सिंधुदुर्ग today
आम.नितेश राणेंची विजयी घोडदौड कोणीही रोखू शकत नाही - रज्जाक बटवाले
आम.नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून ते देशद्रोहीच्या विरोधात बोलतात.
कणकवली |प्रतिनिधी
देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघ महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांची विजयी घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ते शंभर टक्के हॅट्ट्रिक करणार असे कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्व सामान्य गोरगरिबांना माणसाला आधार देणारे प्रसंगाला मदत करणारे आमदार नितेश राणे यांना सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा आहे राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे व राहणार ते कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून ते देश द्रोहि च्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे.
ते जे आज त्यांच्या विरोधात बोलतात त्यांनी या समाजाचा फक्त आणि फक्त उपयोग करून घेतला आहे व आपली पोळी भाजली आहे. या समाजाला पुढे आणले नाही परंतु राणे कुटुंबीय यांनी मुस्लिम समाजातील लोकांना आर्थिक शैक्षणिक, तसेच शस्त्रक्रिया रुग्णांना ही भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे.
या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे एवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही. आज प्रत्येक गावात वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे म्हणून लोकांचा ओघ त्यांच्याजवळ आहे.
विरोधात जे बोलत आहे त्यांनी पहिले आपले आत्मपरीक्षण करावे मुंबई एसी मध्ये बसून विकास होत नाही त्याला जमिनीवर बसून लोकांची काय समस्या आहे ती समजून घ्यायला हवे आपल्या गावात आपली काय किंमत आहे ते लोकांना माहिती आहे तेव्हा जे कोणी आरोप करत आहे त्यांनी येणाऱ्या २३ तारखेला आपले सामान बांधून आताच तिकिट बुकिंग करून ठेवावे व पुन्हा ५ वर्षांनंतर यावे असा सल्लाही विरोधकांना सल्ला दिला आहे.
नितेश राणे आपली हॅट्ट्रिक पुर्ण करुन आम्ही सर्व मतदार राजा दिपावलीत गुलाल उधळणार असे कणकवली तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा