सिंधुदुर्ग today



कणकवली विधानसभा निवडणुक रणधुमाळी. 

मागोवा कणकवली विधानसभेचा

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड वैभववाडी या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान भाजपचे आमदार नितेश राणे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असून यांच्या विरोधात महाविकास आघाडीतीडीकडून यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे  निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर मुस्लिम समाजातील नवाज खानी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन्ही बाजूंनी प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून बाकी अपक्ष उमेदवारांमध्ये पाहता नवाज खानी यांनी भेटी गाठी सुरू केल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात मात्र दोन्ही कडून कोण कोण मातब्बर मंडळी प्रचार सभेला येतात याची उत्सुकता लागून राहिली असून यातून २३ नोव्हेंबर ला कोण मारणार बाजी ? याबाबत नाक्या नाक्यावर चर्चेला उधाण आले आहे .

      २०१९ वेळी आमदार नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढविली होती.  त्यावेळी विधानसभा निवडणुकीत आम.नितेश राणे भाजपा यांना ८४,५०४ , सतिश सावंत शिवसेना ५६,३८८ या दोघांत प्रमुख लढत पहायला मिळाली होती .त्यावेळी महाराष्ट्रात भाजपा शिवसेना एकत्र युती असूनही या एकमेव कणकवली विधानसभा मतदारसंघात आमने सामने उमेदवार पहायला मिळाले होते. 

       त्यानंतर गेल्या अडीच वर्षात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर विधानसभेची पहिलीच निवडणूक होवू घातली आहे. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला दणदणीत यश प्राप्त झाले होते. खासदार नारायण राणे हे पन्नास हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. आणि या विजयाच्या वाट्यात कणकवली विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाने जवळपास ४२ हजाराचे मताधिक्य खासदार नारायण राणे यांना दिले होते. यामुळे अधिक मताधिक्य मिळवून देणारा विधानसभा मतदारसंघ हा कणकवली चा ठरला होता . मागील विधानसभेवेळी आमदार नितेश राणे यांना २८,११६  एवढे मताधिक्य होते .यामुळे निश्चितच वाढ झाली असल्याचे यावरून दिसून येत आहे.

       २००४ मध्ये भाजपा चे माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली होती. त्यावेळी नव्याने जिल्ह्यात दखल झालेल्या राष्ट्रवादी च्या कुलदीप पेडणेकर यांनी कडव आव्हान दिले होते. यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे अजित गोगटे विजयी होऊन माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांच्या नंतर बालेकिल्ला असलेल्या देवगड मतदार संघ भाजपाने अबाधित राखला . यानंतर पुढील २००९ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेकडून नव्याने निवडणूक रिंगणात उतरलेले प्रमोद जठार विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीकडून त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविलेले कै.कुलदीप पेडणेकर यांच्यात तिरंगी लढत होऊन कुलदीप पेडणेकर यांनी अपक्ष निवडणूक लढविल्यामुळे प्रमोद जठार यांचा अवघ्या ३४ मतांनी निसटता विजय झाला होता. 

        यानंतर २०१४ साली पुन्हा प्रमोद जठार निवडणूकीला सामोरे जात त्यावेळी मात्र आम.नितेश राणेंनी मोठं आव्हान उभं करत विजय खेचून आणला होता.त्यावेळी भाजपा शिवसेनेकडून आमने सामने उमेदवार पहायला मिळाले प्रमोद जठार, सुभाष मयेकर, अपक्ष विजय सावंत, अतुल रावराणे असे ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यातून आमदार नितेश राणेंनी बाजी मारत विजय संपादन केले होते.

       नंतर मात्र २०१९ च्या निवडणुकीत सर्व समिकरण बदलत आमदार नितेश राणेंनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी मात्र एकेकाळचे शिलेदार असलेल्या सतिश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करुन नितेश राणे यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. परंतु नितेश राणे यांना ८४,५०४ तर सतिश सावंत यांना ५६,३८८ मते मिळाली होती. जवळपास २८,११६ मताधिक्य आमदार नितेश राणेंनी घेऊन दणदणीत विजय मिळवला होता.

       आम. नितेश राणे हे आता तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभं केलं आहे. तर मुस्लिम समाजातील नवाज खानी तर संदेश परकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्व उमेदवारांची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून शेवटच्या टप्प्यात मात्र दोन्ही कडून कोण कोण मातब्बर मंडळी प्रचार सभेला येतात याची उत्सुकता लागून राहिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today