सिंधुदुर्ग today



ठाकरे शिवसेनेतर्फे 'होऊ द्या चर्चा'चे २६ सप्टेंबरला कणकवलीत आयोजन.

कणकवली|ऋषिकेश मोरजकर 

शिवसेना उद्भव ठाकरे गटातर्फे सध्या 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फेही 'होऊ द्या चर्चा'चे आयोजन मंगळवार, २६ सप्टेंबरला सकाळी ११ वा. येथील विजय भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.                                                                     श्री. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक आश्वासने दिलीत. शिवस्मारक समुद्रात बांधणे, दाऊदला अटक करणे, गंगा स्वच्छ करणे, स्मार्टसिटी, कश्मिरी पंडितांना माघारी आणणे, आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव या आश्वासनांचे काय झाले? दाऊदला अटक करणं, गंगा स्वच्छ करण, स्माटासटा, काश्मरा पाडताना माघारा आणण, मराठा, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव या आश्वासनांचे काय नरेंद्र मोदी यांनी तर पंतप्रधान होण्यापूर्वी दरवर्षी देशात दोन करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ही सर्व आश्वासने हवेतच विरली आहेत. राज्य सरकारच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. या असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच 'होऊ द्या चर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात देश, राज्यभरातील विविध समस्या, सरकारचे अपयश याविषयी चर्चा होईल. तसेच संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा होणार आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, देवगड तालुकाप्रमुख जयेश नर मिलिंद साटप, डॉ. प्रथमेश सावंत व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिक, जनतेनेही उपस्थित राहून या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पारकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today