सिंधुदुर्ग today
उद्या मतदान ; प्रचार तोफा थंडावल्या
मतदान कर्मचारी पोहचले मतदान केंद्रांवर.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
विधानसभा निवडणूक रणधुमाळी २०२४ प्रचार तोफा काल सायंकाळ पासून थंडावल्या असून उद्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान कर्मचारी केंद्रांवर पोहचले आहेत. उद्या सकाळी ठीक ७ वाजता मतदार सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्वच उमेदवारांनी आप आपल्या परीने प्रचाराची सांगता काल सायंकाळी केलेली पहायला मिळाली.
आज सकाळी उपविभागीय दंडाधिकारी तथा कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना रवाना झाले. यावेळी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवली नायब तहसीलदार मंगेश यादव, गटविकास अधिकारी चव्हाण,मंडळ अधिकारी तसेच निवडणूक कर्मचारी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा