सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे गणेश उत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यापारी, रिक्षा, यांची बैठक संपन्न.

सकारात्मक चर्चा ; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केले जाणार प्रयत्न

गणेश उत्सव काळात बाजारात दुचाकी ना नो पार्किंग 

नांदगाव |ऋषिकेश मोरजकर 

गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण नियोजन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी,आठवडा बाजार याबाबत कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत व  महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची  बैठक नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा करून तसेच बाजारात जात  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करुन संपूर्ण सहकार्य नांदगाव ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त समिती ला  केले जाणार असल्याचे व्यापारी तसेच रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी सांगितले आहे.

       यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेश उर्फ राजू तांबे, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, माजी सरपंच शशिकांत शेटये, संतोष जाधव सर,पत्रकार ऋषिकेश मोरजकर, पोलिस हवालदार श्री झोरे, तात्या पारकर ,राजा म्हसकर, राजेंद्र पाटील , यासिर मास्के, आदी सदस्य उपस्थित होते.

         व्यापारी बैठकीला व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर, उपाध्यक्ष मारुती मोरये, खजिनदार दाजी सदडेकर, अरुण बापार्डेकर,समिर बोभाटे,शैलेश टाकळे  तसेच रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर, सेक्रेटरी इक्बाल बटवाले ,दिलिप डामरे, आदी सर्व सभासद उपस्थित होते.

      यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यात प्रामुख्याने काही दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी निमित्त मुंबई गोवा महामार्ग तसेच देवगड निपाणी राज्य महामार्ग असलेल्या ठीकाणी आठवडा बाजार व इतर दिवशी ही मोठ्या प्रमाणात वाहतूक व वरदळ असते. यामुळे येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदगाव ग्रामपंचायत कडून काही प्रमाणात नियमावलीत बनवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.यात गणेश चतुर्थी काळात व बाजारा दिवशी येणाऱ्या सर्व दुचाकी धारकांना पार्कींग साठी ब्रिज खाली तसेच व्यापारी भाजी विक्रेते यांनी लाईन आखून दिलेल्या त्या मागे आपले दुकान मांडावे जेणेकरून बाजारात वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत सकारात्मक चर्चा करून बाजारात दुचाकी नो पार्किंग करण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today