पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी दिनांक ३० (ऋषिकेश मोरजकर) :- जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या.  तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनिय बातमिदारांमार्फत माहिती काढून असे करत असलेल्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे N-CORD संदर्भातील मासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते. तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करणेसाठी, शाळा / कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांचे परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी संबधीत विभागांना आदेशीत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यत्त्वे लगतचे गोवा राज्य आहे. त्या राज्...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन  सिंधुदुर्गनगरी दिनांक ३० (ऋषिकेश मोरजकर) :- जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलाक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च  व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.   या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी  (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्ष...

सिंधुदुर्ग today

इमेज
सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.! कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.! पोलिसांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; असतील तेवढे आरोपी जेरबंद होतील.! पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विश्वास.! कणकवली : प्रतिनिधी  बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २७ मार्च रोजी कणकवली येथे सुशांत दळवी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली, तरी खुनाची पद्धत व स्वरूप पाहता हे कृत्य एकट्या व्यक्तीकडून झालेले नसून यात इतरही काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीची शारीरिक स्थिती लक्षात घेता त्याच्याकडून एकट्याने असे कृत्य होणे संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. तसेच, मुख्य सूत्रधारांनी पोल...

सिंधुदुर्ग today

इमेज
मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल; नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर): मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा १०० टक्के पूर्ण करत, सर्व संबंधित विभागांना निधी वितरित करण्याच्या कामगिरीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थानी तर अमरावती द्वतीय स्थानी आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीमुळे राज्यात जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात विविध सरकारी विभागांच्या सुमारे १०० योजनांच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व योजनांना गती देण्यासाठी राज्य शासनाने २८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष बाब म्हणजे, मार्च अखेर उजाडण्यापूर्वीच हा संपूर्ण निधी संबंधित विभागांना यशस्वीपणे वितरित क...

सिंधुदुर्ग today

इमेज
व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (ऋषिकेश मोरजकर .) :केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial )  ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण 50% वाटपातून पात्र होण्‍यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या City Gas Distribution (CGD) संस्थेकडे Piped Natural Gas (PNG) जोडणीसाठी अर्ज करण्‍यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या २७ मार्च २०२६च्या पत्रान्वये सुचवले आहे. त्‍याकरिता  ग्राहकांनी खालील दिलेल्‍या नंबरवर अथवा कंपनीकडे संपर्क साधावा.  Address –   Maharashtra Natural Gas Limited, Shree...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. कणकवली /प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २८ मार्च रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते  जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी. सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (ऋषिकेश  मोरजकर) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या किंवा इतर असुरक्षित साधनांमध्ये पेट्रोल-डिझेलची साठवणूक करीत असल्याबाबत आढळून  आले आहे. पेट्रोल आणि डिझेल हे अति-ज्वलनशील पदार्थ आहेत. निवासी क्षेत्रांमध्ये, गजबजलेल्या ठिकाणी किंवा अनधिकृत गोदामांमध्ये अशा प्रकारे इंधनाचा साठा करणे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. निवासी भागात किंवा असुरक्षित ठिकाणी त्यांचा साठा करणे हे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि मानवी जीवनासाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अनिवार्य आहे.  ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२  हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार. हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.  सिंधुदुर्ग today : (ऋषिकेश मोरजकर) चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी  मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालक...

सिंधुदुर्ग today

इमेज
आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजय कांडर प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरधवल परब निमंत्रित नाटककार सिद्धार्थ तांबे यांच्या स्मरणार्थ १२ एप्रिल रोजी सावंतवाडीत संमेलन संमेलन आयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती सावंतवाडी / प्रतिनिधी      'जाता नाही जात' या गाजलेल्या नाटकाचे लेखक - कवी सिंधुदुर्ग सुपूत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे (शिरवल/कणकवली) यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या सिंधुदुर्गातील मित्रमंडळींतर्फे कवी तांबे यांच्या गाजलेल्या 'आंबेडकर चौक' या शीर्षकाने साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी वीरधवल परब यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविवार 12 एप्रिल रोजी सायं.4.30 वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य तथा कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी दिली. ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापती पदी ओटव गावच्या रुहिता राजेश तांबे. सर्वत्र होत आहे अभिनंदन. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य रुहिता राजेश तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या समाज कल्याण सभापती बिनविरोध निवड झाली आहे.ओटव गावच्या माजी सरपंच असलेल्या रुहिता राजेश तांबे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिंदे शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. आज त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या अगोदर ओटव गावाला मंगेश तांबे यांनी ही जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पद भुषविले होते. रुहिता तांबे समाज कल्याण सभापती झाल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  समस्त नांदगाव गावाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके यांचा झाला सन्मान.  जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचाही झाला सत्कार.  जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीताने कार्यक्रमाची शानदार उद्घाटन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके, यांचा नांदगाव गावाला प्रथमच सभापती पद मिळाल्याने समस्त नांदगाव वासियांतर्फे सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.तसेच कासार्डे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव गावची सुकन्या तसेच वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ जिल्हा परिषद सदस्या सौ. रिद्धी सुतार तसेच कासार्डे पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कल्पवृक्ष देवून सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.        कार्यक्रम सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली.      ...

सिंधुदुर्ग today

इमेज
समस्त नांदगाव गावाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके यांचा झाला सन्मान.  जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचाही झाला सत्कार.  जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीताने कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके, यांचा नांदगाव गावाला प्रथमच सभापती पद मिळाल्याने समस्त नांदगाव वासियांतर्फे सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.तसेच कासार्डे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव गावची सुकन्या तसेच वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ जिल्हा परिषद सदस्या सौ. रिद्धी सुतार तसेच कासार्डे पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कल्पवृक्ष देवून सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.        कार्यक्रम सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली.        ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील श्रीराम मंदिर चा सुवर्ण महोत्सवी निमित्त विविध कार्यक्रम.  राम नाम लेखन ,चित्रकला , पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन. उद्या संतोष जोईल विरुद्ध समीर कदम डबलभारी भजनाचा सामना.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील श्रीराम मंदिर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री राम नाम लेखन,चित्रकला, पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर उद्या बुधवार दिनांक २५ मार्च रोजी रात्री ठिक ९ वा. बुवा श्री. संतोष जोईल विरुद्ध समीर कदम यांच्या डबलभारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.     तसेच श्री राम नवमी उत्सव दिवशी सकाळी ८ वा. श्रींची पुजा , सकाळी १० वा.किर्तन सौ. आरती बापट नारिंग्रे देवगद , १२.४० श्री राम जन्मोत्सव दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांचे भजन, सायंकाळी ६ वेशभूषा स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता श्री राम पालखी सोहळा मिरवणूक, रात्री ११ वा. अमृथनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा भव्य नाट्य प्रयोग होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई :दि.२३ :  महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे  सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपे...

सिंधुदुर्ग today

इमेज
आदर्श व्यापारी संघटना तळेरेची महिला व्यापारी संघटना स्थापन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना.  पहिली महिला व्यापारी संघटनेची अध्यक्षा सौ. संपदा महाडिक यांची एकमताने निवड.  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील तळेरे आदर्श व्यापारी संघटनेची महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना म्हणून ठरली आहे.     आदर्श व्यापारी संघटना तळेरे संलग्न महिला व्यापारी संघटना, तळेरे ची स्थापना आणि त्या निमित्त मेळाव्याला उपस्थित महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर,अशोक गाड, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, माने मॅडम,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदिप घाडी,सौ.अलका नारकर, अध्यक्ष श्री.राजू जठार, कार्याध्यक्ष अमोल सोरप, सहसेक्रेटरी आदित्य महाडिक, सहखजिनदार अशोक तळेकर, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पिसे, प्रविण वरुणकर, बाळा कदम,सचिन पावसकर,नामदेव...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (ऋषिकेश मोरजकर) : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची  तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे आणि नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंव...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे उद्या  २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २१ मार्च रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अनुषंगाने सर्व पक्षांची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि. २० (प्रतिनिधी) : - मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६च्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः सन २००२ च्या मतदार यादीतील मतदारांचे सध्याच्या यादीशी मॅपिंग करून अचूकता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मतदार यादीतील मृत (Dead), दुबार (Duplicate) नावे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे तातडीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदार यादी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ओ. (BLO) सोबत राजकीय पक्षांनी बी.एल.ए. (BLA) यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप बी.एल.ए. नियुक्त झालेले नाहीत, त्या ठिकाणी तात्काळ नेमणुका करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बी.एल.ओ. आणि बी.एल.ए. यांनी...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत पालकमंत्री नितेश राणे सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर  २८ वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल ; सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना सिंधुदुर्गनगरी, दि. १९ (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.  जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनवि...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे व गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) ना.डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते होणार हस्तांतरण सोहळा सिंधुदुर्ग : (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत होणार आहे.  या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्...

सिंधुदुर्ग today

इमेज
अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंबा काजू आढावा बैठकीत  आश्वासन; - शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही;सरकारचा निर्धार - शेतकऱ्यांना मिळणार समाधानकारक नुकसान भरपाई ;  मुख्यमंत्र्यांच्या  अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना  - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण  पाठपुराव्याला मोठे यश  -  पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची होणार पूर्तता. सिंधुदुर्ग today : (ऋषिकेश मोरजकर) कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी  आढावा बैठकीत सांगितले.  मुंबई येथील  विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात  मुख्यमंत्री...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा  वाढदिवस शाळेतील मुलांसमवेत साजरा  प्राची मोरये व निरज मोरये यांच्या कडून आयोजन कणकवली / प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा वाढदिवस प्रशालेतील मुलांसोबत साजरा करण्यात आला .       निरज मोरये व प्राची मोरये यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना केक वाटप आज करण्यात आले . गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास ३०० मुलांना केक वाटप करण्यात आले आहे.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, शिवसेनेचे कासार्डे विभाग प्रमुख निरज मोरये, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, सौ. प्राची मोरये आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १७ मार्चला महत्त्वाची बैठक. मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन.  आंबा,काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर.  कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार, १७ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजता  मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जात त्यांच्या प्रश्नांची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री, राज्यमंत्री, कोकणातील आमदार-खासदार आण...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना होणार केक वाटप. प्राची मोरये व निरज मोरये यांच्या कडून आयोजन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा होणार आहे. प्राची निरज मोरये यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना केक वाटप करण्यात येणार आहे. उद्या मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी १० वा. नांदगाव गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३०० मुलांना केक वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व हितचितक यांनी कार्यक्रम ला उपस्थित रहावे आणि मुलाचं आनंद द्विगुणित करावा.

सिंधुदुर्ग today

इमेज
बंदुकीची गोळी लागून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे जामीन मंजूर. अॅङ उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी रानटीजनावरांच्या शिकारीसाठी सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील जंगलात गेलेले असताना जनावराच्या आवाजाच्या दिशेने काडतूसी बंदूकीतून मारलेला बार लागून साथीदार सचिन सुभाष मर्गज (रा. वेर्ले, ता. सावंतवाडी) याच्या अपमृत्यू प्रकरणी अटकेत असलेला सिप्रियान अँथोनी डान्टस रा. सावंतवाडी याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. त्यांना अॅङ फरहान राजगूरू यांनी सहकार्य केले. दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ राऊळ याचा मावसभाऊ सचिन मर्गज आणि सिप्रियान डान्टस असे दुचाकीने ओवळीये येथील गाड्याचे गाळू येथील जगंलात शिकारीसाठी गेले होते. तेथे मयत सचिन हा रानटी जनावरांना डुसक्यण्यासाठी जंगलात गेला होता. काहीवेळाने जंगलातील पालापाचोळ्याचा आवाज आला. तो रानटी जनावरांचा आहे या समजूतीतून संशयिता सिप्रियाने याने त्याच्या बारा बोअर डबल बॅरल काडतूस बंदूकीतून गोळी झाडली. सदरची गोळी सचि...

सिंधुदुर्ग today

इमेज
नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना कणकवली सभापती सौ हर्षदा वाळके यांनी दिल्या शुभेच्छा. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांना आज कणकवली पंचायत समिती सभापती सौ. हर्षदा वाळके यांनी जिल्हा परिषद ठिकाणी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या आहेत.       आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्री प्रमोद कामत यांच्या गळ्यात पडली तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदी तुकाराम ऊर्फ दादा साहिल यांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांनी आज ओरस येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली - बावशी मित्रमंडळाच्या वतीने १५ मार्च ला राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील तोंडवली - बावशी मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा या तोंडवली कुडतरकर वाडी गो - शाळा मैदानावर होणार आहे.नांदगाव तिठा पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर या स्पर्धा रंगणार आहेत.        यात राज्यस्तरीय घाटी गट तर जिल्हास्तरीय घाटी व गावठी गट अशा गटात स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आकर्षक बक्षिसांची खैरात असणार आहे. तरी या स्पर्धेचा उपस्थित राहून जनतेने आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नाटककार - कवी सिध्दार्थ विष्णू तांबे लेखन आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर. लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे  तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड. पुरस्कार संयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती. सावंतवाडी/प्रतिनिधी        नाटककार कवी कार्यकर्ते आणि निष्ठावंत प्राध्यापक अशी ओळख असलेल्या प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे अकाली निधन झाले.आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या साहित्यिक मित्रमंडळीतर्फे एप्रिल मध्ये तांबे यांच्या गाजलेल्या आंबेडकर चौक या कवितेच्या शीर्षकाने आंबेडकर चौकातील साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येत आहे.यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे (ओरोस) यांना तर सिद्धार्थ विष्णू तांबे कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते अनिल जाधव (वेंगुर्ले) यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम,स्मृती चिन्ह,शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक कवी विठ्ठ...

सिंधुदुर्ग today

इमेज
गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा  विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई, दि.१२   : इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन  विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिले आहेत. घरगु...

सिंधुदुर्ग today

इमेज
आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार -कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार -माझ्या जिल्ह्यातील  शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून  येथे तुमच्यासाठी पोचलो   ९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर -सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने  शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणेंचे केले कौतुक  सिंधुदुर्गनगरी ;(ऋषिकेश मोरजकर) बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे  यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे  बैठक व अन्य प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर मी बैठक  घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे दूध डेअरी चे थाटात उद्घाटन ; नांदगाव पंचक्रोशीचे सरपंच उपस्थित  नांदगाव /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव या संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून नांदगावमध्ये दुग्ध व्यवसाय सुरू होत आहे. आज  नांदगाव ओटव फाटा येथील या दुध डेअरीचे उद्घाटन समारंभ नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यासाठी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या सहीत नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, बेळणे सरपंच अविनाश गिरकर , सावडाव सरपंच आर्या वारंग , ओटव माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्या रुहीता तांबे, माजी जिल्हापरिषद सदस्य नागेश मोरये, गोकुळ दूध संघाचे सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी राजेश गावकर,सुपरवायझर पुंडलिक येंडे, रोहित शिंदे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन विठोबा कांदळकर, नांदगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झेमणे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य सदस्य विनोद मोरये, संतोष बिडये, अक्षता खोत , जैबा नावलेकर , रमिजान बटवाले तसेच ओटव माजी सरपंच हेमंत पर...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली नवनिर्वाचित सभापती हर्षदा वाळके यांनी घेतली नामदार नितेश राणे यांची भेट कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. हर्षदा हनुमंत वाळके यांनी आज सभापती निवडी नंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेले  बंदर विकास मत्स्य उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कडून शुभेच्छा घेतल्या. त्यांच्या सोबत महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे उद्या दूध डेअरी चे उद्घाटन  नांदगाव /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव या संस्थेची स्थापना करून नांदगाव दुग्ध व्यवसाय सुरू होत आहे. उद्या गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नांदगाव वटव फाटा येथील या दुध डेअरीचे गणेश पूजन व उद्घाटन समारंभ नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंनी ,नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधु चषक २०२६ चा विजेता पंचक्रोशी जामसंडे. कोळोशी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा,सिंधुपुत्र कोळोशी उपविजेता. नांदगाव/वार्ताहर        सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी आयोजित सिंधु चषक २०२६ कबड्डी स्पर्धेत दमदार खेळ करत अंतिम सामन्यात सिंधुपुत्र कोळोशी संघाला पराभूत करत जामसंडे पंचक्रोशी संघाने विजेतेपद पटकावत सिंधु चषक उंचावला.या स्पर्धेत मिळालेली बक्षीसाची रक्कम जामसंडे संघाने दिवीजा वृध्दाश्रम असलदे यांना देणगी घोषित करून सामाजिक बांधिलकी जोपासली.        प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या सिंधु चषक २०२६ चा उद्घाटन सोहळा भाजप कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व जि.प.सदस्य मनोज रावराणे,पं. समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.तर स्पर्धेची नाणेफेक जि.प.सदस्य संतोष पारकर पं. समिती सदस्य अण्णा खाडये यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर,माजी सरपंच सुशील इंदप,सुचिता पोकळे,पंढरी वायंगणकर, संजय गोरुले,विद्याधर खोत, उत्तम सावंत, नामदेव इस्वलकर,राजा साटम,सुयोग पोकळे, सुभाष इंदप, कृष्णा कदम, सिध्दार्थ तांबे,दिप...