सिंधुदुर्ग today
दिराला दगडाने मारहाण केल्याच्या आरोपातून सोनाली सुनील तांबे हिची निर्दोष मुक्तता. ऍड. मेघना सावंत यांनी पाहीले कामकाज. कणकवली / प्रतिनिधी मौजे वागदे येथील सोनाली सुनील तांबे हिने आपल्याला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची तक्रार तिचा दीर अनिल तानाजी तांबे याने पोलीस स्टेशन कणकवली येथे दिली होती. त्याप्रमाणे पुढे आरोपपत्र कणकवली न्यायालयात दाखल होऊन केस चालली. परंतु पटलावर आलेले फिर्यादीचे चुकीचे वर्तन व आरोपीविरुद्ध आरोप शाबीत न झाल्याने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश कणकवली न्यायालयाचे न्या. सोनटक्के यांनी केले. आरोपीच्या बाजूने ऍड. मेघना देऊ सावंत यांनी कामकाज पहिले.