सिंधुदुर्ग today
नांदगाव सरपंचाचे ४ नोव्हेंबर रोजी चे आमरण उपोषण लेखी आश्वासनाने मागे
महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी नांदगाव येथे येऊन दिले लेखी आश्वासन
३३ kv लाईन वारंवार बिघाडामुळे होत होता विज पुरवठा खंडित
ऋषिकेश मोरजकर | कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील विजेचा प्रश्न ऐन दिवाळीतही विज पुरवठा खंडित होणे सुरुच होते .३३ kv लाईन बिघाडामुळे विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने
जनतेला पाणी पुरवठा कसा करावा ? या अनुषंगाने नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याने सदर ४ नोव्हेंबर रोजी होणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांना दिले.आज नांदगाव ग्रामपंचायत येथे प्रत्यक्ष येवून उपकार्यकारी अभियंता श्री बगडे यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
हुमरट ते नांदगाव कायमच ३३ के वी लाईनमध्ये बिघाड होत असल्याने त्यावर पर्याय म्हणून तळेबाजार ते असलदे सब स्टेशन लाईन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल.तसेच खारेपाटण ते असलदे सब स्टेशन या लाईनचा पर्याय ही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे कणकवली वरून येणारी लाईन बिघडली तर हे दोन पर्याय उपलब्ध राहतील.तसेच पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिनिवरती येणारी झाडे तोडण्याचे वेळापत्रक बनविण्यात येईल आणि ते त्या त्या गावामध्ये ग्राम पंचायत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली.वीज बिल भरणेबाबत ग्राहकांकडून जो बहिष्कार टाकलेला आहे त्याबाबत महावितरणने १० नोव्हेंबरला दशक्रोशिकरिता निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.कार्यकारी अभियंता यांच्या आवाहनानंतर उद्या ४ नोव्हेंबर रोजी होणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी बोलताना सांगितले आहे
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, महावितरण कंपनी चे उप अभियंता श्री बगाडे , राजू खोत , प्रदीप हरमलकर,कमलाकर पाटील, ऋषिकेश मोरजकर, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा