सिंधुदुर्ग today
नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
कै.पार्वती कांदळकर,कै. पुष्पलता कांदळकर कै.निर्मला कांदळकर यांच्या स्मरणार्थ भेट वस्तू देत सत्कार
मोबाईल चा वापर विघातक कामासाठी होवू नये ; मान्यवरांनी व्यक्त केले मत
नांदगाव प्रतिनिधी
श्री महापुरुष सेवा संघ नांदगाव च्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न होत आहे. यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कै.पार्वती कृष्णा कांदळकर,कै. पुष्पलता आप्पा कांदळकर कै.निर्मला कांदळकर यांच्या स्मरणार्थ 10 वी 12 विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देत सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला आहे.
यावेळी महापुरुष सेवा संघ नांदगाव अध्यक्ष शशिकांत शेटये ,नांदगाव हाय.मुख्या.सुधीर तांबे, वसंत कांदळकर, महापुरुष सेवा संघ मुंबई मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील , ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी टक्केवारी वाढावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत हे करत असताना मोबाईल चा वापर विघातक कामासाठी केला तर ते चुकीचे असून आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
सुत्रसंचलन शिवशंकर शेटये व आभार सुरेश पाटील यांनी मानले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा