सिंधुदुर्ग today
नांदगाव फोंडा महामार्गावर झाडाची तुटून लटकत असलेल्या फांदीला वाली कोण ?
येणा - जाणाऱ्या वाहनांवर पडण्याची भिती
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव फोंडा महामार्गावर तोंडवली - नांदगाव च्या मध्ये महामार्गावरील असलेले झाडाची फांदी पूर्णतः तुटून रस्त्याच्या अगदी मधोमध वरील भागात लटकत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. देवगड निपाणी हा राज्यमार्ग असल्याने येथून दुचाकीस्वार, फोर व्हीलर बरीच वाहने ये - जा करत असतात अशावेळी सदर तुटून अर्धवट अडकलेली फांदी जर वाहनांवर कोसळली तर मोठा अपघात घडू शकतो. तसेच सदर फांदी ही रस्त्याच्या अगदी मधोमध झाडावर लटकत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभाग अपघात घडल्यानंतर जागे होणार आहे का ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांमधून तसेच वाहनधारकांमधून केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा