सिंधुदुर्ग today
नांदगाव मंडलचे ९ मे रोजी विशाल हिंदू संमेलन.
बहुसंख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव सकल हिंदू समाज मंडल च्या वतीने शनिवार दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळेत नांदगाव वाघाची वाडी येथील गीता भवन सभागृह येथे विशाल हिंदू संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे.सर्व प्रथम सौ. आरती बापट यांचे समाजप्रबोधन पर किर्तन होणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ मिलिंद कुलकर्णी, व शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक श्री अभय जगताप उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाज नांदगाव मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा