पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ची साथ! पालकमंत्री नितेश राणे यांच्या  संकल्पनेतून  “कृत्रिम बुद्धिमत्तेवर” आधारित होणार शेती.  आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांचा सहभाग कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि     अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती राबविणार उपक्रम. उत्पादनात  २५ टक्क्यांनी वाढणार, तर पाणी-खत-कीटकनाशकांच्या वापरात  ३० टक्के बचत. सिंधुदुर्गनगरी : (ऋषिकेश मोरजकर) हवामान बदल, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असताना आता सिंधुदुर्गातील फलोत्पादनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित स्मार्ट शेतीचा दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये २०० आंबा आणि २०० काजू उत्पादक अशा ४०० शेतकऱ्यांचा समावेश असून, AI, IoT, उपग्रह तंत्रज्ञान, मृदा सेन...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी  ‘लव्ह जिहाद’चा डाव  उधळला. अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा केला होता प्रयत्न.  राणेंच्या जिल्ह्यात "लव्ह जिहाद" खपवून घेणार नाही. कणकवली भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा. कणकवली : अल्पवयीन हिंदू धर्मीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह करण्याचा मुस्लिम युवकाचा लव्ह जिहादचा प्रयत्न भाजपा पदाधिकात्यांनी कणकवलीत हाणून पाडला. त्या मेहबूब जैनुद्दीन लदाफ (वय २७) या मुस्लिम युवकाने तिला प्रेमाच्या मोहात पाडून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. ती अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी लग्नाबाबत जिल्हा निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहीती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे सदर युवतीच्या कुटुंबियांनी तक्रार केली. त्यानुसार सदर विवाह लव्ह जिहादचा प्रकार असल्याने तो उधळल्याची माहीती कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक राकेश राणे यांनी दिली. तर राणेंच्या जिल्हा असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके. असलदे गावात लोकप्रतिनीधी भातपिक शेतक-यांच्या बांधावर  ; नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे तातडीने करा. कणकवली: प्रतिनिधी  अल निनोच्या वादामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील आम्ही शेतक-यांच्या बांधावर जात आहोत. भातपीक नुकसानग्रस्त गावांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असलदे गावातील शेतक-यांच्या बांधावर गेलो. भीषण अशी परिस्थिती दिसून येत आहे. शेतक-यांची वर्षभराची भातपीकाची बेगमी ही पूर्णपणे नष्ट झाल्याची भिती शेतक-यांच्या डोळ्यात दिसत असल्याची प्रतिक्रिया सभापती हर्षदा वाळके यांनी दिली.  दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात असलदे गावातील भातपीक नुकसाग्रस्त शेतक-याच्या बांधावर सभापती हर्षदा वाळके , जिल्हा परिषद संतोष पारकर, सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके या लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधत येत असलेल्या अडचणीबाबत चर्चा केली. यावेळी असलदेत ग...