सिंधुदुर्ग today
नांदगाव हाय. मुख्याध्यापक सुधीर तांबे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
क्रांतीबा ज्योतिबा फुले स्मृतिदिन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा क्रांतीबा ज्योतिबा फुले स्मृतिदिन आदर्श शिक्षक पुरस्कार सरस्वती हायस्कूल नांदगाव चे मुख्याध्यापक श्री सुधीर भास्कर तांबे. यांना नुकताच कोल्हापूर शाहू स्मारक येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास समाज कल्याण अधीक्षक. महाराष्ट्र शासन श्री सचिन पाटील, करवीर चे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष श्री आकाश तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री सुधीर भास्कर तांबे यांनी यावर्षी सावंतवाडी येथे झालेल्या कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य अधिवेशनाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील नेताने सांभाळली. या अधिवेशनाच्या आयोजनात राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. त्यानिमित्त राज्याच्या वतीने त्यांचा. सन्मानचिन्ह व भारतीय संविधान देऊन गौरव करण्यात आला.
श्री सुधीर भास्कर तांबे हे गेली 28 वर्षे. सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे गणित विज्ञान शिक्षक म्हणून काम करत आहेत. मागील चार वर्षे ते याच प्रशालेमध्ये मुख्याध्यापक पदावर आहेत. मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळताना. सतत चार वर्षे प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे. श्री सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेना,साक्षरता अभियान, एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन,विज्ञान प्रदर्शन, गावठी वस्तूंचा बाजार भरवणे, विविध प्रकारच्या प्रबोधनाच्या रॅलीच काढणे,विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा भरवणे असे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडतात.
श्री सुधीर भास्कर तांबे हे शैक्षणिक कामाबरोबरच धार्मिक व सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात चांगले योगदान देतात. फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष, शिक्षक भारती कणकवली शाखेचे माजी उपाध्यक्ष, कणकवली महाल बौद्ध विकास संघाचे माजी स्वीकृत सदस्य, तर शिवडाव बौद्ध विकास संघ शिवडाव चे सल्लागार अशा विविध पदांना त्यांनी न्याय दिला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारानंतर नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. श्री नागेश मोरये साहेब,इतर संस्था पदाधिकारी, सरस्वती हायस्कूल नांदगाव चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे व सहकारी तसेच फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा