱ्यांना दिले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आभार मानण्यात आले. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी यांनी  पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश या निवासस्थानी...

सिंधुदुर्ग today

इमेज
जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार.  पालकमंत्री नितेश राणे. सावंतवाडी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सिंधुदुर्गनगरी दि २५ (ऋषिकेश मोरजकर) दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा  करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागामध्ये ६१ घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे देखील त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.  वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसल...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे ५० % बंदच. ब्रिजवरील  साईट संरक्षण कठड्याला  झाडेही होत आहेत मोठी.  कणकवली प्रतिनिधी   मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला ओटव ब्रिज वर ५० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे.यामुळे पथ दिवे असले तर शो साठी आहेत का ? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. तरी येत्या ४ दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास आंदोलनचा पवित्रा घेतला जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच या ब्रिजवर असलेल्या साईट संरक्षण कठड्याला छोटी  मोठी झाडे वाढलेली आहेत. तरी त्यांची पाळेमुळे मोठ्या प्रमाणात होण्याअगोदरच ती छाटून घ्यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी. इराण इस्रायल युद्धात  हॉर्मुझ समुद्रधुनीत  अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका. कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त. आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतात. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) इराण इस्रायल युद्धात इराकच्या  जरबो बोटीवर  हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या  महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे.  या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर  हा 23 वर्षे युवक अडकला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लक्षात आणून दिली होती.त्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून खा.नारायण राणे यांनी आपल्या भारतीय नाविक सेना युनियनचे जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवून प्रत्यक्ष त्या कंपनीतील अधिकाऱ्यांबरोबर आणि इराण,इराक,आणि इस्रायल येथील अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि दरडोई उत्पन्न वाढीसाठी एस एस पी एम च्या इंजिनिअर नी  उद्योजक बनून योगदान द्यावे— खासदार नारायण राणे यांचे आवाहन.  एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ स्नेहमेळाव्यात  केले मार्गदर्शन. AI व आधुनिक शिक्षणामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ; तज्ज्ञांचे मत   कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे,मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या हा आर्थिक उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असावा.येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावं,जिल्ह्यातील जनतेमध्ये आर्थिक समृद्धात यावी, यासाठी एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजच्या इंजिनिअर नी काम करावे. तशा पद्धतीचे शिक्षण घेऊन उद्योजक बनावे,स्वतःचे वेगळेपण समाजात निर्माण करून समाजात पुढे येऊन जावे,सर्वांगीण विकास प्रक्रियेत या माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचचे मोठे योगदान असावे असे  आवाहन माजी मुख्यमंत्री ,खासदार आणि एसएसपीएम चे संस्थापक  नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग शिक्षण ...

सिंधुदुर्ग today

इमेज
मुंबई गोवा महामार्गावर बेळणे येथे  कार व ट्रक यांच्यात अपघात.  अपघातात ४ जण जखमी ; जखमींना नरेंद्रचार्य संस्थांच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी दाखल. नांदगाव प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वा. मुंबई हून  गोवा ला जाणारी गाडी नं  MH 07AS. 2149 कार व  ट्रक धडक बसत अपघात झाला. या अपघात सुहास सहदेव माधव वय ३७ ,सुशांत सहदेव माधव वय.३५ , रामचंद्र सुहास माधव वय.०९ , स्वरा सुहास माधव वय.३२ सर्व राहणार - बांदा हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदगाव येथे असलेल्या जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य संस्थांची मोफत ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली व रुग्णवाहिकेचे चालक अमोल धोंडू तेली यांनी त्यांना उपचारासाठी कणकवली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ना. नितेश राणे हे राज्यभरात स्पष्टवक्ते, आक्रमक आणि हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या तरुण आणि प्रभावी नेतृत्वामध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांच्या या नियुक्तीमुळे रायगड दक्षिण जिल्ह्यात भाजप संघटनात्मक पातळीवर अधिक बळकटी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना. नितेश राणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
खत कंपन्यानी शेतकऱ्यांची  गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी - विठ्ठल देसाई. कणकवली खरेदी विक्री संघ संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक ; तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे खत तुटवडा निर्माण झाल्यास आता रोख स्वरुपात खत खरेदी सोसायटीना करावी लागणार आहे. आर्थिक भार पडत असेल त्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज आवश्यक असल्यास प्रस्ताव तातडीने करावेत. शासनाने युरियावरील सवलत कमी करावी,त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याऐवजी सुफला खतावर अनुदान वाढवावे.खत कंपन्याने शेतकऱ्यांची  गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी केले. वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे कणकवली खरेदी विक्री संघ संघाच्या वतीने खरीप हंगाम बैठकीत ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ , जिल्हा गुणवत्ता निरीक्षक सुशांत भोसले , जिल्हा मोहीम अधिकारी...

सिंधुदुर्ग today

इमेज
उद्या माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम. संजय नकाशे मित्र मंडळाच्या वतीने ट्रक चालक मालकांचा ५ लाखांचा उतरणार विमा. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १९ एप्रिल रोजी संजय नकाशे मित्र मंडळा तसेच स्वराज्य ट्रक चालक - मालक संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने संजय नकाशे मित्र मंडळ संपर्क कार्यालयात ट्रक चालक मालकांचा ५ लाखांचा विमा उतरणार आहे. तरी संबंधित ट्रक चालक मालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय नकाशे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मंडळ येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद. प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची उपस्थिती.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान आज  महसूल विभाग, महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, उपविभागीय कार्यालय कणकवली , तहसिलदार कार्यालय कणकवली मंडळ  नांदगाव यांच्या वतीने नांदगाव येथे संपन्न झाले  .  नांदगाव मधलीवाडी येथील महापुरुष सेवा संघ सभागृहात संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, कणकवली सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी अम्रीता चौगुले,मंडळ मधील सर्व तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार , 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्यांचे वाटप , उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र , नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र अकृषिक (NA) ...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रभा प्रकाशन कणकवली प्रकाशित नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन अमेरिकास्थित लेखिका पल्लवी शिंदे-माने लिखित ग्रंथ. कणकवली/प्रतिनिधी     कणकवली इथून सुरू करण्यात आलेल्या प्रभा प्रकाशनच्या अमेरिकास्थित मराठी लेखिका पल्लवी शिंदे माने लिखित 'नीलकांचन ' ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवार 19 एप्रिल रोजी सायं.4 वा. कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ.निर्मोही फडके यांच्या हस्ते सदर ग्रंथाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते पांडुरंग निरंजन भारती आणि चित्रपट दिग्दर्शक विजय शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.        प्रभा प्रकाशन कणकवली ही कोकणच्या प्रकाशन क्षेत्रातील आजची अग्रेसर प्रकाशन संस्था असून या संस्थेचे 'निलकांचन ' हे 42 वे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 'नीलकांचन ' या ग्रंथाच्या लेखिका पल्लवी शिंदे माने या मूळच्या कल्याणच्या असून सध्या त्या अमेरिकत स्थायिक झाल्या आहेत. मात्र तरीही अमेरिकेत राहून...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर विरोधात उपोषण स्थळी तहसीलदार यांनी दिली भेट  ई.टी.एस. मोजणी होईपर्यंत क्रशर बंदचा लेखी आदेश द्यावा. ग्रामस्थांची मागणी; उपोषण सुरूच. कणकवली /प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील ५१ घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक झाल्याने आज सकाळी १० पासून उपोषणाला सुरुवात झाली असून. आता सायंकाळी ७.३० पर्यंत तोडगा निघाला नव्हता ७.३० नंतर कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी भेट देत आंदोलनकांशी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ई.टी.एस मोजणी करावी व एटी.एस.मोजणी होईपर्यंत क्रशर बंद करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.      यावेळी मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव ,तोंडवली बावशी तलाठी चौगुले, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    ई.टी.एस. मोजणी ही भूमी अभिलेख, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे जमिनीतील अनधिकृत उत्खन...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर विरोधात उपोषण सुरुच. क्रशर बंद साठी ग्रामस्थ आग्रही. कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील ५१ घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक झाल्याने आज सकाळी १० पासून उपोषणाला सुरुवात झाली असून. आता सायंकाळी ७.३० पर्यंत तोडगा न निघाल्याने अद्याप उपोषण सुरूच आहे.      दरम्यान मंडळ अधिकारी नांदगाव तसेच तलाठी तोंडवली बावशी यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. मात्र ग्रामस्थ जोपर्यंत क्रशर बंद करण्याचा आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.       या उपोषणाला माजी परशुराम उपरकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन पाठींबा दिला.    यावेळी दाजी सदडेकर, चंद्रकांत बोभाटे, अतुल बोभाटे, दिपक शिरसाट , तेजस बोभाटे , तात्या निकम,आबु मेस्त्री, सुनिल बोभाटे , संतोष बोभाटे तसेच महिलांची ही उपस्थिती लक्षणीय आहे.     ...

सिंधुदुर्ग today

इमेज
ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई; देवगड येथील नौका जप्त सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली. सदर कारवाई रात्री साधारण १.०० वाजण्याच्या सुमारास, किनाऱ्यापासून सुमारे ९ समुद्री मैल अंतरावर व अंदाजे २० वाव (फॅदम) पाण्याच्या खोलीत करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान देवगड येथील सुरक्षा रक्षक बांधकर, खवले, टुकरुल, फाटक, नेसवनकर व सावजी यांनी सक्रिय सहकार्य केले. नौकेचे मालक व चालक हे देवगड येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्लीन सी’ ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव येथील बुवा विजय मेस्त्री यांचे निधन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील प्रसिद्ध बुवा विजय गंगाराम मेस्त्री यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते.      त्यांनी सुरुवातीच्या काळात शाळेचे स्नेहसंमेलन त्याचप्रमाणे कीर्तन यांच्यात पेटीवादन केलेले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर मुळे घरांना तडे. ग्रामस्थ १५ एप्रिल च्या आमरण उपोषणावर ठाम. कणकवली /प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक असल्याचे येथील नागरीकांनी जिल्हाधिकारीसह इतर प्रशासनासह व सबंधित ठेकेदार कंपनीस पत्रव्यवहार करून क्रशर बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदन देत करण्यात आली.          दरम्यान यावर कुठलाही प्रकारे शासन स्तरावर हालचाल न करता क्रशर सुरु असल्याने १५ एप्रिल २०२६ रोजी चे तोंडवली येथील क्रशरच्या समोरच आमरण  उपोषण होणारच असल्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.          तत्पूर्वी माहिती घेतली असता देवगड निपाणी राज्य मार्गाचे सिमेंट कॉंक्रीट काम सुरू करताना ठेकेदार कंपनीकडून तोंडवली येथील सहा एकर जागेत क्रशरचे काम चालू करून उत्खनन करण्यात आले होते.काही दिवस काम झाल्यानंतर खोलीईची पातळी खाली गेल्यावर येथे लावण्यात आलेला सुरुंग यामुळ परिसरातील १५० ते २०० फूटावर...

सिंधुदुर्ग today

इमेज
धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन  आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अजय कांडर यांचे प्रतिपादन  साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  सावंतवाडी/प्रतिनिधी      सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक असून आता सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन मिळत आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणार लेखक कवीच यापुढे चांगलं लेखन करू शकतो. नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे हे या प्रकारचे लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित केले गेलेले आंबेडकर चौक साहित्य संमेलन ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.           सिंधुदुर्ग सुपुत्र नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात गावक-यांची एकजुट. असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात एकमुखी ठराव ; पर्यावरण रक्षणाबरोबरच गावाचा एकोपा राखण्यासाठी निर्णय.   कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक , स्थानिकांचे हक्क , एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय घेण्यात आला. असलदे गावठणवाडी येथील असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली गाव सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , असलदे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब , माजी सरपंच सुरेश लोके, उद्योजक सुरेश डामरे , पत्रकार नरेंद्र हडकर , मानकरी उदय परब, शत्रुघ्न डामरे , दयानंद हडकर , प्रदीप हरमलकर , अनिल कोठारकर , अजय परब, प्रविण डगरे , सचिन लोके , मेहुल घाडी , योगेश ...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा; गुणवत्तेबाबत तडजोड नाही.  पालकमंत्री नितेश राणे. सिंधुर्दुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर)   सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात यावीत आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा  बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियेाजन अधिकारी यशवंत बुधावले उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रल...

सिंधुदुर्ग today

इमेज
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा काही वेळातच होणार भव्य वाढदिवस सोहळा साजरा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,आशिष शेलार रवींद्र चव्हाण ,सुनील तटकरे  कणकवलीत दाखल  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड, हे कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  समवेत  एकाच विमानातून ही मंडळी नेतेमंडळी चीपी  विमानतळ येथे  पोचली . मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले व कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ही सर्व नेते मंडळी पोचले आहेत. काही वेळातच नडवे नाका येथे आयोजित वाढदिवस 16 साठी हे मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मोरयेवाडी येथील सुलभा महादेव मोरये यांचे निधन. चिरे व्यवसायिक आप्पा मोरये यांना मातृशोक. कणकवली/प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील सुलभा महादेव मोरये यांचे आज पहाटे ५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे ,दोन मुली ,सुना ,नातवंडे, जावा, जावंई, दिर असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांच्या त्या वहिनी होत. तर चिरे व्यवसायिक आप्पा मोरये यांच्या त्या मातोश्री होतं.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे भाजपच्यावतीने बाजारात जिलेबी तर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.  नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ; समाज हिताचे उपक्रम राबवत राहणार.  कणकवली : प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री , खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपा नांदगावच्यावतीने नांदगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आले. तसेच नांदगाव बाजारपेठ येथे बाजारपेठ मध्ये आलेल्या नागरिकांना जिलेबी वाटत वाढदिवस साजरा करण्यात आला.          यावेळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जि.प.समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सुरेश लोके, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, शिवसेना विभागप्रमुख निरज मोरये,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, कमलेश पाटील, ऋषिकेश मोरजकर , आबा बिडये , नितेश म्हसकर, आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  समीर वेंगुर्लेकर यांच्या कादंबरीचे रविवारी सावंतवाडीत प्रकाशन कुडाळ/ प्रतिनिधी       शहरातील पंचायत समिती येथील कर्मचारी तथा कादंबरी लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या अभिनंदन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'वारसदार ' या कादंबरीचे प्रकाशन रविवार 12 एप्रिल रोजी सायं. 5 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.संध्या तांबे यांच्या हस्ते ' वारसदार '  कादंबरीचे प्रकाशन होणार असून साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.     समीर वेंगुर्लेकर गेली अनेक वर्ष निष्ठेने साहित्य लेखन करत असून कथा - कादंबरी असे दीर्घ लेखन ते सातत्याने करत असतात. यापूर्वी त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला असून आता वारसदार ही त्यांची कादंबरी प्रकाशित होत आहे.वारसदार कादंबरी संदर्भात प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी अभिप्राय नोंदवला असून ते या कादंबरी बद्दल म्हणतात, वारसदार ही कादंबरी आशयघन कादंबरी असून ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी हरिचंद्र भिसे यांच्या रानपुराण काव्यसंग्रहाचे रविवारी सावंतवाडीत प्रकाशन बांदा/ प्रतिनिधी     बांदा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा कवी हरिचंद्र भिसे यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'रानपुराण ' या दीर्घ कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार 12 रोजी सायं. 5 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून काव्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.      कवी हरिचंद्र भिसे हे गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत असून हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. वेगवेगळ्या भागातील निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात कवी भिसे यांनी कविता वाचन केले असून वेगवेगळ्या अंकांमध्येही त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. रानपुराण ही त्यांची दीर्घ कविता असून मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ.निर्मोही फडके यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण अतिशय समर्थ शब्दात केली आहे.डॉ.फडके या संग्रहाबद्दल म्हणतात की, रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
पत्रकार संघाच्यावतीने अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल भगवान लोके यांचा सत्कार. कणकवली : प्रतिनिधी  कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मानवतेच्या भावनेतून मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ चढावावर दुचाकी अपघातग्रस्त विव्हळत पडलेले लबिक पटेल , केतन वाडे या दोघांना स्वत: कारमध्ये घेवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यामुळे त्या दोघांचेही प्राण वाचण्यास मदत झाली आहे.  त्याबद्दल कणकवली पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ,रमेश जोगळे, चंद्रशेखर देसाई, सुधीर राणे, अजित सावंत , तालुका सेक्रेटरी संजय सावंत,खजिनदार रोशन तांबे, तुषार हजारे, राजन चव्हाण , विरेंद्र चिंदरकर, नंदकिशोर कोरगांवकर, संजय बाणे , उमेश बुचडे, विनय सावंत , उल्का तावडे , अस्मिता गिडाळे , रमाकांत बाणे , गणेश पारकर , विनोद जाधव , तुळशीदास कुडतडकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर  सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड.निरवडेकर यांच्या हस्ते उद्घघाटन - पुरस्कार वितरण, कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन १२ रोजी सावंतवाडीत संमेलन : आयोजक मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम यांची माहिती सावंतवाडी/प्रतिनिधी         सिंधुदुर्ग सुपुत्र प्रसिद्ध नाटककार कवी प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृह १२ एप्रिल रोजी सायं.५ वा. आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड.निरवडेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घघाटन होणार असून उद्घघाटन सत्रात सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या लेखन आणि कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यासत्रात निमंत्रित कवींचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख मधुकर मातोंडकर आणि विठ्ठल कदम यांनी दिली.          ज्येष्ठ कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला ज्ये...

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार. उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद  देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलाभाजपात पक्ष प्रवेश. शाखाप्रमुख, बूथप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.  मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश. देवगड (प्रतिनिधी):  देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद  देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शालघालून पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थितीत होते.जामसंडे-देवगड येथील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याने देवगड तालुक्यात उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. देवगड येथील उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख,बूथप्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये शाखाप्रमुख राजेंद्र शिरोडकर, बूथप्रमुख घननीळ कणेरकर, शाखाप्रमुख प्रदीप पडेलक...

सिंधुदुर्ग today

इमेज
“पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त”  प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय  समस्या सुटलेल्या नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन मानले आभार सिंधुनगरी : (ऋषिकेश मोरजकर)  पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५०  निवेदने प्राप्त झाली.यापूर्वी शंभर दीडशे निवेदने येत होती यावेळी मात्र ती संख्या घटली असल्याचे दिसून आले. यावेळी विकास कामांशी संबंधित मागण्यांची निवेदने अधिक होती.एकूणच, या संवादातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे ज्यांच्या समस्या मागील संवाद कार्यक्रमात सुटल्या गेल्या अशा नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभारी मानले.  पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या दालनात गेलेले घेतलेल्या या संवाद कार्यक्रमांमध्ये नागरिक, शिक्षक, संस्थाचालक, कंत्राटी कर्मचारी, आधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प...

सिंधुदुर्ग today

इमेज
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली / प्रतिनिधी परदेशी असलेल्या पतीच्या मैत्रीचा फायदा घेत त्याच्या पत्नीला शासकीय कामाच्या निमित्ताने बाहेर बोलावून शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुबारक शहाबुद्दीन साटविलकर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्याच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले. मार्च २०२३ ते मे २०२५ या कालखंडात फिर्यादी हीचे पती परदेशात असल्याने आरोपीने त्यांची शासकीय कामे तालुक्याच्या ठिकाणी असल्याचे सांगून विवाहितेला बोलविले. त्यानंतर तेथे शारिरीक संबंध प्रस्थापीत केले तसेच त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तीच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करून मुलांना गायब करण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर मा.न्या.सं. कलम ६४, (१), ६४ (२), ७४.७५, ७८ तसेच ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीची पोलीस कोठडीची मुद...

सिंधुदुर्ग today

इमेज
वेश्याव्यवसाय चालविल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी शहरातील लक्ष्मीकृपा लॉज येथे सुरू असलेल्या अनधिकृत वेशाव्यवसाय प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाने केलेल्या कारवाईमधील संशयित मालक बाबुराव नारायण सांडव, नोकर महंम्मद गौस साटविलकर रा. नांदगाव व संग्राम बोडके रा. कोल्हापूर यांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महिला अत्याचार निवारण कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी त्यांच्या पथकासह शहरातील लक्षीकृपा लॉज येथे पंच व बनावट ग्राहकांसह छापा घातला. बनावट ग्राहकाला १५०० रुपये लॉजमध्ये पाठविले. त्याने दिलेल्या इशाऱ्यावरून पोलीस व पंचानी प्रवेश केला त्यात मालक बाबुराव सांडव तसेच नोकर महंम्मद साटविलकर है आढळले. तसेच दोना महिलाही आढळल्या. त्या मुंबई व कोल्हापूर येथून वेशा व्यवसायासाठी आल्याचे कबुल केले. याबाबत त्यांचा मध्यस्...

सिंधुदुर्ग today

इमेज
  मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिमेला सुरुवात. मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहिम; कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेची सुरूवात 1 एप्रिल 2026 होत आहे. नव्या मतदारांची नोंदणी, अपात्र नोंदी वगळणे तसेच स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेमध्ये नेमून देण्यात आलेले  काम सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने पूर्ण करावीत. कामामध्ये हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल पासून विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिम सुरू झाली आहे. या अनुषंगाने कुडाळ येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण व आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या...