पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
सत्याचा शोध घेणे हेच काम कवीचे असते - अजय कांडर कवयित्री सुगंधा देवरुखकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन   कणकवली / प्रतिनिधी : सत्याचा शोध घेणे हेच काम कवीचे असते.पण डोळ्यांनी दिसणाऱ्या जगापेक्षा मनाच्या डोळ्यांना दिसणारे सत्य अधिक मोठे असते. या सत्याचा शोध कवयित्री सुगंधा देवरुखकर यांनी त्यांच्या 'मनश्चक्षू' या काव्यसंग्रहातून घेतला आहे. जगण्याच्या सर्व स्तरांना स्पर्श करणारे लेखन या काव्यसंग्रहात असून, कवयित्री देवरुखकर यांनी आपल्या लेखनातून माणुसकीला सर्वाधिक महत्त्व दिले आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी आणि सुप्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले.         येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभा प्रकाशन, कणकवली प्रकाशित, सुगंधा देवरुखकर लिखित 'मनश्चक्षू' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. साहित्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर कणकवली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. मगर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गोवि...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव विभागातील नवीन उबाठा सेना पदाधिकारी यांचा केला सत्कार. नांदगाव /प्रतिनिधी  सचिन लोके यांची कणकवली उपतालुकाप्रमुख तर सुरेश सुतार यांची उपविभाग प्रमुख  नियुक्ती केल्याने नांदगाव उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.       नांदगाव शाखेत झालेल्या या कार्यक्रमाला अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले, विभाग प्रमुख तात्या निकम, राजा नावलेकर ,अनिल नरे  ,दिलीप डामरे ,संजय डगरे शाखाप्रमुख , लक्ष्मण लोके , सचिन हरमलकर , राधा शिव घाडीगावकर, प्रकाश पाताडे. मोबीन साठविलकर, याकूब नावलेकर , मुराद बटवाले, करीम बटवाले, मुस्ताक नावलेकर ,शेरफुद्दीन नावलेकर ,खुदबुद्दीन नावलेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
मातृसेवा फाउंडेशनतर्फे झाराप केंद्रशाळेत स्वसंरक्षण अभियान मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सामंत सावंत यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधी -       शिक्षणातून सक्षमीकरण आणि जागरूकतेतून सुरक्षितता या विचारातून कार्यरत असलेल्या मातृसेवा फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण अभियान आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मातृसेवा फाउंडेशन आणि कुडाळ पोलीस विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.        या कार्यक्रमाला मातृसेवा फाउंडेशनचे मान्यवर विश्वस्त सुहास सामंत, संध्या सामंत आणि मिलिंद नाईक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वयोगटानुसार सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. आजच्या काळात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.         कुडाळ पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस मित्र या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चांगला वाईट स्पर्श ओळखणे, अनोळखी ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा. पाणी अडवा , पाणी जिरवाची घोषणाबाजी ; हुंबरट येथे जलसंधारणासाठी दोन्ही संस्थांचा पुढाकार. कणकवली : प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा, या उद्देशाने कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंबरट येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना जलसंधारणाच्या कामात सहभागी होण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा, हा संदेश घोषणाबाजी करुन देण्यात आला.  कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सिंधुदुर्ग या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत हुंबरट येथे श्रमदानातून शुक्रवारी हा वनराई बंधारा बांधला. यापूर्वीही या संस्थांनी विविध ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे उभारून जलसंधारणाच्या कार्यात योगदान दिले आह...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली तालुक्याचे १६०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण. अजून २००० हजार बंधारे बांधण्याचा संकल्प.  नांदगाव येथील नदी काठीच्या बंधार्‍याची केली जिल्हाधिकारी यांनी पाहणी.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील एकूण १६०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पूर्ण झाले असून अजून कणकवली तालुक्यात २००० हजार बंधारे बांधण्याचा संकल्प केला असल्याचे सभापती सौ हर्षदा वाळके यांनी बोलताना सांगितले आहे.          नांदगाव येथील आरोग्य संवाद यात्रा अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासूर यांनी नांदगाव पावाची वाडी नदी काठी नांदगाव ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली.       यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, पंचायत समिती सदस्य सौ. महेश्वरी चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या अक्षता खोत, गौरी परब, रमिजान बटवाले आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर; आरोग्य यंत्रणेने जनतेपर्यंत पोहोचावे – नितेश राणे. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य यात्रा राबविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील दुर्गमता लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचणे तसेच नेटवर्कच्या समस्या अशा विविध अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा ; नांदगाव येथे आज होणार जिल्ह्याचा शुभारंभ. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग यांच्या वतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला शुभारंभ आज नांदगाव आरोग्य केंद्र येथे सकाळी ११.३० वा. होणार होणार आहे. पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार प्रमोद जठार, आमदार अँड निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक  केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार अनिल तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साहील,  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर , जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, सर्व विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती पंचायत समिती कणकवली , नांदगाव सरपंच तसेच आरोग्य अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.       मुलांच्या आरोग्याची तपासणी यावेळी केली जाणार आहे.तसेच नागरीकांची आरोग्य तपासणी, आयुष्य मान कार्ड ,आभा कार्ड ,वय वंदना कार्डची...