सिंधुदुर्ग today
नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक संपन्न
गणेश उत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या व्यापारी, रिक्षा, मॅजिक यांची बैठक
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची समिती पुनर्रगठीत केल्यानंतर पहीलीच बैठक नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली आहे.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेश उर्फ राजू तांबे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, सेवावृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव,पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तलाठी सुदर्शन अलकुटे,शामसुंदर मोरये, तात्या पारकर , राजा म्हसकर, राजेंद्र पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यात प्रामुख्याने काही दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी निमित्त मुंबई गोवा महामार्ग तसेच देवगड निपाणी राज्य महामार्ग असलेल्या ठीकाणी आठवडा बाजार व इतर दिवशी ही मोठ्या प्रमाणात वाहतूक व वरदळ असते. यामुळे येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या व्यापारी रिक्षा मॅजिक संघटना यांची बैठक आयोजित करण्याचे आजच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती बैठकीत ठरविण्यात आले आहे. 3 वा.व्यापारी संघटना,4 रिक्षा संघटना, 5 वा . मॅजिक संघटना या प्रमाणे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा