सिंधुदुर्ग today
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड.देवदत्त परुळेकर यांचा गौरव. अभिनेत्री रोहिणी हट्टगडी, मुंबई म.न.पा.आयुक्त अश्विनी भिडे यांची उपस्थिती कणकवली / प्रतिनिधी प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'आजच्या काळासाठी तुकोबा' या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा सिंधुदुर्गातील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्येष्ठ विधिज्ञ तसेच मालवण बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर यांना मुंबई गिरगाव साहित्य संघात मुंबई मराठी साहित्य संघाचा प्रतिष्ठेचा वि. स. पागे आध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव साहित्य संघात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्काराने ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टगडी आणि संघाच्या सेक्रेटरी प्रतिभा सराफ यांच्या हस्ते ॲड. देवदत्त परुळेकर यांना गौरविण्यात आले. रोख १० हजार रुपये आणि विठ्ठल रखुमाई मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेतील त्यांचा सखो...