सिंधुदुर्ग today
नांदगाव हायवे संदर्भात प्रश्न सुटणार कधी ?
घोड कुठं अडलय ; ग्रामस्थांचा सवाल
समस्या मार्गी न लागल्यास तिव्र आंदोलन
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथे हायवे संदर्भात कित्येक समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रामुख्याने सांगायचे झाले तर नांदगाव ओटव फाटा ब्रिज जवळील एका साईट चा सर्व्हिस रोड अद्याप ही वाहतूक योग्य नाही. कारण अजून धिम्या गतीने गटाराचे काम सुरू आहे.तसेच या कामानिमित्त वाळू खडी टाकली असल्याने वाहतूक सुध्दा विरुद्ध दिशेने न्यावी लागत आहे.आता तर काही दिवसांवर गणेश चतुर्थी येत आहे. यामुळे मुंबई गोवा हायवे वरील चाकरमान्यांचे ट्रॅफिक पाहता विरूद्ध दिशेने वाहने नेने चुकीची आहे . मात्र नांदगाव मधील ओटव माईन फाट्याच्या खालील भाग म्हणजेच नांदगाव,ओटव, माईन, सावडाव यांना पर्यायच नसल्याने विरुद्ध दिशेने जावे लागत आहे. तसेच हायवे ब्रिज वरील सर्व पथदिवे सुरू आहेत. मात्र नांदगाव ओटव फाटा येथील पथदिवे अद्याप ही बंदच असून ट्रांसफार्मर साठी जागा उपलब्ध होत नव्हती ती ही जागा नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या पुढाकाराने भवानी कॉम्प्लेक्स चे मालक अमोल गावकर यांनी उपलब्ध करून दिली आहे.
ओटव माईण ब्रिज परिसर म्हणजे याठिकाणी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. पुलावरील व या परीसरात अंधार भाग झाला आहे.ज्यावेळी सर्व्हिस रोड च्या जागेचा प्रश्न होता तेव्हा संबंधित यंत्रणा सांगत होती की, जागेचा प्रश्न सुटला तर आम्ही 8 ते 10 दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करु पण जागेचा प्रश्न केव्हाचा सुटला आहे.तसेच ट्रांसफार्मर साठी ही जागेचा प्रश्न सुटला आहे.मग घोड कुठं अडलय ? असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा