सिंधुदुर्ग today
चाकरमानी मतदार ईले मतदान हक्क बजावूक आपल्या गावात
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
महाराष्ट्र विधानसभेसाठी आज सर्वत्र मतदान होत आहे . यासाठी मुंबई स्थित असलेल्या चाकरमान्यांचे आपल्या गावातील असलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चाकरमानी आपल्या गावाकडे दाखल होत आहेत . रात्री उशिरा सुटलेल्या ट्रेनमधून प्रचंड गर्दी पहावयास मिळत होती अगदी मे महिना किंवा श्री गणेश चतुर्थी दरम्यान गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते तशीच परिस्थिती रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी पाहायला मिळत होती. यामुळे एकच चर्चा ऐकायला मिळत होती ती म्हणजे चाकरमानी मतदार ईले गावात आपला मतदान हक्क बजावूक!
रेल्वे च्या मुंबईतून रात्री सुटणाऱ्या सर्व गाड्याना प्रचंड गर्दी होती. तर स्लीपर डबे ओसंडून वाहत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा