सिंधुदुर्ग today
असलदे ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याची घेतली शपथ.
गावच्या विकासासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी मानकरी उदय परब यांची निवड.
कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये परप्रांतीयांना जमीन विक्री होवू नये , या पार्श्वभूमीवर गावाची संस्कृती, पर्यावरण, पारंपरिक शेती आणि सामाजिक एकात्मता अबाधित राखण्यासाठी जमीन विक्रीस बंदी करण्याचा निर्णय गावसभेने घेतला होता. त्यानुसार संभाव्य नियमावली तयार करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण हितासाठी , पर्यावरण रक्षणासाठी गावातील मानकरी मंडळी व प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत पुन्हा घेतलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याचा एल्गार करत ग्रामदेवता श्री देव रामेश्वर पावणादेवीला समोर ठेवून शपथ घेतली. या बैठकीत असलदे गावच्या हितासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे मानकरी उदय परब यांची निवड एकमताने करण्यात आली.
असलदे श्री देव रामेश्वर पावणादेवी चव्हाटा येथे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा पार पडली. यावेळी सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब , अजय परब , छत्रुघ्न डामरे ,पत्रकार नरेंद्र हडकर, परशुराम परब ,शामराव परब , उदय परब, आत्माराम घाडी , तुषार घाडी , प्रदीप हरमलकर , अनिल तांबे , सचिन लोके , दिलीप डामरे , संदेश आचरेकर , प्रकाश आचरेकर , मनोज लोके , महेश लोके , सुनील तांबे, शामराव परब, दिनेश शिंदे , बाबाजी शिंदे , सुनील परब, प्रभाकर परब , माजी सरपंच विलास जांभळे ,मधुसुदन परब , दीपक शिंदे , विजय डामरे , मेहुल घाडी, सुभाष तांबे , मिलींद तांबे अशोक पाताडे , जयप्रकाश पाताडे , बाळकृष्ण परब, वासुदेव दळवी , सतीश पांचाळ, बाबू जांभळे , सुरेश मेस्त्री ,संतोष घाडी , योगेश डामरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
असलदे गावातील असलेल्या जमिनी , बागायती या वडिलोपार्जित आहेत. त्यामुळे जशा पूर्वजांनी या जमिनी पुढच्या पिढीपर्यंत पोटाला चिमटा काढून राखून ठेवल्या त्या जमिनी राखून ठेवण्याची जबाबदारी आपल्या पिढीची आहे , असा मुद्दा या बैठकीच सर्वांनी मांडला. गावातील शेती, बागायती व घरजमीन विक्रीपूर्वी गावसभेला माहिती देणे बंधनकारक राहील.जर एखाद्याला जमीन विक्रीची अत्यंत गरज असल्यास गावातील जमीन विक्री करताना प्रथम प्राधान्य भावकीला , शेजा-याला , वाडीतील ग्रामस्थांना त्यानंतर गावातील नागरिकांना जमीन विक्री करता येईल. जमीन व्यवहारामुळे गावाची संस्कृती, पर्यावरण, पारंपरिक शेती व सामाजिक एकात्मता बाधित होणार नाही, याची काळजी घेण्याचा निर्णय सर्वांनुमते गावबैठकीत घेण्यात आला आहे.
गावात आगमी काळात एखादा निवासी प्रकल्प होत असेल तर कृषी जमीन बिगरशेती (NA) करण्यापूर्वी ग्रामसभेचे मत विचारात घेण्यात यावे. तसेच संबंधित प्रकल्पाची माहिती ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व सदस्यांनी गावसभेला देणे आवश्यक आहे. गावातील गाव सभेतील झालेल्या परप्रांतीयांना जमीन विक्रीच्या झालेल्या विकासकांकडून प्रतिज्ञापत्र गावसभेला व ग्रामपंचायतला लिहून घेणे बंधनकारक राहिल. त्यानंतरच बिगरशेती निवासी प्रकल्पासाठी किंवा बिनशेती करणा-या वैयक्तिक जमीन धारकांना नाहरकत दाखला देण्यात यावा. गावातील सार्वजनिक रस्ते, पाणवठे, देवस्थान परिसर, स्मशानभूमी, सार्वजनिक जागा यांच्यावर कोणत्याही खासगी व्यवहाराचा परिणाम होणार नाही याची खात्री करावी. कारण एखादा जमीन विकसित किंवा विक्री झाल्यानंतर वाद विवाद होवू नये म्हणून याबाबत पूर्व कल्पना गावसभेला देवून परवानगी मिळाल्यानंतर विक्री व्यवहार करावा , असे या सभेत ठरवण्यात आले.
गावसभा गावाच्या विकास, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक हक्कांच्या दृष्टीने आवश्यक सुचना व बैठकीतून अंतिम निर्णय करण्यासाठी ही नियमावली गावाच्या सर्वांगीण हितासाठी असून सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी असेल. तसेच गावातील अवैध धंदे, प्रदुषणकारी प्रकल्प याविरोधात ग्रामसभेतील ठरावाप्रमाणे यापुढील काळातही कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार गावक-यांनी केला आहे. आपल्या गावाची एकजुट ठेवत या पुढील काळात गावच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घेवून एकत्रित काम करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामविकास समितीची स्थापना -
असलदे गाव बैठकीत गावाच्या विकासात्मक निर्णयांसाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष मानकरी उदय परब , उपाध्यक्ष तुषार घाडी , उपाध्यक्ष छत्रुघ्न डामरे, सचिव प्रदीप हरमलकर , सहसचिव रघुनाथ लोके , खजिनदार सचिन लोके , सल्लागार भगवान लोके , चंद्रकांत डामरे , पंढरी वायंगणकर , प्रशांत तांबे , देवेंद्र लोके , दयानंद हडकर , अजय परब यांच्यासह 40 ग्रामस्थांची समिती स्थापना करण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा