पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत शिवशौर्य यात्रा उद्या नांदगावात नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन   शिवराज्याभिषेक ३५० वर्ष      कणकवली प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला आज दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून उद्या रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ठिक १२ वा. नांदगाव तिठा येथे शिवशौर्य यात्रेचे दर्शन घेण्यासाठी आगमन होणार आहे.व येथून पुढे मार्गस्थ होईल व कासार्डे येथे १ वा. आगमन होणार आहे तरी नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मुंबई एकता कल्चर अकादमीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय. डिसेंबर मध्ये गिरगाव येथे साहित्य संघात पारितोषिक वितरण. कणकवली/प्रतिनिधी           मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी दिली असून या दोघी कवयित्रींचे या यशाबद्दल सिंधुदुर्ग साहित्य चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.      एकता कल्चर अकादमीतर्फे नव्या कवींना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी खुली काव्य स्पर्धा गेली 30 वर्ष आयोजित केली जात आहे. या प्रतिष्ठित अशा काव्य स्पर्धेत यावर्षी सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र बरोबर परदेशातील मराठी कवींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या स्पर्धेत फोंडाघाट येथील कवयित्री प्रा.प्रियदर्शनी पारकर यांना 'ते त...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कमिटीचे केले कौतुक. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव तिठा येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केरण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर ,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले , यासिर मास्के, शाहिद बटवाले ,जुबेर मास्के, तैयब बटवाले ,यासिन नावलेकर ,गफार बटवाले ,तन्वीर साटविलकर ,पोलिस किरण मेथे, आदि मान्यवर उपस्थित होते.   यावेळी यादव साहेब यांनी ईद मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी चे कौतुक केले व रक्तदान हे सर्वांत महत्त्वाचे दान आहे जसे आपण अवयव दान करतो व अडीअडचणीला धावून जातो तेव्हा असे समाज उपयोगी काम महत्वाचे आहे. हा कार्यक्रम आणखी मोठा होवो व अश्या कार्यक्रमाला म...

सिंधुदुर्ग today

इमेज
    ................................. 'सिंधुदुर्ग टुडे'  या माध्यमातून गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील आजच्या मानकरी आहेत नांदगाव प्राथमिक शाळा एक मधील गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे! ....................................... विद्यार्थ्यांमध्ये संगीताची कला जोपासणाऱ्या अष्टकलापटू शिक्षिका प्रतिमा पोकळे.     🏵️  गुरू माझी माऊली  🏵️ सिंधुदुर्ग / ऋषिकेश मोरजकर    जीवन हे विविध कलानी भरलेलं असतं. मात्र त्याची जाणीव विद्यार्थी दशतच व्हायला हवी. अशी जाणीव झाली की शिक्षणाबरोबरच माणसाचा भविष्यात सर्वांगीण विकास घडतो आणि ते व्यक्तिमत्व लोकांसमोर येते. विद्यार्थ्यांमधील कला विकासाची अशी जाणीव करून देणाऱ्या आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड जोपासणाऱ्या ज्याला आपण अष्टकलापटू म्हणू शकतो अशा गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे! सध्या त्या नांदगाव प्राथमिक शाळा एक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून आजवर त्यांची ज्या ज्या शाळेत नेमणूक झाली त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच त्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगावात ईद ए मिलाद उत्साहात. नांदगाव |(ऋषिकेश मोरजकर) नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद  ए मिलादुननबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला    या वेळी सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी ८ वाजता नांदगाव तिठा व खालची मुस्लिम बांधव गोसिया मस्जिद येथून आपल्या मोहलयातून रॅली काढली व या रॅलीत त्यांनी ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक, नारे तकबिर आलोहो अकबर,नारे रिसालत या रसुलुला अश्या घोषणा दिल्या या वेळी प्रत्येक मोहलयातून घराघरात मिठाई शिरखुरमा सामोसे, लाडू, सरबत पाणी आदी वस्तू ईद मुबारक निमित्ताने वाटण्यात आले या रॅलीत सर्व मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील कासार्डे पोलीस दुरक्षेत्र पोलीस झोरे, वाहतूक पोलीस आबिटकर, पोलिस शिंदे , आदी उपस्थित होते. ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील व वाहतूक पोलीस आबिटकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी मनोज पाटील यांनी ईद मुबारक निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मुस्लिम -हिंदू बांधवांना नियाज (प्रसाद ) वाटण्यात आला.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे ठीक ठिकाणी गणपती बाप्पा चे भक्तीमय वातावरणात विसर्जन. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात फटक्यांच्या आतषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. नांदगाव वरची वाडी येथील पाटील वाडी गणेश कोंड गणपती साना,पावाची वाडी नदीकाठी, मधली वाडी, वाघाची वाडी, गोसावी, कुंभार वाडी ,पाटवणे वाडी अशा ठिक ठिकाणी गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  प्रसाद लोके खून प्रकरणी शिवसेना आक्रमक. आम्ही जनतेच्या बाजूने, तपास सीआयडीकडे द्या -संदेश पारकर कणकवली प्रतिनिधी  मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके हिची आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मिठबाव ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे, आणि ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.  गेल्या वर्षभरात पोलीस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. स्थानिक पोलीस योग्य पद्धतीने काम करीत नाहीत. सध्या गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे, हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्र...
इमेज
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंची मदत,आरोग्य शिबीर सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने  मदत;जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत जोपासली सामाजिक बांधिलकी  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम मध्ये २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने  जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी संवाद साधला.तसेच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. तपसे  यांनी आजी-आजोबांचे जनरल चेकअप  केले. त्यांना  सिंधुदूर्ग डीस्ट्रीक केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांचा मार्फत मोफत मेडीसिन देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सिंधुदुर्ग केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, दयानंद उबाळे, विजय लोके ,दिनेश वळंजू,  मुकुंद जाधव ,राहुल पाटील, विश्वनाथ गुरव आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये सर्व आजी आजोबांनी ...

सिंधुदुर्ग today

इमेज
ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद घाला. ... अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा. कणकवली | प्रतिनिधी  आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते. नियमानुसार ही वाहतूक करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, परराज्य अथवा परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यात बऱ्यापैकी वाहने ही १६ चाकी ट्रक आहेत. स्पर्धेच्या काळात ही वाहने चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात जातात. गेल्या आठवड्यात तोरसोळेच्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
ठाकरे शिवसेनेतर्फे 'होऊ द्या चर्चा'चे २६ सप्टेंबरला कणकवलीत आयोजन. कणकवली|ऋषिकेश मोरजकर  शिवसेना उद्भव ठाकरे गटातर्फे सध्या 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फेही 'होऊ द्या चर्चा'चे आयोजन मंगळवार, २६ सप्टेंबरला सकाळी ११ वा. येथील विजय भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.                                                                     श्री. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक आश्वासने दिलीत. शिवस्मारक समुद्रात बांधणे, दाऊदला अटक करणे, गंगा स्वच्छ करणे, स्मार...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या स्पर्धांवर कबड्डीपटूंचा बहिष्कार.  सिंधुदुर्ग today : विशेष प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनकडूनजिल्ह्यातील कबड्डीपटूंवर होणारा अन्याय तसेच जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धा आयोजक,आजी माजी कबड्डीपटू यांना विश्वासात न घेता तालुका, जिल्हा कार्यकारिणी घोषित केल्याचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील अठरा मंडळांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धा न खेळण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.     सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीपटू व आयोजक यांना विश्वासात न घेता शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनच्या पदाधिकारी यांच्याकडून कबड्डीपटूंवर सतत होणारा अन्याय याबाबत रविवारी जिल्ह्यातील अठरा मंडळाचे खेळाडू,व्यवस्थापक, कबड्डी प्रेमी रवळनाथ मंदिर ओरोस येथे एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणा-या स्पर्धा न खेळण्याचा एकमताने निर्णय घेतला.       यावेळी पंचक्रोशी फोंडाघाट,जय महाराष्ट्र सावंतवाडी,शिवभवानी सावंतवाडी,...

सिंधुदुर्ग today

इमेज
  ...................................... ◼️सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत इचलकरंजीच्या साहित्य सांस्कृतिक परिवर्तन चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते आणि इचलकरंजी सरस्वती हायस्कूलचे गुणवंत शिक्षक महावीर कांबळे !*   ....................................... *🛑 इचलकरंजी शहराचे सांस्कृतिक दूत*...       *गुणवंत शिक्षक महावीर कांबळे*         *🏵️ गुरू माझी माऊली* 🏵️ *सिंधुदुर्ग/ ऋषिकेश मोरजकर*     समकालीन काळात कधी नव्हे एवढी साहित्य सांस्कृतिक परिवर्तन चळवळीची गरज असताना "मी मोर्चा नेला नाही, मी परिवर्तनासाठी लिहिलं नाही" असा म्हणणारा अभिजन वर्ग पुन्हा नव्याने पुढे येत आहे.तर दुसऱ्या बाजूला काही अपवादात्मक कार्यकर्ते पदरमोड करून सांस्कृतिक परिवर्तन चळवळीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यातीलच एक अग्रेसर नाव म्हणजे इचलकरंजी शहरातील बहुआयामी गुणवंत शिक्षक कवी महावीर कांबळे! इतर चळवळींबरोबरच इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या... नांदगाव येथे गौरी गणपती भक्तीमय वातावरणात विसर्जन नांदगाव | प्रतिनिधी गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज गौरी गणपती भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार   नांदगाव | प्रतिनिधी श्री. महापुरुष सेवा संघ, मधली वाडी,नांदगांव कणकवली, यांच्या सौजन्याने आणि कै. पार्वती कृष्णा कांदळकर, कै. पुष्पलता आप्पा कांदळकर आणि कै. निर्मला कांदळकर  यांच्या स्मरणार्थ 10 वी आणि 12 वी विध्यार्थी यांचा सत्कार समारंभ आज वसंतराव चव्हाण सभागृह नांदगाव मधली वाडी येथे संपन्न झाला आहे.       यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  डॉ.सोहनी, महापुरुष सेवा संघांचे अध्यक्ष शशिकांत शेटये, महापुरुष सेवा संघांचे मुंबई चे अध्यक्ष सुरेश पाटील, आप्पा म्हसकर, वसंत कांदळकर, अजित महाजन, शाम म्हसकर, मनोहर म्हसकर, विठोबा कांदळकर, माजी सरपंच संजय पाटील, महापुरुष सेवा संघांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ....................................... सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत विद्यार्थ्यांची साहित्यिक जडणघडण अनुकरणात आणणारे नडगिवे प्रा.शाळेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शिक्षक संदीप हरी कदम! ....................................... संदीप हरी कदम विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष साहित्यिक जडघडण घडविणारे शिक्षक    गुरू माझी माऊली सिंधुदुर्ग/ऋषिकेश मोरजकर         शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न करताना मुलांच्या उपजत गुणांना विकसित करणे महत्वाचे असते.असाच शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा गुरू बनु शकतो.याला साजेस काम करणारे अपवादाने जे शिक्षक आहेत, त्यातील अग्रक्रमाने ज्यांच आपल्याला नाव  घ्याव लागेल ते म्हणजे सध्या जि.प. प्रा.शाळा नडगिवे नं.१ (कणकवली) या शाळेत कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक संदीप हरी कदम होय! त्यांनी विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणवत्ता विकसित करून सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात एक इतिहास घडविला. त्यांच्या म...

सिंधुदुर्ग today

इमेज
....................................... सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि सेवाभावी शिक्षक विजय अर्जुन सावंत!* ....................................... कुंब्रल गावचे नाव उंचावणारे विजय सावंत प्रसिद्ध कवी ते सेवाभावी  शिक्षक                 गुरू माझी माऊली सिंधुदुर्ग/ऋषिकेश मोरजकर      ज्ञानदान करणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षकाचाही सर्वांगीण विकास झालेला पाहिजे! असा सर्वांगीण विकास झालेले शिक्षक म्हणजे कोकणातील प्रसिद्ध कवी विजय अर्जुन सावंत. सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून ते अग्रेसर आहेतच परंतु वेळप्रसंगी सेवाभावी वृत्तीने कोणत्याही प्रकारचे सहयोग देण्याचे योगदान त्यांनी आजवर दिल्यामुळे कवी सावंत यांनी कायमच आपल्यातील संवेदनशीलता जोपासली. त्यांच्या या सर्व सेवाभावी विकसनशील वाटचालीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील विठ्ठल बिडये याने एका रुग्णाला अती दुर्मिळ असलेला ए निगेटिव्ह रक्त देऊन  जोपासली     सामाजिकता .  कणकवली प्रतिनिधी  नांदगाव येथील विठ्ठल विजय बिडये यांनी एका रुग्णाला अती दुर्मिळ असलेला ए निगेटिव्ह रक्त देऊन आपल्यातील सामाजिकता जोपासली आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. याबाबत माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील एक रुग्ण अत्यंत गंभीर आजाराने रुग्णालयात दाखल केला होता. त्याला ए निगेटिव्ह रक्तच्या 3 पिशव्यांची आवश्यकता होती. त्या रुग्णाला 2 रक्त पिशव्यांची व्यवस्था झाली. मात्र, 1 पिशवी अत्यावश्यक होती. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत नांदगाव येथील विठ्ठल विजय बिडये यांनी सामाजिकता जोपासत रक्तदान केले. यामुळे त्या रुग्णाची तब्बेत आता बरी होण्यास बरीचशी मदत होईल. या त्यांच्या सामाजिकतेमुळे बिडये यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहे. 

सिंधुदुर्ग today

इमेज
गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... च्या जयघोष करीत लाडक्या गणरायाचे आगमन सर्वत्र गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण सिंधुदुर्ग | ऋषिकेश मोरजकर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोष करीत लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सर्वत्र करण्यात आली आहे. कोकणातील गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण असून सर्व ठिकाणी गणपती प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.       गणेश चतुर्थी अगोदर दोन दिवस तर आज ही गणपती शाळेतून वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... जयघोष करीत वाजत गाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे.     मुंबई कर चाकरमानी सुध्दा मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.आज पासून भजनी मंडळांचा ही नाद घुमणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सावित्री-ज्योती संशोधक दत्तक योजनेसाठी आवाहन अक्षरवाङ्मय प्रकाशन संस्थेचे आयोजन कणकवली/प्रतिनिधी     कोकणसह सर्व संशोधक विद्यार्थ्यांसाठी अक्षरवाङ्मय प्रकाशनातर्फे २०२३ या वर्षासाठी संशोधक दत्तक योजना आयोजित करण्यात आली आहे. यात दोन संशोधक विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून यासाठी खालील गोष्टीचा विचार करून संशोधक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन अक्षरवाङ्मय प्रकाशनाचे संचालक बाळासाहेब घोंगडे आणि प्रगती किरण गावडे यांनी केले आहे.       सदर संशोधक विद्यार्थी दत्तक पालक योजनेसाठी पुढील प्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया असेल-संशोधकाचे पूर्ण नाव,मार्गदर्शकाचे पूर्ण नाव, विद्यापीठाचे पूर्ण नाव,संशोधन केंद्राचे पूर्ण नाव,संशोधन केंद्र समन्वयकाचे पूर्ण नाव,विषय मंजुरी-नोंदणी दिनांक, विषय मंजुरीचे पत्र..(छायांकित प्रत), प्रबंधाचा संक्षिप्त आराखडा साधन ग्रंथांची यादी,संदर्भ ग्रंथांची यादी,आपले काही लेखन नियतकालिकात किंवा नामांकित वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले असेल, तर त्याची छायांकित प्रत, आपला संशोधनाचा जो विषय आहे, त्या अनुषंगाने एखाद्या नामांकित समीक्षकाचेआपल...

सिंधुदुर्ग today

इमेज
ऐन गणेश चतुर्थीत विजेचा खेळ खंडोबा सुरूच ; ग्राहक - मुंबई कर चाकरमानी आक्रमक नळपाणी योजनेवर विपरीत परिणाम आता बस्स झाले दोन दिवसांत विज ग्राहक संघटना स्थापन नांदगाव  प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये वीज वितरण कंपनीचा खेळखंडोबा सुरूच ग्राहक व मुंबई कर चाकरमानी आक्रमक झाले आहेत. श्री गणेश चतुर्थी आदल्या दिवशी बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी आगमन झाले असताना या गणेश चतुर्थीत विजेचा खेळ खंडोबा मात्र सुरू असून यामुळे ऐन पावसाळ्यात व गणेश चतुर्थी काळात नळपाणी योजनेवर विपरीत परिणाम होत आहे        आता बस्स झाले असून नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे विज ग्राहक एकत्र येत असून दोन दिवसांत विज ग्राहक संघटना स्थापन होणार असल्याचे ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे. वीज ग्राहकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गणेश चतुर्थी काळात असा विज पुरवठा खंडित झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
योगिता शेटकर यांची कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते करुणेचा प्रवाह' काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात ऍड.देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन कवी अजय कांडर यांच्या हस्ते संग्रहाचे प्रकाशन: मधुकर मातोंडकर, प्रा.वैभव साटम यांची उपस्थिती सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर        कवयित्री योगिता शेटकर यांच्या 'करुणेचा प्रवाह' या संग्रहाचे शीर्षक फार अप्रतिम आहे.जगात करुणे सारखी सर्वात सुंदर गोष्ट कोणती नाही. 'करुणेचा प्रवाह' या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते. यामुळेच योगिता शेटकर हिचे मराठी कवितेतील भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले.     कवयित्री योगिता शेटकर यांच्या 'करुणेचा प्रवाह' या ग्लोबल बुक हाऊस मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते झाले. ऍड.परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा. वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर उपस्थित होते. यावेळी बो...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव फोंडा रस्त्यावर वडाचे झाड पडले; विज पुरवठा खंडित. काही काळ वाहतूक खोळंबली. नांदगाव|ऋषिकेश मोरजकर  देवगड निपाणी महामार्गावर फोंडाघाट नांदगाव रस्त्यालगत तोंडवली बोभाटेवाडी दरम्यान वडाचे झाड महामार्गावरच पडल्याने वाहतुकीचा खोळंबा  झालेला आहे. त्याचप्रमाणे सदर वडाचे झाड हे वीज वितरण च्या लाईन वर पडल्याने तोंडवली  भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झालेला आहे.            सदर विज वितरण कर्मचारी दाखल झाले असून विद्युत लाईन तुटून पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे.सदर पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू आहे.मात्र पाऊस ही जोरदार सुरू असल्याने व्यत्यय येत आहे.        सदर धोकादायक वडाचे झाड तोडण्यासाठी लगतच घर असलेले समीर बोभाटे यांनी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात मागणी केली होती. मात्र या लेखी निवेदनाला केराची टोपली दाखवली की काय ? असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मात्र अशी धोकादायक झाडे न तोडल्याने गणेश उत्सवाच्या तोंडावरच सदर वृक्ष विद्युत लाईन वर पडल्याने वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालेला आहे. जर धोकादायक वृक्ष त्वरित ...

सिंधुदुर्ग today

इमेज
श्री गणेश चतुर्थी एक दिवसावर तरी विजेचा खेळ खंडोबा मात्र सुरूच ; ग्राहक आक्रमक नागेश मोरये यांचा आंदोलनाचा इशारा नांदगाव वार्ताहर कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये वीज वितरण कंपनीचा खेळखंडोबा सुरूच आहे अवघ्या एका दिवसावर लाडक्या गणरायाचे आगमन राहिले असतानाच वीज वितरण चा खेळ खंडोबा सुरूच असल्याने वीज ग्राहकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गणेश चतुर्थी काळात असा विज पुरवठा खंडित झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.         पाच - पाच दहा मिनिटांनी सध्या लाईट जात आहे. गणपती शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू असून त्यांना ही रंगरंगोटी करताना वारंवार होत असलेल्या विज पुरवठा खंडित मुळे व्यत्यय येत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मधली वाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप  नांदगाव | (ऋषिकेश मोरजकर)  महापुरुष सेवा संघ आयोजित लायन्स क्लब ठाणे कोपरी आणि बाळकृष्ण म्हसकर यांच्या सौजन्याने नांदगाव मधली वाडी येथील  जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले आहे       या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनी, बाळकृष्ण म्हसकर ,आप्पा म्हसकर, वसंत कांदळकर, विठोबा कांदळकर ,श्रीकृष्ण कांदळकर, सुरेश वर्धन ,विजय महाजन, सुनील कोरगावकर, रवींद्र म्हसकर, शाळेच्या मुख्याध्यापका जावकर मॅडम आणि शिक्षक वर्ग पालक वर्ग उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ते फोंडा रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यास 22 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आबु मेस्त्री यांनी दिला बांधकाम विभागाला इशारा नांदगाव|प्रतिनिधी देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव ते फोंडा पर्यंत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे या खड्ड्यामुळे काही वेळा दुचाकींचा अपघात होताना दिसत आहे. सदर खड्डे श्री गणेश चतुर्थी पुर्वी बुजवावेत तसेच दुतर्फा वाढलेली झाडी सुध्दा तोडण्यात यावी . रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा तोंडवली येथील आबु मेस्त्री यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
डॉ दत्ता तपसे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी, विविध ठिकाणी साजरा सिंधुदुर्ग|प्रतिनिधी  राजमुद्रा मेडिकल फौंडेशन व कॅगमो संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी  शिबिर माळेगाव येथे पार पडले, तसेच भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले,डोळ्याची तपासणी डॉ अविनाश अघोर यांच्या कडून करण्यात आली तसेच दाताची तपासणी डॉ सोनवणे यांच्या मार्फत करण्यात आली, स्त्री रोग तज्ञ डॉ भालेराव सर यांनी गरोदर माता यांची तपासणी केली, हाडांची, संधीवात तपासणी  डॉ केशव सारुख यांनी केली,मधुमेह रक्तदाब तपासणी  केली. या शिबिरास केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ आठवले सर यांनी भेट दिली, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, राजमुद्रा फौंडेशन चे सचिव ज्ञानेश्वर गिरी, संजय भालेराव, रमेश तपसे, अजित लोमटे उपस्थित होते.डॉ तपसे यांचा वाढदिवस धाराशिव, संभाजीनगर, बीड व लातूर याठिकाणी साजरा करण्यात आला.

सिंधुदुर्ग today

इमेज
बावशी समाज प्रतिष्ठान महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी सुहासिनी कांडर प्रतिष्ठानच्या बैठकीत एकमताने निवड कणकवली/प्रतिनिधी        बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी सुहासिनी उर्फ कल्पना कांडर यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. बावशी येथे प्रतिष्ठानच्या झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. यावेळी महिलांसाठी पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात निर्णयही घेण्यात आले.        बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानची बैठक प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विलास कांडर यांच्या अध्यक्षतेखाली बावशी गावठण येथे आयोजित करण्यात आली.प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह समीर मयेकर, उपाध्यक्ष मोहन खडपे, सहकार्यवाह संजय राणे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सदस्य नारायण मर्ये, भरत कांडर, सुवर्णा राणे, मनीषा राणे, रोहिणी कांडर, समीक्षा मयेकर, वनिता कांडर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत सुहासिनी कांडर यांची बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शाहू फुले आंबेडकर यांच्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे गणेश उत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यापारी, रिक्षा, यांची बैठक संपन्न. सकारात्मक चर्चा ; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केले जाणार प्रयत्न गणेश उत्सव काळात बाजारात दुचाकी ना  नो पार्किंग  नांदगाव |ऋषिकेश मोरजकर  गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण नियोजन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी,आठवडा बाजार याबाबत कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत व  महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची  बैठक नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा करून तसेच बाजारात जात  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करुन संपूर्ण सहकार्य नांदगाव ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त समिती ला  केले जाणार असल्याचे व्यापारी तसेच रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी सांगितले आहे.        यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेश उर्फ राजू तांबे, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, माजी सरपंच शशिकांत शेटये, संतोष जाधव सर,पत्रकार ऋषिकेश मोरजकर, पोलिस हवालदार श्री झोरे, तात्या पारकर ,राजा म्हसकर, र...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवयित्री योगिता शेटकर यांच्या काव्यसंग्रहाचे १७ रोजी सावंतवाडीत प्रकाशन ऍड. देवदत्त परुळेकर, कवी अजय कांडर, प्रा.वैभव साटम, मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती काव्यरसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली/ प्रतिनिधी      कवयित्री योगिता शेटकर यांच्या मुंबई येथील ग्लोबल बुक हाऊस प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ' 'करुणेचा प्रवाह ' कव्यांग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार १७ सप्टेंबर रोजी स.१०.३० वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा.वैभव साटम आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.     सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज लिहिल्या जाणाऱ्या नव्या पिढीतील योगिता शेटकर या आश्वासक कवयित्री आहेत विविध दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असून अनेक कविसंमेलनांमध्ये त...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव हायवे संदर्भात प्रश्न सुटणार कधी ? घोड कुठं अडलय ; ग्रामस्थांचा सवाल समस्या मार्गी न लागल्यास तिव्र आंदोलन नांदगाव ऋषिकेश मोरजकर     मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथे हायवे संदर्भात कित्येक समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रामुख्याने सांगायचे झाले तर नांदगाव ओटव फाटा ब्रिज जवळील एका साईट चा सर्व्हिस रोड अद्याप ही वाहतूक योग्य नाही. कारण अजून धिम्या गतीने गटाराचे काम सुरू आहे.तसेच या कामानिमित्त वाळू खडी टाकली असल्याने वाहतूक सुध्दा विरुद्ध दिशेने न्यावी लागत आहे.आता तर काही दिवसांवर गणेश चतुर्थी येत आहे. यामुळे मुंबई गोवा हायवे वरील चाकरमान्यांचे ट्रॅफिक पाहता विरूद्ध दिशेने वाहने नेने चुकीची आहे . मात्र नांदगाव मधील ओटव माईन फाट्याच्या खालील भाग म्हणजेच नांदगाव,ओटव, माईन, सावडाव यांना पर्यायच नसल्याने विरुद्ध दिशेने जावे लागत आहे. तसेच हायवे ब्रिज वरील सर्व पथदिवे सुरू आहेत. मात्र नांदगाव ओटव फाटा येथील पथदिवे अद्याप ही बंदच असून  ट्रांसफार्मर साठी जागा उपलब्ध होत नव्हती ती ही जागा नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या पुढाकाराने भवानी कॉम्प्लेक्स चे मालक अमोल गा...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक संपन्न गणेश उत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या व्यापारी, रिक्षा, मॅजिक यांची बैठक नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची समिती पुनर्रगठीत केल्यानंतर पहीलीच बैठक नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली आहे.        यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेश उर्फ राजू तांबे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, सेवावृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव,पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तलाठी सुदर्शन अलकुटे,शामसुंदर मोरये, तात्या पारकर , राजा म्हसकर, राजेंद्र पाटील आदी सदस्य उपस्थित होते.     यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यात प्रामुख्याने काही दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी निमित्त मुंबई गोवा महामार्ग तसेच देवगड निपाणी राज्य महामार्ग असलेल्या ठीकाणी आठवडा बाजार व इतर दिवशी ही मोठ्या प्रमाणात वाहतूक व वरदळ असते. यामुळे येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या व्यापारी रिक्षा मॅजिक सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी  कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील यांची निवड नांदगाव मधून तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून ऋषिकेश मोरजकर  कणकवली |प्रतिनिधी  कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  कणकवली शासकीय विश्रामगृहावर वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन म्हापणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा समन्वयक अ‍ॅड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, जिल्हा सल्लागार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थितीत होते. या बैठकीत कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली, यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष म्हणून उमेश वाळके, राजेश सापळे, विलास कोरगावकर, संजय सरवनकर, सहसचिव बेनी डिसोझा, सुजित जाधव, खजिनदार मिलिंद खाडये...

सिंधुदुर्ग today

इमेज
बावशीत उधळला महिलांनी श्रावण रंग बावशी सामाजिक प्रतिष्ठानच्या महिलांच्या 'श्रावण रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतून महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ऍड.प्राजक्ता शिंदे, ऍड.मेघना सावंत यांचेही महिलांना मार्गदर्शन कणकवली/प्रतिनिधी        श्रावण आणि महिला यांचे विशेष नाते आहे. हे नाते अधोरेखित झाले ते बावशी येथे आयोजित करण्यात आलेल्या "श्रावण रंग" या महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून! या कार्यक्रमात फुगडी, उखाणी, गाणी आणि लेझीम नृत्य महिलांनी सादर करून अक्षरश: श्रावण रंग उधळला! बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमात ऍड.प्राजक्ता शिंदे आणि ऍड. मेघना सावंत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.        बावशी - तोंडवली पंचक्रोशीतून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात काबाडकष्ट करून मुलाला उच्चशिक्षित बनविणाऱ्या बावशी शेळीचीवाडी येथील रसिका मांडवकर सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ भाऊ रांबाडे, सेवाभावी व्यवसायिक गणेश बांदिवडेकर यांचा शाल भेटवस्तू आणि ग्रंथ देऊन ऍड.प्राजक्ता शिंदे आणि ऍड. मेघना सावंत यांच्या हस्...