पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम;  आम. निलेश राणेंच्या हस्ते झाला सन्मान.  कुडाळ पंचायत समितीच्या वतीने केले होते आयोजन.  सिंधुदुर्ग /प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या विद्यार्थांचा कुडाळ पंचायत समिती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.      तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ. जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार. कणकवली, दि. ३१ (ऋषिकेश मोरजकर) :  सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.  'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'चा शुभारंभ ...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार प्रकरणी सख्खा भावाची सशर्त जामिनावर मुक्तता. ॲड. प्राजक्ता शिंदे-सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली/ प्रतिनिधी    अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.आरोपीतर्फे ॲड. प्राजक्ता म. शिंदे-सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.       कुमार नारायण राठोड, (वय 23 वर्षे, रा. मखनापूर, ता. उत्तर विजापूर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक ) हा या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील घरी कोणी नसताना तिचा सख्खा भाऊ कुमार राठोड याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. तो सख्खा भाऊ असल्याने घरात वाद होतील या भीतीने तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. तसेच पोलीस भावाला अटक करतील या भीतीने सुरुवातीला सिंधुदुर्गनगरी पोली...

सिंधुदुर्ग today

इमेज
एआय माहिती देईल पण जगण्याला दिशा देऊ शकत नाही - अजय कांडर. आचरा ज्युनिअर कॉलेज पारितोषिक सोहळा आणि ग्रंथालय उद्घघाटन समारंभ. आचरा/ प्रतिनिधी       "संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," आजच्या एआयच्या जमान्यात संवादाला फार महत्त्व असून एआय माहिती देईल जगण्याची दिशा देऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.        धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आणि ग्रंथालय उदघाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेख...

सिंधुदुर्ग today

इमेज
खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्ट  पासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन.  मुंबई, दि. २९ : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.  पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्ती टिकून राहते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचालित मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत बंदी ल...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सर्व्हिस रोड लगत ट्रक विद्युत पोल ला धडकून अपघात.  अपघातामुळे दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद. अपघाताने पडलेला भला मोठा चर बुजवण्याची मागणी. कणकवली प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज सर्व्हिस रोड लगत आज पहाटे ४ च्या सुमारास विद्युत पोल ला धडकून ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे आज दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद पडली होती.          सदर अपघातामुळे रस्ता खचला असून विद्युत पोल मोडले आहेत. सुदैवाने कोणीही यात जखमी झाले नाही. सदर अपघात ग्रस्त ट्रक  आज सायंकाळी काढण्यात आला. मात्र त्या ठिकाणी भला मोठा चर पडल्यामुळे व याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुसरा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने त्या ठिकाणी संरक्षण कठडा बांधून रस्त्यावर अपघातामुळे पडलेला चर बुजविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. कणकवली /प्रतिनिधी  कणकवली विभागामार्फत गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील पाच शिवस्मारकांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे तसेच अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि गुरू आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेतर्फे शिवस्मारक पूजन मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहिती अधिकारी नील आचरेकर तसेच इतर मावळे व रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी वयोवृद्ध कलाकार यांचा केला सत्कार. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे वतीने आज गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी नांदगाव वाघाची वाडी येथील वयोवृद्ध कलाकार पेंटर बाबूराव मेस्त्री यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा शाल,श्रीफळ, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ पुजा सावंत, बुथ अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच मेस्त्री कुटुंबीय उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणे. कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटी ची कर्जमुक्ती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीची लाभ देणारी कर्जमुक्ती. ४८ हजार कोटी ची शेतकऱ्यांची विज बिल थकबाकी  केली माफ. शेतकरी हितासाठी महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले;आणखी निर्णयांची घोषणाही लवकर. पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली असून, महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे  मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. ४८ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची असलेली विज बिल थकबाकी माफ करणारे महायुती सरकार हे सुद्धा एकमेव अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी. कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
मनाई आदेशभंग प्रकरणी नाम.नितेश राणे, आम.प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ जणांची निर्दोष मुक्तता पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे  केले होते दहन. वकील राजेश परुळेकर व वकील ओंकार परुळेकर  यांनी न्यायालयात पाहिले काम. कणकवली, (ऋषिकेश मोरजकर) :  डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ कणकवली येथे झालेल्या आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे,  आमदार प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १७ डिसेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना कणकवली एसटी स्थानकासमोरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. याप्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर. कणकवली /प्रतिनिधी  ग्रामिण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच ग्रामिण रुग्णालयाच्या काचा फोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणत नुकसान केल्याप्रकरणी संदीप गणपत तानावडे व वडिल गणपत भाऊ तानावडे यांना अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. २६ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६.३० वा.च्या सुमारास नऊ वर्षीय मुलगा शिवांश संदीप तानावडे याला ग्रामिण रुग्णालयात आणले. डॉ. वैभव मोरे यांनी तपासल्यानंतर त्याच्यावर यापुर्वीपासून श्वास घेण्याच्या त्रासावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध रुग्णाला घरी आणले होते. डॉक्टरांनी तपासताच तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता, हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते, श्वसनक्रिया बंद पडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी मयत घोषीत केले. वार्डबाहेर येऊन डॉ. मोरे व डॉ. समीर...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट. रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी ; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही... सिंधुदुर्ग : प्रतिनिधी  कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी विक्रेत्यांसाठी जागेची मार्कीग करत असताना कणकवली येथील पत्रकार व्हिडीओ चित्रीकरण व फोटो काढत असताना ऑटो रिक्षाचालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी अटकाव केला. यावेळी श्री. वराडकर यांनी आक्षेपार्ह बोलत मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने तातडीची बैठक घेत पत्रकारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या त्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांना बोलावुन झालेल्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर रिक्षाचा...

सिंधुदुर्ग today

इमेज
गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित १८ जण निर्दोष. कणकवली / प्रतिनिधी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने एड.उमेश सावंत व एड. विरेश नाईक यांनी काम पाहिले.  27 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भारतीय जनता पक्षाच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांकडून भाजप व शिवसेना पक्ष यांचे पदाधिकारी यांना सीआरपीसी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशही लागू केले होते. असे असताना शिवसेना कार्यालय येथे बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासहित सतीश सावंत, संजय आग्रे, भूषण परुळेकर, रिम...

सिंधुदुर्ग today

इमेज
भुईबावडा कॉपी प्रकरणी मुख्याध्यापक संजय राठोड याला जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांनी मुलग्याला शालांत परीक्षेत गुण वाढण्यासाठी भुईबावडा केंद्र येथे कॉपी पुरवली होती. याप्रकरणी शालांत परीक्षा मंडळाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या संजय राठोड याला येथील प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एस. जी. लटुरिया यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. मार्च २०२६ मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षत आपला मुलगा अधिक गुणाने उत्तीर्ण व्हावा, यासाठी काही शिक्षकांना हाताशी धरून बाहेरून लिहून आणलेल्या उत्तपत्रिकांच्या पुरवण्या आरोपी संजय राठोड यांनी उत्तरपत्रीकेसोबत जोडल्या होत्या. याबाबत आदर्श विद्यामंदिर भुईबावडा या केंद्रातील उत्तरपत्रीकांबाबत संशय निर्माण झाल्याने निकाल राखून ठेवला होता. तसेच शालांत परीक्षा मंडळाने चौकशी समिती नेमून चौकशी केली होती. चौकशीअंती आरोपी व अन्य शिक्षक दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्...

सिंधुदुर्ग today

इमेज
सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत. सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात ;  कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक. कणकवली : प्रतिनिधी  सावडाब  धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय विविध वयोगटातील सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आनंददायी क्षण अनुभवले. सावडाव धबधब्याचा आनंद लुटत मौजमजा,  मस्ती केल्याने पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाला होता. शेवटी डिजेच्या तालावर झिंगझिंग झिंगाट यासह विविध गाण्यावर ठेका धरत या कौटुंबिक स्नेह मेळाव्याची  सांगता झाली.  कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित सावडाव धबधबा येथे कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव चोरी प्रकरणी ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी केली तपासणी  कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली भेट. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला काल दुपारी ३ ते ५ या वेळेत   भर दिवसा फोडला होता. तसेच या नंतर काही अंतराने नांदगाव मधली वाडी येथे राहते घर फोडल्याचा प्रकार घडला होता. या पाश्र्वभूमीवर आज ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी नांदगाव येथे घटनास्थळी येऊन तपासणी केली आहे. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी काल दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून  धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.  याच दरम्यान दिवसा चोरीचा प्रकार घडला होता. या चोरी मध्ये त्यांचे दोन महागडे मोबाईल चोरीला गेले तसेच स्मार्ट वॉच व काही रोख रक्कम चोरीला ग...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला ; काही रक्कम व दोन मोबाईल लंपास  भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ. कणकवली /प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला आज दुपारी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम व दोन मोबाईल लंपास केले आहे. एक मोबाईल १,५०,००० /- हजार तर एक मोबाईल २० हजार व स्मार्ट वॉच किंमत १५००० हजार रुपये अशी वस्तू लंपास केले असून या भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ उडाली आहे.        याबाबत अधिकृत असे की नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून गेले धबधब्याचा आनंद लुटून घरी येतात पाहिले असता तर बंगल्याच्या दाराची कडी तोडून दरवाजा उघडलेला होता आणि आत मध्ये सामान सर्व कपाट विस्कटलेले पाहायला मिळाले त्यांनी सर्व साहित्य खातरजमा केली असता काह...

सिंधुदुर्ग today

इमेज
गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी यांच्या वतीने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वितरण. नांदगाव प्रतिनिधी             गजानन विकास मित्र मंडळाकडून नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक,क्रिडा, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात.नुकतेच मंडळाकडून शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड,जि.प.शाळा कोळोशी -हडपिड,जि.प.शाळा हडपिड,जि.प.शाळा कोळोशी वरची वाडी,जि.प.शाळा आयनल मनेरवाडी अशा पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले. प्रशाले मधील सर्व विद्यार्थ्यांना गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी यांच्यामार्फत वह्या, पेन व शालेय साहित्य वितरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजन सावंत, खजिनदार चंद्रकांत शिंदे, सचिव संतोष चव्हाण, स्थानिक कमिटी सदस्य महादेव पावसकर, सानिका इंदप, सत्यवान राणे, सुचिता पोकळे, नम्रता इंदप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शी. प्र. मंडळाचे कार्यवाह श्री. सुरेश राणे व शाळा समिती अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण उपस्थित होते.   या मंडळामार्फत दरवर्षी प...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर. पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा. पावसाची दडी, भातशेती सुकली,जमिनीला भेगा. तळेरे : (ऋषिकेश मोरजकर) जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.  पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात  जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यानी कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळेस माजी जि.प.सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री,माजी सभापती बंडया मांजरेकर,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे,तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार,भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ.विजय कुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण...

सिंधुदुर्ग today

इमेज
नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी; घेतला कामाचा आढावा. गुणवत्तापूर्ण  वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मार्केट यार्डच्या उर्वरित बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक निधी आणि पुढील कामाचे नियोजन याबाबत पालकमंत्र्यांनी सभापती व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मार्केट यार्डचे उर्वरित बांधकाम निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच शेतकरी, व्यापारी आणि कृषी पणनाशी संबंधित सर्व घटकांच्या हितासाठी हे आधुनिक मार्केट यार्ड लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे सांगत, सर्वांनी समन्वयाने काम करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे किशोर मोरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निराधार लाभार्थ्यांना शासनाच्या पेन्शन योजनेची देण्यात आली माहिती.  कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार. या पुढेही किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रस्तावासाठी सर्वतोपरी सहकार्य.   कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कै.किशोर मोरजकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या माध्यमातून आज गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी नांदगाव येथे निराधार, श्रावण बाळ पेन्शन  आवश्यक आहे अशा लाभार्थ्यांना परिपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच फॉर्म सोबत लागणारे कागदपत्र यांची माहिती देण्यात आली. असून ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे पूर्ण होती त्यांचे अर्ज भरण्यात येवून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आले. तसेच या ही पुढे असे प्रस्ताव तयार करण्यासाठी लाभार्थी यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.        नांदगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या या पेन्शन योजनेची माहिती कार्यक्रमात सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष र...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे (SIR) मतदार यादी दुरुस्ती काम ५० टक्के वर. मतदार नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे तिनं ही बुथ वर मतदार यादी अद्ययावत दुरुस्ती करण्याचे काम घरोघरी जाऊन सुरू आहे. तरी मतदार नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.       पहिल्या टप्प्यात त्यांना घरोघरी अर्ज वितरित करण्यात आले. तर आता ते जमा करण्याचे काम सुरू आहे. जर कोणाला अर्ज भरताना अडचणी येत असतील तर त्यांना BLO व सहाय्यक मदत करत आहेत.         SIR.. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून दुबार मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते. अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात. या प्रक्रियेत नक्की काय होते? बीएलओ स्वतः घर...

सिंधुदुर्ग today

इमेज
सुधारित पीक विमा योजनेचा सर्व  शेतकऱ्यांनी  ३१ जुलै पूर्वी लाभ घ्यावा  शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक  पीक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य  आहे. कणकवली प्रतिनिधी  राज्यात २०२६- २७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून, भात शेती उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंडळ कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे पत्रकात श्री. अर्जुन जाधव यांनी म्हटले आहे की. राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सधारित प्रधानमंत्र पीक विमा योजना ३ जुलैपासून लागृ केली आहे. यामळे अधिसचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चाल वर्षीाचे सरासरी उत्पादन हे उंबरठ उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई" लागू होणार आहे. भात व नागली पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल.  अंतिम तारीख ३१ जुलै आहे. केंद्राच्या पीक विमा पोर्टल व' ऑनलाईन सहभाग नोंदविता येईल. यात बँक, कॉमन सर्विस सेंटर, किंवा स्वतः शेतकरी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची  घेतली भेट कणकवली/प्रतिनिधी   श्री व सौ राजेंद्र पेडणेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आरती देसाई साहेब यांची नुकतीच भेट घेतली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी च्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री  राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती मधील व्यावसायिक सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या समवेत भेट घेतली,  यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा सुध्दा केली, आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी इमारती व जागे संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली,  यावेळी निवेदन सादर करण्यात आले, तसेच सौ व श्री ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन ,निवासी जिल्हाधिकारी आरती देसाई साहेब यांचा सन्मानित केले, तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या,  या निवेदनात असे म्हटले आहे, कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप...

सिंधुदुर्ग today

इमेज
कर्जमुक्तीची व्यापकता वाढली;दोन लाखांचे कर्ज सर्वांना माफ. सिंधुदुर्ग today: (ऋषिकेश मोरजकर ) शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी असल्याची भूमिका राज्य शासनाने सातत्याने घेतली आहे. त्याच भूमिकेचा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आविष्कार म्हणजे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'. या योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली.दरम्यानच्या काळात विविध लोकप्रतिनिधीनी या घोषणेचे स्वागत करताना काही नोंदी व सूचना केल्या होत्या.हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या योजनेतून कोणीही पात्र लाभार्थी अटी व शर्तीमुळे वंचित राहून यासाठी लगेच या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत आणखी काही महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर करून तिची व्...

सिंधुदुर्ग today

इमेज
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सावंतवाडी मतदार संघाचा आढावा दोडामार्ग आणि सावंतवाडी तहसील कार्यालयात घेतली  आढावा बैठक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (ऋषिकेश मोरजकर) :  लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम–२०२६ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सावंतवाडी व दोडामार्ग तहसील कार्यालयांना भेट देत त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली तसेच मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त राहील, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. या कामात निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि पर्यवे...

सिंधुदुर्ग today

इमेज
आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर - डॉ. राजन गवस. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद. रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली, प्रतिनिधी      काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच. आज सर्वत्र माणसाच्या मनात अस्थिरता आणि अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेला उत्तर म्हणजे `तुकाराम' आहे. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित `आजच्या काळासाठी तुकाराम हा ग्रंथ यासंदर्भात मौलिक मार्गदर्शक आहे. सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये या ग्रंथाची लघु आवृत्ती वितरित व्हायला हवी. नव्या पिढीला तुकाराम कळणे म्हणजेच त्यांचे जगणे विवेकशील बनविणे होय. परुळेकर यांच्या वर्तन आणि लेखनात कोणताही फरक नाही. म्हणूनच हा महत्त्वाचा ग्रंथ ते लिहू शकले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार आणि विचारवंत डॉ. राजन गवस यांनी केले.         कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ॲड. देवदत्त परुळेकर लिखित `आजच्या काळासाठी तुकाराम' या ग्रंथावरील परिसंवाद मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात डॉ. रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम. सिंधुदुर्ग /प्रतिनिधी  शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.     तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
केवळ नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी - उमेश तोरसकर. कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने 'पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा ; स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा. कणकवली : प्रतिनिधी   पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी येथे केले. कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,उपाध्यक्ष संतोष राऊळ,  ज्येष्ठ...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल - चेअरमन भगवान लोके. कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक उत्कृष्ट कामगिरी ; संस्थेची 1 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल. कणकवली : प्रतिनिधी   कणकवली तालुक्यात 37 विविध कार्यकारी विकास संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के वसुलीत पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे अव्वल ठरली आहे.तर जिल्ह्यातील 227 विकास संस्थांमध्ये पहिल्या 5 संस्थांमध्ये असलदे विकास संस्थेने  100 टक्के कर्ज वसुलीत यश मिळवले आहे. कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक संस्थेतील सर्व प्रकारचे असलेले सभासद कर्जदारांनी आपली नियमित कर्जे भरुन सहकार्य केलं आहे. नेहमीच असलदे सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी करत गेल्या 5 वर्गात उलाढाल 85 लाखांवर पोहचली आहे. आता संस्थेची उलाढाल 1 कोटींपर्यंत नेण्याकडे आमची वाटचाल आहे. अवघ्या बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सहकार चळवळ रुजत आहे. आमची विकास सोसायटी शेतकरी व सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करत असल्याची माहिती सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी दिली आहे. असलदे विकास सोसायटी संस्था व बॅंक पा...

सिंधुदुर्ग today

इमेज
बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी आपल्या ताब्यातील मोटरसायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून अनंत नाटळकर यांच्या दुखापती व उपचारादरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आशिये येथील साहिल संदेश ठाकूर याची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. अनंत नाटळकर हे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील साफल्य स्वीट या दुकानात खाजा घेण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानासमोर मोटरसायकल थांबविली असता समोरून आलेल्या मोटरसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार ठोकर दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर गोवा येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०४ अ २७९, ३३७, ३३८, मोटर वाहन कायदा १८४ ३ (१), १८१ व १४६/१९६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवण्यात आला होता. सुनाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६. सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण. शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी, दि. २ (ऋषिकेश मोरजकर) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५ हजार ११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ८ कर्जखाती पात्र ठरली असून, आतापर्यंत ३ हजार ९५६ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती ही माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल...