सिंधुदुर्ग today



ओसरगांव शाळा नंबर १ मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा.

विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर, मुख्याध्यापक किशोर कदम यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांचा सहभाग

कणकवली/प्रतिनिधी

     ओसरगाव जि. प. शाळा नंबर 1 येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमातून आयोजित करण्यात आला. यावेळी संविधान रॅली काढण्यात आली.

  हर घर संविधान या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षिका शितल दळवी, राजश्री तांबे ,प्रमिता तांबे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते .

    यावेळी शाळा ओसरगाव नं.१ तर्फे संविधान जागृती रॅली काढण्यात आली. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे लेखन  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  यावेळी बोलताना विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर म्हणाल्या,भारतीय राज्यघटना मानव मुक्तीचा खरा जाहीरनामा आहे कारण यामध्ये  स्वतंत्र भारतातील जात धर्म लिंग भाषा प्रदेश इत्यादीची विषमता लक्षात घेऊन सर्व घटकांना न्याय देण्याचे काम भारतीय राज्यघटनेने केले आहे.  

      किशोर कदम म्हणाले,स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध असे राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरलेआहेत  घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकद दिली आहे या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालला जातो, याचे दर्शन घडते आणि म्हणून संपूर्ण देशाचा विकास करून आणणारी देशातील माणसांना माणुसकीचे मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्श ठरणारे आहे.

  सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी केले तर आभार शितल दळवी मॅडम यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today