सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील विठ्ठल बिडये याने एका रुग्णाला अती दुर्मिळ असलेला ए निगेटिव्ह रक्त देऊन जोपासली सामाजिकता .
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव येथील विठ्ठल विजय बिडये यांनी एका रुग्णाला अती दुर्मिळ असलेला ए निगेटिव्ह रक्त देऊन आपल्यातील सामाजिकता जोपासली आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
याबाबत माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील एक रुग्ण अत्यंत गंभीर आजाराने रुग्णालयात दाखल केला होता. त्याला ए निगेटिव्ह रक्तच्या 3 पिशव्यांची आवश्यकता होती. त्या रुग्णाला 2 रक्त पिशव्यांची व्यवस्था झाली. मात्र, 1 पिशवी अत्यावश्यक होती.
अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत नांदगाव येथील विठ्ठल विजय बिडये यांनी सामाजिकता जोपासत रक्तदान केले. यामुळे त्या रुग्णाची तब्बेत आता बरी होण्यास बरीचशी मदत होईल. या त्यांच्या सामाजिकतेमुळे बिडये यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा