सिंधुदुर्ग today
प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार सोहळा २४ रोजी कणकवलीत:निमंत्रित कवींचे कविसंमेलनही
श्रीधर चैतन्य, प्रा.संजीवनी पाटील, ॲड.विलास परब, मधुकर मातोंडकर आणि संध्या तांबे यांची उपस्थिती
प्रभा प्रकाशनातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली/प्रतिनिधी
कणकवलीतील प्रभा प्रकाशनातर्फे यावर्षीपासून दुर्लक्षित राहणाऱ्या साहित्यिकांसाठी प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. सदर पहिला पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाला तो जाहीर झाला असून त्याचा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. कलमठ गोसावीवाडी अभंग निवास येथील अक्षय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखक आणि अनुवादक श्रीधर चैतन्य (कोल्हापूर), समीक्षक प्रा संजीवनी पाटील (वैभववाडी), समाज साहित्य कार्यकर्ते ॲड. विलास परब (कणकवली) आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर (सावंतवाडी) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.तर ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दुसऱ्या सत्रात होणाऱ्या या निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा.सुचिता गायकवाड, ऋजुता सावंत भोसले, प्रमिता तांबे,श्रेयश शिंदे, ॲड.मेघना सावंत, ॲड.प्राजक्ता शिंदे, प्रियदर्शनी पारकर,रीना पाटील, आर्या बागवे, संजय तांबे,योगिता शेटकर, पल्लवी शिरगावकर, किशोर कदम, आर्या कदम, सत्यवान साटम,संदीप कदम, संतोष जाईल,हरिश्चंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, प्रा.एन.आर.हेदुळकर, श्रवण वाळवे आदी निमंत्रित कवींचे काव्यवाचक होणार आहे.
तरी काव्य रसिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रभा प्रकाशन परिवारातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क नंबर.९४०४३९५१५५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा