सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे झाले जंगी स्वागत.
प्रमोद जठार यांनी मानले सर्वांचे आभार.
कणकवली प्रतिनिधी
नवनिर्वाचित आमदार श्री प्रमोद जठार यांची नुकतीच आमदार (विधानपरिषद सदस्य) म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या सिंधुभूमीत आल्याने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात भव्य स्वागत होत आहे. याचाच एक भाग म्हणून आज नांदगाव तिठा येथे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, शिंदे सेनेचे विभाग प्रमुख निरज मोरये, रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, प्राची मोरये,दाजी मोरये, असलदे उपसरपंच सचिन परब, रघुनाथ लोके, राजेंद्र मोरजकर, शामसुंदर मोरजकर, कमलाकर पाटील, नितेश म्हसकर, पांडू तेली आदी बहुसंख्येने नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा