सिंधुदुर्ग today


नांदगाव वीज बिल न भरण्याचा टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात यावा.

वीज महावितरण ने नांदगाव सरपंचांकडे पत्राद्वारे केली मागणी

वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांनी बिलांवर टाकला होता बहिष्कार. 

कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागातील मधील गेले काही महिने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. याबाबत आंदोलन तसेच लेखी पत्राद्वारे लक्ष वेधून ही काही सुधारणा होत नसल्याने अखेर सर्व नांदगाव दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी एकत्र येत सामुदायिक रित्या वीज बिलांवर बहिष्कार टाकला होता. याची गंभीर दखल घेत महावितरण कंपनीने गेले काही महिने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी मेहनत घेऊन तो सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

     आणि आता बऱ्यापैकी समस्या दूर होत असल्याने आपण वीज ग्राहकांनी घेतलेला विज बिल बहिष्कार निर्णय मागे घेऊन वीज बिले भरून महावितरण ला सहकार्य करावे अशी विनंती महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. 

    तसेच असलदे ते तळेबाजार ही पर्यायी 33 केव्ही लाईनचे काम प्रगतीपथावर असून आपल्याला अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ही शेवटी पत्रात नमूद केले आहे.

     तरी नांदगाव दशक्रोशीतील सर्व वीज ग्राहकांनी आपापली वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today