सिंधुदुर्ग today
बावशी समाज प्रतिष्ठान महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी सुहासिनी कांडर
प्रतिष्ठानच्या बैठकीत एकमताने निवड
कणकवली/प्रतिनिधी
बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी सुहासिनी उर्फ कल्पना कांडर यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. बावशी येथे प्रतिष्ठानच्या झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. यावेळी महिलांसाठी पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात निर्णयही घेण्यात आले.
बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानची बैठक प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विलास कांडर यांच्या अध्यक्षतेखाली बावशी गावठण येथे आयोजित करण्यात आली.प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह समीर मयेकर, उपाध्यक्ष मोहन खडपे, सहकार्यवाह संजय राणे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सदस्य नारायण मर्ये, भरत कांडर, सुवर्णा राणे, मनीषा राणे, रोहिणी कांडर, समीक्षा मयेकर, वनिता कांडर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत सुहासिनी कांडर यांची बावशी समाज सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या महिला सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेतून बावशी गावी सदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रमही महिलांसाठी राबविण्यात येणार आहेत. या सगळ्यांची जबाबदारी सुहासिनी कांडर यांच्यावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या संयोजनाची इतर जबाबदारी प्रतिष्ठांच्या सदस्या सुवर्णा राणे, वनिता कांडर, मनीषा राणे, समीक्षा मयेकर आणि रोहिणी कांडर यांच्यावरही देण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह समीर मयेकर आणि सहकार्य संजय राणे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा