सिंधुदुर्ग today

 


......................................

◼️सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत इचलकरंजीच्या साहित्य सांस्कृतिक परिवर्तन चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते आणि इचलकरंजी सरस्वती हायस्कूलचे गुणवंत शिक्षक महावीर कांबळे !*  

.......................................


*🛑 इचलकरंजी शहराचे सांस्कृतिक दूत*...

      *गुणवंत शिक्षक महावीर कांबळे*


        *🏵️ गुरू माझी माऊली* 🏵️


*सिंधुदुर्ग/ ऋषिकेश मोरजकर*

    समकालीन काळात कधी नव्हे एवढी साहित्य सांस्कृतिक परिवर्तन चळवळीची गरज असताना "मी मोर्चा नेला नाही, मी परिवर्तनासाठी लिहिलं नाही" असा म्हणणारा अभिजन वर्ग पुन्हा नव्याने पुढे येत आहे.तर दुसऱ्या बाजूला काही अपवादात्मक कार्यकर्ते पदरमोड करून सांस्कृतिक परिवर्तन चळवळीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यातीलच एक अग्रेसर नाव म्हणजे इचलकरंजी शहरातील बहुआयामी गुणवंत शिक्षक कवी महावीर कांबळे! इतर चळवळींबरोबरच इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या शहरात त्यांनी चालविलेले सांस्कृतिक काम महत्वपूर्ण असे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्री कांबळे हे एका अर्थाने इचलकरंजीच्या साहित्य सांस्कृतिक परिवर्तन चळवळीचे सांस्कृतिक दूतच आहेत.महावीर कांबळे हे गेली २५ वर्षे इचलकरंजी सरस्वती हायस्कूल मध्ये मराठी विषयाचे अभ्यापन करत आहेत.तिथेही त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगल्भ असा सांस्कृतिक विकास होण्यासाठी आपले योगदान दिले आहे. अशा या गुणवंत शिक्षकाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

       एक शिक्षक म्हणून, एक क्रियाशील सांस्कृतिक कार्यकर्त्या म्हणून महावीर कांबळे यांनी लौकिक अर्थाने इचलकरंजीच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम यशही मिळवले.पण हे काम करताना त्यांची त्या कामा मागील स्वतंत्र दृष्टी नजरेआड करता येणार नाही.प्रसंगी कार्यक्रमाचे मोल इतकिंचीतही कमी होऊ नये म्हणून ते त्या क्षेत्रातील महनीय व्यक्तीचे मार्गदर्शन घेणेही महत्त्वाचे मानतात. यामुळे अगदी अल्प कालावधीमध्ये इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानने पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण असे लक्षवेधी काम केले आहे.एवढंच नाही तर आपल्या गावचे नावही सांस्कृतिक क्षेत्रात उंचवायला हवे तेथीलही तरुणाचा सांस्कृतिक विकास व्हायला हवा या उद्देशाने त्यांनी शिरढोण सारख्या ग्रामीण भागात महावीर कांबळे आणि त्यांचे गावातील इतर सहकारी हे दरवर्षी एकदिवसीय साहित्य संमेलन भरवून गावचा सांस्कृतिक विकास करण्याचा गेली अनेक वर्षे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.हे सगळ करताना दुसरीकडे आपणच हे करतो असाही त्यांच्या बोलण्यात अहंभाव नाही. या त्यांच्या स्वभावातील नम्रतेमुळेच श्री कांबळे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील चांगल्या कार्यकर्त्यांच्या रांगेत बसू शकतात. असे आपण खात्रीने सांगू शकतो. याबद्दल कुणाचेही दुमत असू नये!

         महावीर एकनाथ कांबळे यांचे शिक्षण एम.ए.बीएड झाले असून ते २५ वर्षे सरस्वती हायस्कूल इचलकरंजी येथे अध्यापनाचे काम करत आहेत. मराठी आणि भूगोल या विषयात त्यांचे प्राविण्य आहे. त्यांच्या अध्यापनाखाली इ.१० विचा मराठी विषयाचा सातत्यानं  १००% निकाल आहे.तर १९९८ साली मराठी विषयात कोल्हापूर विभागात त्यांच्या शाळेची मुलगी प्रथम आली होती.त्यांनी आजवर निबंध स्पर्धा,वक्तृत्व,पथनाट्य स्पर्धेत मुलांना विपुल असे मार्गदर्शन केले आहे.त्यांनी अनेक कार्यक्रमाचे यशस्वी निवेदन केले आहे.आजवर शाळांमधून अनेक विषयावर व्याख्यान त्यांनी दिले आहे.अनेक शिक्षकांच्या सेवानिवृतीच्या प्रसंगी व नेत्यांच्या 

सत्कार समारंभात त्यांच्याविषयीच मानपत्राच लिखाण त्यांनी केले आहे.शाळेत गेली १३ वर्षे "लेखक आपल्या भेटीला" हा उपक्रम राबवित आहेत.रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या मार्फत शाळेला नेहमी भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्य मिळवून देण्याविषयी त्यांनी कायमच पुढाकार घेतला आहे.सध्या रोटरी क्लब ऑफ अतिग्रे येथे रोटरीयन म्हणून काम ते करतायत.

        दरवर्षी शाळेत २७ फेब्रुवारी हा मराठी दिन मोठ्या उत्साहात तर साजरा करत असतात, पथनाट्य स्पर्धेत त्यांनी यश मिळविले आहे. गेली १२ वर्षे सेवाभूषण पुरस्काराचे आयोजन तसेच जिल्हास्तरीय बौद्धिक स्पर्धेच नेटकं नियेजन ते करत असतात.त्यांनी परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी काम केले आहे.

परिवर्तनशील व पुरोगामी विचाराच्या चळवळीशी, संस्थेशी जोडून चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू असतात.वाचनकट्टा या संस्थेच्या माध्यमातून शाळेत वाचनकट्टा स्थापन करून त्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढविणे यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.त्यांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमाचे नेटकं व उठावदार नियोजन असत.साहित्य परिषद,शिरढोण या संस्थेत काम करत असताना ते ग्रामीण साहित्य संमेलन भरवित असतात. गेली १० वर्षे .               एका साहित्यकृतीला रोख रक्कमेचा पुरस्कार या संमेलनात दिला जातो.त्याची कल्पनाही श्री कांबळे यांची.त्यांनी अक्षर मानव या संस्थेशी जोडून साहित्यिकांच्या मुलाखतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

संस्कृती प्रतिष्ठान,इचलकरंजी या संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी काम करत असताना संस्कृती संमेलनाचे आयोजन केले जाते.या संस्थेच्या माध्यामातून महाराष्ट्रातील नामंवत लेखक,कवी,साहित्यिक यांच्याशी जोडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत आहेत.दरवर्षी एका पुस्तकाला पुरस्कार दिला जातो तसेच कविसंमेलनाचे आयोजन केले जाते.

   त्यांनी लिहिलेल्या निबंधसरिता या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तसेच त्यांनी लिहिलेल्या काकासाहेब या चरित्रकथेचे प्रकाशन झाले असून त्यांनी

अनेक विषयावर लेखन आणि कविता लेखन केले आहे.त्यांनी

राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत दुसरा नंबर,मल्हारराव होळकर यांच्यावरील लिखाणास द्वितीय क्रमांक, मोर्चा या कथेस उत्तेजनार्थ प्राप्त केला आहे. क्रमांक.साहित्यसहयोग या दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाली आहे. 

   त्यांना राष्ट्र सेवा दल यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल इचलकरंजी यांचा नेशन बिल्डर अँवार्ड, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी संधटना यांचा गणू मांग आदर्श शिक्षक पुरस्कार,उत्कृष्ट वाचनकट्टा समन्वयक म्हणून गौरव,आपटे वाचन मंदिर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today