सिंधुदुर्ग today



हिंदु म्हणून जिहादी मनोवृत्तीला ठोकुन काढले पाहीजे- अभय जगताप.

 नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात : हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे.

कणकवली : प्रतिनिधी 

हिंदू धर्माला अनेक वर्षाची परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मात्र एकप्रकारे आपल्यातील काही लोक सोबत घेवुन आपली संस्कृती संपविण्याचा प्रयत्न विघातक शक्ती करत आहे. ज्यापद्धतीने लव जिहादच्या माध्यमातुन धर्मांतराचे प्रयत्न वाढलेले आहेत. तसेच लॅण्ड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यापलिकडे जावुन वोट जिहाद हा प्रकार नव्याने सुरु झालेला आहे. सरकारच्या धोरणानुसार हम दो..हमारे दो.. जसे हिंदूना लागु आहे. त्याप्रमाणे अन्य धर्मियांना देखील हा कायदा लागु करण्यासाठी आपण लढा उभारला पाहीजे.  हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. जिहादी मनोवृत्तीला सर्वांनी एकत्र येवुन ठोकुन काढले पाहीजे, असे आवाहन  शिवशंभु विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी केले.



सकल हिंदू समाजाच्यावतीने नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन वाघाचीवाडी येथे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी समाजप्रबोधन पर सौ. आरती बापट यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. मंत्रमुग्ध करणारे किर्तन तसेच आठवणींना उजाळा देत किर्तन सादर केले.

या संमेलनाचे उद्घाटन माजी सरपंच शशिकांत शेटये यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी सकल हिंदू संमेलन संयोजक भगवान लोके, सहसंयोजक भाई मोरजकर, वक्ते डॉ. मिलिंद कुलकर्णी, सभापती हर्षदा वाळके, बजरंग दलाचे दत्तप्रसाद ठाकुर, कोषाध्यक्ष कमलेश पाटील, व्यवस्थाप्रमुख  हेमंत कांडर, सहव्यवस्थाप्रमुख बाबु घाडी,  माजी सरपंच शशिकांत शेटये,प्रदिप हरमलकर,  पंढरीनाथ पारकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, पंढरी वायंगणकर,  बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके , सुभाष बिडये, राजेंद्र मोरजकर, ऋषिकेश मोरजकर, सुशिल इंदप, आयनल माजी सरपंच बापू फाटक, असलदे उपसरपंच सचिन परब,  बुवा संतोष मिराशी, बुवा आत्माराम घाडी, मारुती मोरये, हनुमंत वाळके, अनिल नरे, कृष्णा वायंगणकर, प्रभाकर चिके, राजु खोत, विठोबा कांदळकर, जितेंद्र चिकोडी , निलेश तळेकर , डॉ समीर मुरवणे , ग्रा.प.सदस्य अक्षता खोत, गौरी परब आदींसह नांदगाव दशक्रोशीतील हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय … जय श्री राम वंदे मातरम् … यासह विविध घोषणा देण्यात आल्या.



अभय जगताप म्हणाले, ब्रिटिशांनी आपल्या  समाजाचा बुद्धिभेद केला. जवळपास १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीमुळे आपण आपल्या हिंदू अस्मितेपासून दूर गेलो. ८०० वर्षे मुस्लिम सत्ताधीश भारतात राहिले, मात्र त्यापेक्षा ब्रिटिशांनी आपल्या विचारांवर अधिक परिणाम केला. आपण हिंदू आहोत, याचाच अनेकांना विसर पडला आहे. हिंदू समाजामध्ये पुन्हा अभिमान जागवण्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी हिंदू म्हणून जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्या ठिकाणी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदू समाजातील विभागणीमुळेच परकीयांना राज्य करता आले. हिंदू समाज विभक्त झाला आणि त्याचा स्वाभिमान कमी झाला. हिंदू राष्ट्र हे सर्वांना सांभाळुन घेणारे  राष्ट्र आहे.कोकणात सर्व कामे करणारी माणसे कोण आहेत. त्यांना आपण घरात घेतो. रोहींगे आणि बांग्लादेशाची घुसखोरी मुंबईत वाढलेली आहे तीच परिस्थिती भविष्यात कोकणात उद्भवु शकते. प्रेमाच्या जाळयात ओढुन महिला, मुलींना फसवले जाते. आपल्या महिला व मुलींना सांभाळण्यासाठी स्वत: दिले पाहीजे. परधर्मीयांमध्ये विवाह करुन गेलेल्या मुलींना पुन्हा परत आल्यास स्विकारावे लागेल. त्यामुळे भविष्यातील काळ हा कठीण स्वरुपाचा आहे. या काळामध्ये हिंदूनी संघटीत होवुन एकजुट ठेवल्यास विरोधकांशी हिंदू धर्म रक्षणासाठी लढता येईल.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठे काम केलं आहे. त्यामुळे आम्ही ताठ मानेने जगत आहोत.इतिहास बदलण्याचे प्रकार चालू आहेत.हिंदूंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदूचा इतिहास हा पराभवाचा आहे,असे ब्रिटिश सांगताहेत.आपले स्वत्व जागले पाहीजे, तरच हिंदू धमार्चे कल्याण होईल. आपल्या परंपरा कायम राखायला पाहिजेत. संतांनी लिहिलेले अभंग,श्लोक हे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत.चुकीचं सांगणा-याच्या फंदात पडू नका. आपसात भांडू नका,ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. महिलांना बुरखा घालून काय साध्य करायचे आहे? सावरकर हे किती मोठे होते ,हे ब्रिटिश लोकांना कळले.पण देशातील लोकांना कळलं नाही.आता सस्कृतीवर आघात करायचा आहे. सहभोजन , सहशिक्षण,सहपूजन  हे तीन सह सावरकरांनी सांगितले.आपले घर मजबूत करणे म्हणजे आपण दुस-यांच्या विरोधात नाही.  भक्ती मार्ग , कर्मयोग,राजयोग , न्यानयोग असे चार योग आहेत, हे लक्षात ठेवा. हिंदू म्हणुन आपली संस्कृती व एकजुट ठेवण्यासाठी सर्वांनी काम करा.

प्रास्ताविकात संयोजक भगवान लोके म्हणाले, हिंदू संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे जतन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नसून ती एक जीवनपद्धती आणि राष्ट्रभक्तीची भावना आहे. समाजामध्ये एकता, बंधुभाव आणि सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. युवकांनी धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचे ज्ञान घेऊन पुढे यावे.  धर्मांतर, व्यसनाधीनता आणि सामाजिक विघटन यांविरोधात जनजागृती होणे आवश्यक आहे. नांदगाव दशक्रोशीमध्ये आपण सर्वजण एकत्र विशाल हिंदु संमेलनाच्या निमित्ताने आलो. ही एकजुट आपण सर्वांनी कायम ठेवली पाहीजे. आपल्यातील मतभेद , राजकीय पादत्राणे बाजुला ठेवुन एक हिंदू म्हणुन यापुढेही काम करत राहुया. हे हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today