सिंधुदुर्ग today
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी संशयित आरोपीला सशर्थ जामिन.
ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली- कुडाळ पोलीस स्टेशन गु.र.नं ५३/२०२६ चे कामी पराग सुहास वळंजू, राहा-देवगड, जिल्हा-सिंधुदुर्ग यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) अंतर्गत कलम १३७ (२), ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ६५ (१) व ७५ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) अंतर्गत कलम ४, ६ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी यास रु.५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी दिले. आरोपीच्यावतीने वकील कु.प्राजक्ता म.शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांनी काम पाहिले.
याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १५/०२/२०२६ रोजी सकाळी ११.३० वा. चे मानाने फिर्यादी यांचे पतीने पिडीत अल्पवयीन मूलगी हिला तिच्या कुडाळ येथील मैत्रीणीच्या घरी अभ्यासाकरीता नेऊन सोडलेले होते. परंतु ती परत घरी न आल्याने पिडीत अल्पवयीन मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असून सुध्दा कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले म्हणून यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होता. गुन्हयाच्या तपासादरम्याने पिडीत अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी हे दिनांक २२/०२/२०२६ रोजी फोंडा ता. कणकवली येथे मिळून आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेवून कुडाळ पोलीस ठाणे येथे आणुन पिडीत अल्पवयीन मुलगी हिचेकडे चौकशी केली असता, तिने आरोपी हा तिला दिनांक १५/०२/२०२६ रोजी कुडाळ येथे भेटण्याकरीता आला. त्यानंतर आरोपीत याने पिडीत अल्पवयीन मुलगी हिला आपण कोठेतरी लांब फिरायला जावुयात असे सांगुन तिला कणकवली बस स्टॅण्ड येथे घेवुन गेला कणकवली बस स्टॅण्डवर गेल्यावर आरोपी याने पिडीतेला आपण कोठेतरी फ्रेश होऊयात असे सांगुन तिला लॉजवर घेवुन गेला व तिचेशी शारिरीक संबंध केले. त्यानंतर दिनांक १५/०२/२०२६ रोजी सायंकाळी संशयित आरोपी हा पिडीतेला गोवा येथील बागा बीचचे शेजारी असलेल्या लॉजवर घेवुन जावून तेथे दिनांक १६/०२/२०२६ रोजीपर्यंत शारिरीक संबंध केले. दिनांक १७/०२/२०२६ रोजी आरोपी याने पिडीतेला दिवसभर गोवा येथे फिरवुन सायंकाळी ट्रेनने मुंबई येथे गेला. दिनांक १८/०२/२०२६ रोजी मुंबई येथे पोहचल्यावर तेथे सुध्दा आरोपीत याने पिडीतेला दिवसभर फिरवून दिनांक १९/२/२०२६ रोजी ट्रेनने गोवा येथे गेला. दिनांक २१/०२/२०२६ रोजी मुंबई येथे घेवून गेला व दिनांक २२/०२/२०२६ रोजी पिडीतेला त्याचे नातेवाईकांकडे फोंडा ता-कणकवली येथे घेवून गेला असा जबाब पिडीतेने दिला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्ह्यातील संशयित आरोपी यास अटक करून गुन्ह्याचे तपासकाम पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तद्नंतर संशयित आरोपी पराग वळंजू यांचेकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी अंती मे. विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी दिनांक ०५/०५/२०२६ रोजी संशयित आरोपी पराग वळंजू आरोपी यांची रु.५०,०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा