सिंधुदुर्ग today



नांदगाव फोंडा रस्त्यावर वडाचे झाड पडले; विज पुरवठा खंडित.

काही काळ वाहतूक खोळंबली.

नांदगाव|ऋषिकेश मोरजकर 

देवगड निपाणी महामार्गावर फोंडाघाट नांदगाव रस्त्यालगत तोंडवली बोभाटेवाडी दरम्यान वडाचे झाड महामार्गावरच पडल्याने वाहतुकीचा खोळंबा  झालेला आहे. त्याचप्रमाणे सदर वडाचे झाड हे वीज वितरण च्या लाईन वर पडल्याने तोंडवली  भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झालेला आहे.

           सदर विज वितरण कर्मचारी दाखल झाले असून विद्युत लाईन तुटून पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे.सदर पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू आहे.मात्र पाऊस ही जोरदार सुरू असल्याने व्यत्यय येत आहे.

       सदर धोकादायक वडाचे झाड तोडण्यासाठी लगतच घर असलेले समीर बोभाटे यांनी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात मागणी केली होती. मात्र या लेखी निवेदनाला केराची टोपली दाखवली की काय ? असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मात्र अशी धोकादायक झाडे न तोडल्याने गणेश उत्सवाच्या तोंडावरच सदर वृक्ष विद्युत लाईन वर पडल्याने वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालेला आहे. जर धोकादायक वृक्ष त्वरित संबंधित विभागाने हटविले असते तर ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया तेथील ग्रामस्थांमधून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today