सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कमिटीचे केले कौतुक.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

नांदगाव तिठा येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केरण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर ,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले , यासिर मास्के, शाहिद बटवाले ,जुबेर मास्के, तैयब बटवाले ,यासिन नावलेकर ,गफार बटवाले ,तन्वीर साटविलकर ,पोलिस किरण मेथे, आदि मान्यवर उपस्थित होते.   यावेळी यादव साहेब यांनी ईद मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी चे कौतुक केले व रक्तदान हे सर्वांत महत्त्वाचे दान आहे जसे आपण अवयव दान करतो व अडीअडचणीला धावून जातो तेव्हा असे समाज उपयोगी काम महत्वाचे आहे. हा कार्यक्रम आणखी मोठा होवो व अश्या कार्यक्रमाला मोठं मोठि माणसं आपोआप येतील व या कमेटी ला शाबासकी देतील असे चांगले  उद्गागार काढले. रक्तदान शिबीर ला अनेक मान्यवर यांनी भेट दिली‌ या वेळी ३५ रक्तदान झाले. व ७० रक्तगट तपासणी झाली . यावेळी रक्तदान शिबिराला डॉ अभिजित इगे व डॉ शिंदे मॅडम उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today