सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे होणार आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत.
उद्या सकाळी ९ वा. होणार स्वागत.
कणकवली प्रतिनिधी
श्री प्रमोद जठार यांची नुकतीच आमदार (विधानपरिषद सदस्य) म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या सिंधुभूमीत येत आहेत. त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात भव्य स्वागत होत आहे. याचाच एक भाग म्हणून नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी नांदगाव तिठा ब्रिज खाली देवगड ला जाताना शुक्रवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ठिक ९.०० वा. स्वागत होणार आहे. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा