सिंधुदुर्ग today



आमदार नितेश राणे आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर नांदगावात जल्लोष.

डिजेच्या तालावर गुलालाची उधळण करीत धरला ठेका 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करत 58000 मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला तसेच राज्यातही भाजपा महायुतीला दणदणीत विजय मिळाल्याने कणकवली तालुक्यातील नांदगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला .  गुलाल उधळीत महायुतीचा विजय असो...  भारत माता की जय... अशा घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला.डिजेच्या तालावर गुलालाची उधळण करीत लहान मुलांपासून तर तरुणांनी ठेका धरत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. 

      यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, असलदे उपसरपंच सचिन परब , नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये, प्रदीप हरमलकर, पप्पी सापळे, प्रशांत परब रघुनाथ लोके, मनोज लोके , संतोष जाधव,विजय आचरेकर ,मारुती मोरये, कमलेश पाटील, राजू खोत, रज्जाक बटवाले,आबा बिडये , ग्रामपंचायत सदस्य शंकर मोरये, विठोबा कांदळकर ,रिध्देश तेली ,बहुसंख्येने भाजप महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today