सिंधुदुर्ग today
जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन केले पूर्ण.
नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील होते अपूर्ण स्ट्रीट लाईट.
कणकवली /प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान ग्रामपंचायत सदस्य जैबा नावलेकर यांनी संतोष पारकर यांना वाडीतील स्ट्रीट लाईट अपूर्ण असलेल्या कामाबाबत निदर्शनाला आणून दिले होते. त्यांनी निवडणुक वेळी आश्वासन दिले होते की ,स्वखर्चाने काम करून दिले जाईल. दिलेला शब्द पाळत जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण करून दिले व मुस्लिम बांधवांची ईद गोड केली. आज ईद निमित्त त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने मुस्लिम बांधवांकडून जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, यासिर मास्के,तोसिम नावलेकर ,समीर नावलेकर, कासम पाटणकर, आमिर नावलेकर, मैनुद्दीन नावलेकर ,नझरूद्दिन पाटणकर नियाज पाटणकर आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा