सिंधुदुर्ग today



नांदगाव उबाठाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

नांदगाव उ.बा.ठा.सेनेला युवा पदाधिकाऱ्यांनी पाडल खिंडार 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील उबाठाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांच्या सहीत असंख्य तरुणांनी विकासाच्या व हिंदूत्वाच्या मुद्यावर आज नांदगाव येथील उबाठा सेनेला युवा पदाधिकारींनी ही आज सोडचिठ्ठी देत आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात जाहिर प्रवेश केला आहे.

       यावेळी कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, माजी उपसरपंच शशी तोरसकर, निरज मोरये,नांदगाव सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली, प्रदीप हरमलकर, नांदगाव बुथ अध्यक्ष आबा बिडये, मारुती मोरये, प्रशांत परब , नांदगाव भाजपचे विभागीय अध्यक्ष रघुनाथ लोके,विनय यादव ,राजू तांबे,बाबू राणे , गोविंद लोके आदी उपस्थित होते.

    माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली सुभाष शेलार ,सुरेंद्र शेलार ,सुयोग कदम,अमोल शेलार ,चिन्मय सावंत, अनिल शेलार ,संजय धुमाळ , कमलाकर शेलार तसेच युवा सेना शाखाप्रमुख रिद्धेश तेली यांच्या सहीत पंकज पाटील,प्रकाश पाटील,मंगेश पाटील ,अक्षय पाटील, दीपक नांदगावकर ,नंदू नांदगावकर ,मंगेश नांदगावकर हरी राणे, भाऊ पाटील,विठ्ठल नांदगावकर ,सचिन तेली, सुजल साळुंखे , अमोल पाटील, बंटी पाटील,अजय जाधव, लक्षण नांदगावकर आदी बहुसंख्येने युवा कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today