सिंधुदुर्ग today



बांदा येथील पूरग्रस्त महाजन यांना नऊ लाख रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीने  देण्याबाबत ग्राहक आयोगाचे आदेश.

अँड दीपक अंधारी यांनी पाहिले काम.

कणकवली प्रतिनिधी 

    बांदा,तालुका सावंतवाडी येथे दिनांक सहा ते आठ ऑगस्ट २०१९ या कालावधीत शहरात अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक दुकानांचे घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. शहरातील मे. शनीश्वर कृपा या नावाने सौ उज्वला आनंद महाजन यांच्या सुरू असलेल्या खत विक्रीच्या दुकानात व गोदामात पुराचे पाणी शिरल्याने सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांच्या खताच्या मालाचे नुकसान झाले होते. त्या मालाचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे उतरण्यात आला होता.परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. 

    त्यादरम्याने कोविड  चा काळ सुरू झाल्याने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या होत्या. तरीसुद्धा तक्रारदार महाजन यांनी एडवोकेट दीपक अंधारी यांचे मार्फत विमा कंपनीला नोटीस देऊन  ग्राहक मंच सिंधुदुर्ग येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा अर्ज दाखल केला होता.

  सदर खटल्याची गुणदोषावर चौकशी होऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदार सौ महाजन यांची तक्रार मंजूर करून, खताच्या नुकसान भरपाईपोटी विम्याची रक्कम रुपये ८, ७५, ५२९/-, मानसिक त्रासा पोटी २०,०००/- रु.तसेच तक्रारीच्या खर्चासाठी २०,०००/-रुपये याप्रमाणे सर्व रक्कम निकालापासून ४५दिवसात तक्रारदार यांना अदा करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्तुतकामी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गचे अध्यक्ष -श्रीमती इंदुमती मलूष्टे, सदस्य -श्रीमती रसिका निकुंभ व सदस्य -श्री योगेश खाडीलकर यांनी निकाल पत्र जाहीर केले आहे. तक्रारदार चे वतीने ऍडव्होकेट दीपक अंधारी आणि काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today