सिंधुदुर्ग today



सावित्री-ज्योती संशोधक

दत्तक योजनेसाठी आवाहन

अक्षरवाङ्मय प्रकाशन संस्थेचे आयोजन

कणकवली/प्रतिनिधी

    कोकणसह सर्व संशोधक विद्यार्थ्यांसाठी अक्षरवाङ्मय प्रकाशनातर्फे २०२३ या वर्षासाठी संशोधक दत्तक योजना आयोजित करण्यात आली आहे. यात दोन संशोधक विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून यासाठी खालील गोष्टीचा विचार करून संशोधक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन अक्षरवाङ्मय प्रकाशनाचे संचालक बाळासाहेब घोंगडे आणि प्रगती किरण गावडे यांनी केले आहे.

      सदर संशोधक विद्यार्थी दत्तक पालक योजनेसाठी पुढील प्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया असेल-संशोधकाचे पूर्ण नाव,मार्गदर्शकाचे पूर्ण नाव, विद्यापीठाचे पूर्ण नाव,संशोधन केंद्राचे पूर्ण नाव,संशोधन केंद्र समन्वयकाचे पूर्ण नाव,विषय मंजुरी-नोंदणी दिनांक, विषय मंजुरीचे पत्र..(छायांकित प्रत),

प्रबंधाचा संक्षिप्त आराखडा

साधन ग्रंथांची यादी,संदर्भ ग्रंथांची यादी,आपले काही लेखन नियतकालिकात किंवा नामांकित वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले असेल, तर त्याची छायांकित प्रत,

आपला संशोधनाचा जो विषय आहे, त्या अनुषंगाने एखाद्या नामांकित समीक्षकाचेआपल्याला आवडलेले मत ( वा भूमिका ) निवडून ते स्व-हस्ताक्षरात लिहून पाठवणे. आपण अक्षर पुस्तकालयातून वा इतर ठिकाणाहून पुस्तके खरेदी केलेली असतील; तर त्याची सूची रितसर डीटीपी करून पाठवावी. आपला अर्ज कोणीही मेलवर न पाठवता तीन प्रतीत प्रिंट काढून खालील पत्त्यावर (30 सप्टेंबर 2023 पर्यंत रजिस्ट्रर पार्सल किंवा स्पीड पोस्टद्वारे) पाठवावा.

   यासंदर्भात बोलताना बाळासाहेब धोंगडे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी संशोधक विद्यार्थी दत्तक घेण्याची कल्पना सुचली आणि दोन संशोधक विद्यार्थी निवडले गेले. आता, 2023 मध्ये आणखी दोन संशोधक विद्यार्थी निवडायचे आहेत. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून अभ्यासक डॉ. प्रमोद मुनघाटे आणि डॉ. हेमंत खडके यांच्या नावाची शिफारस अनुक्रमे डॉ. राजन गवस आणि डॉ. सुधाकर शेलार या अभ्यासकांनी केली. यावर्षी 'रितसर अर्ज मागवून संशोधक विद्यार्थ्याची निवड करावी' अशी सूचना गवस यांनी केली. त्यानंतर संशोधक विद्यार्थी कसे निवडायचे याविषयी विचार करून अर्ज मागविण्याची प्रक्रिया कशी करावी, त्याची आखणी कशी करावी, याचा विचार केला आणि अर्जाची प्रक्रिया ठरवली गेली.तरी संशोधक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावेत.

कविता बाळासाहेब घोंगडे

प्रगती कलेक्शन अ‍ॅण्ड ब्युटी पार्लर ॠतुनगरी बसस्टॉपशेजारी

धायरी, बेनकरनगर, 

पुणे- 411041

संवाद : 9834032015

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today