सिंधुदुर्ग today
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
मनसे विद्यार्थी सेनेचा समाजसेवेचा उपक्रम
कणकवली : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अनिकेत अनंत तर्फे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये यांनी, “समाजसेवेची बांधिलकी जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे हीच खरी कार्यकर्त्यांची ओळख आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे मनसे तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये उपतालुकाध्यक्ष श्री अतुल दळवी, मनविसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री समीर तेली, कणकवली शहराध्यक्ष श्री देवेंद्र जाधव, महाराष्ट्र सैनिक श्री सुनील सोनार यांच्यासह मनसे व मनविसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा