असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंची मदत,आरोग्य शिबीर

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने  मदत;जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत जोपासली सामाजिक बांधिलकी 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम मध्ये २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने 

जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी संवाद साधला.तसेच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. तपसे  यांनी आजी-आजोबांचे जनरल चेकअप  केले.

त्यांना  सिंधुदूर्ग डीस्ट्रीक केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांचा मार्फत मोफत मेडीसिन देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

सिंधुदुर्ग केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, दयानंद उबाळे, विजय लोके ,दिनेश वळंजू,  मुकुंद जाधव ,राहुल पाटील, विश्वनाथ गुरव आदी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये सर्व आजी आजोबांनी शिबिराचा लाभ घेतला . कार्यक्रमाची सांगता दिविजा वृद्धाश्रम संदेश शेट्ये यांनी करत ' झाडे लावा व झाडे जगवा' याची जनजागृती केली.दिविजा वृद्धाश्रमामार्फत आलेल्या मान्यवरांना फुलझाड देत कार्यक्रमाची सांगता केली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today